Type Here to Get Search Results !

शिवजयंती भाषण मराठी 2023 | shiv jayanti speech in Marathi 2023

शिवजयंती भाषण मराठी 2023 | shiv jayanti speech in Marathi 2023| शिवाजी महाराज मराठी भाषण | shivaji Maharaj speech in Marathi 2023|शिवाजी महाराज दहा ओळींचे भाषण | shivaji Maharaj ten line speech in Marathi | शिवजयंती कडक मराठी भाषण |shivjayanti kadak bhashan 2023


शिवजयंती म्हटले की, सर्वांच्याच रक्तामध्ये शिवचैतन्य उभा राहते. जय भवानी! जय शिवाजी! अशा घोषणा देत जाणते राजे शिवछत्रपती यांचा जन्मोत्सव म्हणजेच शिवजयंती मोठ्या उत्साहात केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर साजरी केली जाते. महाराष्ट्रातील एक महान व्यक्ती की ज्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, त्यांच्या व्यवस्थापन शैलीचा अभ्यास परदेशी विद्यापीठे करत आहेत. अशाच महान राजाची जयंती म्हणजे शिवजयंती होय. शाळा महाविद्यालये,कॉलेजेस सहकारी संस्था अशा विविध ठिकाणी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. अगदी बाळ गोपाळ यांनी देखील अशा महान राजा विषयी आपले विचार मांडले पाहिजे यासाठी पालक वर्ग शिवजयंतीला आपल्या पाल्याकडून छान असे भाषण तयार करून घेत असतात. साहजिकच आजच्या लेखाच्या माध्यमातून आम्ही शिवजयंती मराठी भाषण (shiv jayanti speech in Marathi) घेऊन आलो आहोत. हे केव शिवजयंती चे भाषण नाहीतर शिवाजी महाराज यांची माहिती देणारी एक अनमोल असे भाषण आहे. हे शिवाजी महाराजांचे दहा ओळींचे भाषण असले तरी मध्ये सामावलेला आशय घागर मे सागर असा आहे.

आजच्या आपल्या शिवजयंती छोटे भाषण अर्थात शिवजयंती मराठी कडक भाषण आपणापुढे देत असताना हा एक शिवजयंती भाषणाचा एक नमुना आहे. शिवाजी महाराजांसारख्या महान राजाला शब्दांमध्ये बांधणे अशक्य आहे. बलाढ्या अशा  मुघल सैनिकांना सळोकी पळो करून सोडणाऱ्या, गनिमी काव्याने अतिशय कमी मनुष्यबळाच्या जोरावर अनेक मोहिमा फत्ते करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवजयंती निमित्त मानाचा मुजरा....


झाले बहु ,

होतील बहु ,

परी यासम हा .....


भुतालावर अनेक राजे होतील परंतु छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होणे नाही. अलीकडच्या काळात काही राजकीय व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही  करत सुटले आहेत त्यांनी आमचे शिवाजी महाराज मराठी भाषण जरूर ऐकावे. यातून त्यांना समजेल की आपण कोणाची कोणाशीही तुलना करतो नि ते किती चुकीचे आहे. चला तर मग आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. शिवजयंती भाषण मराठी ला सुरुवात करूया.

शिवजयंती भाषण मराठी 2023
शिवजयंती भाषण मराठी 2023



शिवजयंती मराठी अप्रतिम भाषण 2023(toc)


शिवजयंती भाषण मराठी 2023| shiv jayanti speech in Marathi| शिवाजी महाराज मराठी भाषण 2023| shivaji Maharaj speech in Marathi |शिवाजी महाराज दहा ओळींचे भाषण 2023 | shivaji Maharaj ten line speech in Marathi | शिवजयंती कडक मराठी भाषण |shivjayanti kadak bhashan 2023 |latest shivjayanti marathi speech in marathi



निश्चयाचा महामेरू|

बहुत जनासी आधारू |

परोपकाराचीयां राशी |

उदंड घडतील जयासी |

तयाचे गुण महत्त्वाशी |

तुळणा कैची |


असे गौरव उद्गार समर्थ रामदासांनी ज्या महान राजांविषयी काढले अशा वंदनीय, जाणते राजे, हिंदू स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राची आन-बान शान आणि अभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार वंदन करून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना माझा नमस्कार!व्यासपीठा समोर उपस्थित असलेले माझे गुरुजन वर्ग, मित्र, मैत्रिणी तसेच पालक वर्ग यांना देखील माझा नमस्कार. आज शिवजयंतीच्या निमित्ताने मी माझे बोबडे बोल आपणापुढे बोलत आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे अशी नम्र विनंती करतो व माझ्या शिवजयंतीच्या भाषणाला सुरुवात करतो.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी उद्गारले तरी ,ज्या मुगल फौजांना घाम सुटत होता अशा शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव शिवबा असे का ठेवले ठेवले तर माता जिजाबाई यांनी शिवनेरी गडावरील शिवाई देवीला नवस केला होता आणि या नवसाने माता जिजाऊ यांच्या पोटी एक अनमोल रत्न जन्मले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवाई देवीचा प्रसाद म्हणून शिवाजी.शिवाजी महाराज वडील शहाजीराजे भोसले एक जहागीरदार होते. शहाजीराजे नेहमी विविध मोहिमांवर असत.


