Type Here to Get Search Results !

मराठी भाषा गौरव दिन माहिती 2023| Marathi bhasha gaurav din mahiti 2023

मराठी भाषा गौरव दिन माहिती 2023| Marathi bhasha gaurav din mahiti 2023 | मराठी भाषा दिनाची माहिती 2023 | marathi bhasha din mahiti | मराठी राजभाषा दिन माहिती | marathi rajbhasha din mahiti 

प्रत्येक माणसाला आपल्या भाषेचा अभिमान असतो, मग ती भाषा जगाच्या पाठीवर कोणतीही असो.अगदी त्याच पद्धतीने मराठी भाषेचा विचार केला तर 27 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अगदी धुमधडाक्यात मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. आजच्या लेखात मराठी भाषा गौरव दिन माहिती 2023 आम्ही घेऊन आलेलो आहोत.

मराठी भाषा गौरव दिन माहिती 2023
मराठी भाषा गौरव दिन माहिती 2023

मराठी भाषा गौरव दिन मराठी माहिती (toc)

मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो | marathi bhasha gaurav din 27 February lach ka sajra kela jato 

मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीलाच  का साजरा केला जातो? असा अनेकांना प्रश्न पडतो. तर महाराष्ट्रामध्ये अनेक दिग्गज मंडळी होऊन गेली की, ज्या मंडळींनी मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या मराठी भाषेला वाढवण्याचे आणि फुलवण्याचे काम त्यांनी केले. मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी अनेक लेखक, कवी मंडळींनी आपले योगदान दिले.त्या मंडळींमधील एक नाव म्हणजे कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर.कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेसाठी प्रचंड मेहनत घेतली. आपल्या लेखणीच्या माध्यमातून मराठीची ख्याती साता समुद्रा पल्याड नेण्याचे काम त्यांच्या साहित्याने केले. कुसुमाग्रज यांचा जन्म 27 फेब्रुवारी रोजी झाला. त्यांनी मराठी भाषेची केलेली अखंड सेवा अजरामर रहावी यासाठी 27 फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असल्यामुळे तो दिवस कुसुमाग्रजांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. 


परीक्षेत हमखास विचारला जाणारा प्रश्न मराठी भाषा गौरव दिनाची बातमी तयार करा. 👈


मराठी भाषा गौरव दिन शासन निर्णय २०१३| marathi bahsha gaurav din shashan nirnay 2013 

लेखक, कवी, नाटककार असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे कुसुमाग्रज.त्यांनी मराठी भाषा ही ज्ञान भाषा व्हावी म्हणजेच मराठी भाषेतून ज्ञान मिळावे. यासाठी आग्रह धरला. त्यांच्या या अनमोल कार्याबद्दल महाराष्ट्र शासनामार्फत 21 जानेवारी 2013 मध्ये कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात यावा असा निर्णय घेण्यात आला.


कुसुमाग्रजांचे मराठी भाषेसाठी योगदान | kusumagraj yanche marathi bhashesathi yogdan

कवी कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला ज्ञानदानाची भाषा म्हणून घोषित करावे यासाठी आग्रह धरला. कुसुमाग्रजांनी मराठीमध्ये विशाखा हा अप्रतिम काव्यसंग्रह रचला.या त्यांच्या योगदानामुळे त्यांना साहित्याच्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार 1987 रोजी त्यांना जाहीर करण्यात आला. कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून दर्जा मिळावा. यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी आपल्या अनेक कथा ,कविता संग्रहातून, नाटकातून मराठी माणसांची सुसंस्कृत मने घडवण्याचे काम केले.एकीकडे मराठी भाषेला ज्ञान भाषेचे स्थान मिळावे.त्याचबरोबर मराठी भाषेतून सुसंस्कृत मने तयार करण्याचे काम कुसुमाग्रज यांच्या साहित्याने केले. हे त्यांचे मराठी भाषेसाठी असणारे योगदान आपल्याला विसरून चालणार नाही. 


२७ फेब्रुवारी मराठी राजभाषा भाषा दिन की मराठी भाषा गौरव दिन | 27 februvarai marathi bhasha din ki marathi bhasha gaurav din 

27 फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन आहे? की मराठी भाषा गौरव दिन आहे? यामध्ये अनेक जण गल्लत करतात आणि 27 फेब्रुवारीला एकमेकांना मराठी भाषा दिनाच्या किंवा मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देत असतात.1 मे 1960 रोजी  महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषिकांचे स्वतंत्र राज्य म्हणून महाराष्ट्र ओळखला जाऊ लागला. या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये राज्यकारभाराची भाषा म्हणून मराठी भाषेचा स्वीकार करण्यात आला. मराठी भाषा राज्य कारभाराच्या वापरासाठी स्वतंत्र असा महाराष्ट्र राजभाषा अधिनियम 1964 प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. म्हणून १ मे  हा दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. थोडक्यात १मे या दिवसाला मराठी भाषा दिन म्हणून देखील संबोधतात.मग अनेकांना प्रश्न पडतो की मराठी भाषा गौरव दिन म्हणजे काय ? तर मराठी भाषा आणि तिचे महत्व वाढवण्यासाठी कुसुमाग्रज यांन अथक परिश्रम घेतले, म्हणून त्यांचा जन्मदिन 27 फेब्रुवारी हा आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो.सांगण्याचे  तात्पर्य हेच की 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी राजभाषा दिन/मराठी भाषा दिन नसून मराठी भाषा गौरव दिन आहे. यामध्ये अनेकांची गफलत होते.या लेखातून ती नक्कीच दूर होईल.


कुसुमाग्रज यांचे साहित्य, पुस्तके | kusumagraj yanche sahitya pustke 

कुसुमाग्रज हे मराठी साहित्यातील एक थोर कवी होते. कुसुमाग्रज यांच्या नावावर जीवनलहरी, किनारा, वादळवेल तसेच विशाखा असे कितीतरी काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.त्यांच्या  विशाखा या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ हा साहित्यातील  सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांनी दुसरा पेशवा,नटसम्राट, राजमुकुट सारखी अजरामर नाटके देखील लिहिली. कविता नाटक याबरोबर वैष्णव,कल्पनेच्या तीरावर यासारख्या कादंबऱ्या देखील त्यांच्या नावावर आहेत. 

  आज पाहिले की कुसुमाग्रज अर्थात वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिन आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. याविषयी माहिती पाहिली.ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.धन्यवाद! 

FAQ : अधिकची माहिती 

१. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो?

१ मे 

२.मराठी भाषा गुण गौरव दिन कधी साजरा केला जातो?

27 फेब्रुवारी 

3.मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशी कोणाचा वाढदिवस असतो?

कुसुमाग्रज 

.कुसुमाग्रज यांच्या कोणत्या कलाकृतीला /पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला?

विशाखा (काव्यसंग्रह) 

५.मराठी भाषा दिन कधी साजरा केला जातो?

१ मे 


 आमचे हे लेख वाचा 

महाराष्ट्र दिन 







बोर्ड परीक्षेसाठी महत्वाचा प्रश्न शिक्षक दिन बातमी लेखन मराठी 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area