Type Here to Get Search Results !

अप्पासाहेब धर्माधिकारी मराठी माहिती | Appasaheb Dharmadhikari Information in marathi

अप्पासाहेब धर्माधिकारी मराठी  माहिती | Appasaheb Dharmadhikari Information in marathi 

महाराष्ट्र सरकारमार्फत दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदाचा 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ निरूपणकार तथा समाजसेवक अप्पासाहेब धर्माधिकारी उर्फ दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना जाहीर झाला. त्यांनी केलेल्या अनमोल कार्याचा आपल्याला परिचय व्हावा.या प्रेरणेतूनच आज आपण अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या विषयी माहिती पाहणार आहोत. अप्पासाहेब धर्माधिकारी यांची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे. आज त्यांना  2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे.म्हणूनच त्यांच्याविषयीची सविस्तर अशी माहिती Appasaheb Dharmadhikari Information in marathi  आम्ही आपणासाठी देत आहोत.

अप्पासाहेब धर्माधिकारी मराठी  माहिती
अप्पासाहेब धर्माधिकारी मराठी  माहिती

महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी माहिती(toc)

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जीवन परिचय | appasaheb dharmadhikari jivan Parichay 

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जीवन परिचय करून घेत असताना सर्वप्रथम आपण त्यांचे बालपण याविषयी जाणून घेऊया.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बालपण | appasaheb dharmadhikari yanche balpan

आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म 14 मे 1951 रोजी रायगड मधील रेवदंडा या ठिकाणी झाला. त्यांचे बालपण ,प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रेवदंडा या ठिकाणी झाले.

  अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांनी महाराष्ट्रात निरूपण व अनेक सेवाभावी उपक्रम हाती घेतले. गोरगरीब जनता अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता यामध्ये अडकलेली आहे. त्यांना मार्गदर्शन वर्गांची आवश्यकता आहे. यासाठीच त्यांनी प्रबोधन सुरू केले. वडिलांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हे समाजसेवेचे काम आपल्या हाती घेतले. अज्ञानी जनतेला अध्यात्मिक ज्ञान देण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी यांच्यानंतर अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. आपल्या वडिलांनी सुरू केलेले कार्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी पुढे चालू ठेवले. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेला कार्याचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला समजेल की त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने का गौरवण्यात आले असावे.

@अप्पासाहेब धर्माधिकारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पहा.  👈

महाराष्ट्र भूषण निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची कार्ये | appasaheb dhrmadhikari yanchi karye 

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी रायगड जिल्ह्यामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये अनेक तरुण दारूच्या आहारी गेले होते.अशा तरुणांना आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवला. आपल्या वडिलांनी जे समाजसेवेचे व्रत स्वीकारले होते. व्रत पुढे चालू राहावे यासाठी आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान स्थापन केले.या प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले.

1. अंधश्रद्धा निर्मूलन

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सर्वात महत्त्वाचे कोणते कार्य केले असेल तर भोळी बाबडी जनता कर्मकांडांमध्ये अडकून होती. विशिष्ट वर्ग त्यांची लूट करत होता. धर्माच्या आणि कर्मकांडाच्या नावाखाली सर्वसामान्य जनतेची होणारी दिशाभूल अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आपल्या बैठकांचा माध्यमातून केली.

2. वृक्षारोपण कार्यक्रम 

आज निसर्गाचे सर्व संतुलन ढासळलेले आहे.ते संतुलन जर आपल्याला नीट करायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करणे गरजेचे आहे.शासन त्यासाठी विविध उपक्रम राबवत असते आणि या उपक्रमांना हातभार लावण्याचे काम नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान दरवर्षी करताना दिसते. आणि त्या प्रतिष्ठानचे प्रमुख या नात्याने त्याचे सर्व श्रेय अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाते.

3. रोजगार मेळावे 

लोकांना रोजगाराच्या संधी कुठे आहेत याची बऱ्याचदा माहिती नसते. माहिती सहजगत्या उपलब्ध व्हावी यासाठी विविध रोजगार मिळावे अप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांची अनुयायी यांनी सुरू केले. या मेळाव्याच्या  माध्यमातून अनेक तरुण-तरुणी यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.