TAIT परीक्षा हॉल तिकीट उपलब्ध 👈


छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अगदी बालपणापासून संस्कार करण्याचे काम माता जिजाऊ यांनी केले. शिवाजी महाराज लहान असताना जिजाबाई बाल शिवबाला घेऊन पुणे या ठिकाणी स्थायिक झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांना राम ,लक्ष्मण यांच्या गोष्टी सांगून माता जिजाऊ यांनी तुला देखील या महाराष्ट्रामध्ये रामराज्य आणायचे आहे यासाठी तुला अपार मेहनत करावी लागेल असे संस्कार आणि शिकवण माता जिजाऊ यांनी दिली. बाल शिवबा यांना दादाजी कोंडदेव यांनी घोड सवारी, तलवारबाजी आणि प्रशासन असे सर्व प्रशिक्षण देण्याचे काम केले. 


बाल शिवबा आता स्वराज्याची स्वप्न पाहू लागले. प्रथम त्यांनी मोरे,सावंत,घोरपडे,देशमुख यासारख्या सरंजाम दाराविरुद्ध आवाज उठवला आणि नंतर मग मुघल फौजांकडे आपली मोहीम वळवली. शिवाजी महाराजांचा वाढता दरारा पाहून आदिलशहाने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी बलाढ्य अशा अफजलखानाला पाठवले होते. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनी धाडल्याणे शिवाजी महाराजांचा दरारा अजूनच वाढत होता. पन्हाळ्याचा वेडा असो की, पावनखिंडची लढाई छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे शिवाजी महाराजांना आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या राजाचे संरक्षण करत होते आणि या स्वराज्याच्या कामे येत होते.


औरंगजेबाने तर शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांवर चाल करून पाठवले. शाहिस्तेखानाची बोटे कापून कडा जवाब शिवाजी महाराज यांनी दिला. पुरंदरचा तह असो की आग्र्यावरून सुटका असो प्रत्येक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये असणाऱ्या विविध शिवगुणांचा आपल्याला परिचय आल्या घरीच राहत नाही.


छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य उभारले या स्वराज्याला हिंदवी साम्राज्याचा दर्जा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला रायगड या ठिकाणी राज्याभिषेक करून घेतला व मराठी साम्राज्य उभे केले. परंतु राज्याभिषेकानंतर अगदी थोड्या दिवसानंतरच छत्रपती शिवाजी महाराज यांना आरोग्याचे प्रश्न सतावू लागले आणि हे महाराष्ट्रातील मुघलांविरुद्ध उभे ठाकलेले वादळ ३ एप्रिल १६८० ला कायमचे शमले. अशा या महान राजा विषयी बोलण्याची संधी मला आज मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या वाणीला विराम देत असताना एवढेच म्हणेन,


यशवंत कीर्तिवंत 

सामर्थ्यवंत वरदवंत 

पुण्यवंत नीतीवंत 

जाणता राजा 


अशा या जाणत्या राजाला शिवजयंती निमित्त मानाचा मुजरा.यानंतर संभाजी महाराज यांनी कडा प्रतिकार मुगल फौजेशी केला पण त्यांचा देखील टिकाव लागला नाही.असो....

जय हिंद! जय महाराष्ट्र! जय भवानी! जय शिवाजी!  


शिवाजी महाराज मराठी भाषण पीडीएफ|shivaji Maharaj marathi speech pdf|शिवजयंती भाषण मराठी पीडीएफ| shiv jayanti marathi bhashan pdf|शिवाजी महाराज छोटे भाषण pdf|shivaji Maharaj small marathi speech pdf  


शिवजयंती भाषण आपल्याकडे कायमस्वरुपी राहावे यासाठी आम्ही ते आपणास pdf स्वरूपात देत आहोत.ते आपण download करून ठेवा.

DOWNLOAD 



शिवजयंती मराठी भाषण व्हिडिओ|shiv jayanti marathi bhashan speech vedeo |शिवाजी महाराज भाषण व्हिडिओ|shivaji maharaj marathi speech vedeo 



 


आमचे हे लेख वाचा 


शिवजयंती अप्रतिम सूत्रसंचालन 
















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area