4. स्वच्छता मोहिम 

अलीकडच्या काळात व्यक्तीचे आरोग्य विषयीचे प्रश्न का निर्माण झाले आहेत याचा जर आपण शोध घेतला तर आपल्या आजूबाजूला पसरलेले घाणीचे साम्राज्य. हे साम्राज्य घालवण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत आहेत. त्यातून लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. यावर तोडगा काय म्हणून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तथा आप्पासाहेब धर्माधिकारी आणि त्यांचे अनुयायी यांनी अनेक स्वच्छता मोहीम हाती घेतल्या. समुद्र किनाऱ्यांची स्वच्छता, रस्त्यांची स्वच्छता अशा विविध स्वच्छता मोहिमा यशस्वी करून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचे काम अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.

5. व्यसन मुक्ती केंद्रांची स्थापना 

अलीकडच्या काळात ढाबा संस्कृती मोठ्या प्रमाणात फसवताना दिसत आहे. बरेच तरुण-तरुणी शोक म्हणून किंवा आदर्श मजबूर म्हणून वेगवेगळी व्यसन करताना दिसत आहेत. अशा तरुणांना व्यसनाच्या कचाट्यातून बाहेर काढण्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी अनेक ठिकाणी व्यसनमुक्ती केंद्र उभी केली. अशा या त्यांच्या कार्यामुळेच त्यांना आज महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

6. आरोग्य शिबिर 

अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी  नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत अनेक आरोग्य शिबिरांच्या आयोजन केले या आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून आदिवासी भागातील लोकांना आरोग्याच्या अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या. जे शिबिराचाच एक भाग म्हणून अनेक रक्तदान शिबिरे देखील आयोजित करण्यात आली.

7. समाज प्रबोधन

समाजाला योग्य दिशा द्यायचे असेल समाजाचे उत्तम प्रबोधन होणे गरजेचे आहे. नेमके हेच कार्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले. समाजाला सुयोग्य दिशा दाखवण्याचे काम आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले.

8. बाल संस्कार वर्ग 

अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मते आपल्याला खूप मोठे बदल हवे असतील तर आपण बालपणापासूनच बालकावरती चांगले संस्कार केले पाहिजेत आणि संस्कार व्हावे त्यासाठीच बाल संस्कार वर्गांच्या आयोजन केले जाते. बाल संस्कार वर्ग अगदी निशुल्क असतात कोणत्याही प्रकारची क्रियांमध्ये आकारले जात नाही. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोकांना सामावून घ्यायला असे समाजकार्य अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केले मनोज त्यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेले पुरस्कार | appasaheb yana milalele purskar 

अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आतापर्यंत बऱ्याच पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. 2014 साली त्यांना डॉक्टरेट म्हणजेच मानद पदवी देण्यात आली. 2017 मधे पद्मश्री पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले तर यंदाच्या वर्षी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. दिनांक 8 फेब्रुवारी 2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे नाव पुरस्कारासाठी जाहीर केले.

या लेखाच्या माध्यमातून आप्पासाहेब धर्माधिकारी यांची संपूर्ण माहिती आपल्याला मिळाली घरी राहणार नाही.पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद! 


आमचे हे लेख वाचा 

सरकारी कर्मचारी यांना धमकावणे पडेल महागात


राष्ट्रीय क्रीडा दिन माहिती 

संत रामदास यांनी सांगितलेली उत्तम लक्षणे 

शिक्षण नेमके कशासाठी घ्यावे 

सुख म्हणजे काय 

आर्थिक साक्षरता काळाची गरज 

आर्थिक नियोजन व काटकसर  

सामान्य माणूस आणि शेअर मार्केट  

बालकाला समजून घेताना  

कोरोना काळातील शाळेचे आत्मकथन 

भारताचे नवे शैक्षणिक धोरण २०२० 

शेअर मार्केट मूलभूत माहिती काही संकल्पना  

वाक्प्रचार 

अध्यात्म व मानवी जीवन 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area