दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय | dahavi baravi board parikshet daha minute vadhvun milnar
दहावी बारावी विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची शैक्षणिक वर्षे असतात. कॉपीमुक्त अभियान राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अतिशय कडक नियमावली तयार केलेली आहे.या नियमावलीचा भाग म्हणूनच आतापर्यंत परीक्षेच्या अगोदर प्रश्नपत्रिका आकलनासाठी दहा मिनिटे वेळ वाढीव दिला जात होता. तो यावर्षी बंद करण्यात आला. परंतु पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ही दहा मिनिटे वाढवून मिळावी त्यासाठी विनंती केल्यामुळे आता तो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय झालेला आहे.
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेत दहा मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय |
दहावी बारावी एक्स्ट्रा वेळ (toc)
दहावी बारावी बोर्ड परीक्षा वाढीव दहा मिनिटे कशी मिळतील | dahavi baravi board exam extra 10 minute information
आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेचा आपण जर विचार केला तर विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका चे आकलन नीट व्हावे आणि उत्तर पत्रिका सोडवत असताना आत्मविश्वास वाढावा यासाठी विद्यार्थ्यांना दहा मिनिटे प्रश्नपत्रिका अगोदर दिली जात होती.
बालकाला मोफत शिक्षण घेण्याचा अधिकार
👆 फक्त क्लिक करा.
या अगोदर बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना या दहा मिनिटांचा प्रचंड फायदा होत होता. कॉपीमुक्त अभियानाचा एक भाग म्हणून प्रश्नपत्रिका अगोदर देण्याची जुनी पद्धत यावर्षी बोर्डाने बंद केली आहे मग विद्यार्थ्यांना आता नव्याने जी वाढीव दहा मिनिटे दिली जाणार आहेत ती कशी तर वाढीव दहा मिनिटे विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका आणि प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतर पेपरचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये ती दहा मिनिटे वाढवून दिलेले आहेत.
हॉल तिकीटावरील या बाबी तपासून पहा
क्लिक 👆
उदा. मराठी या विषयाचा पेपर तीन तासांचा असेल तर समजा तो पेपर 11 ते 2 अशा वेळामध्ये होणार होता. त्याऐवजी आता तो 11 ते 2.10 या पद्धतीने ते वाढीव गुण दिले जाणार आहेत. पूर्वीच्या वेळा पेक्षा शेवटी उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी दहा मिनिटे वाढवून दिली आहेत.
पेपर वेळेत पूर्ण होण्यासाठी या टीप्स वापरा
क्लिक करा 👆
विद्यार्थ्यांनी आपल्या हॉल तिकीट वरील वेळापत्रक नीट पाहून आपल्या पेपरचा जो वेळ आहे तो सुरू होण्याची वेळ तीच आहे मात्र प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका हातात मिळाल्यानंतर ती गोळा करत असताना वाढीव दहा मिनिटे दिले जाणार आहेत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
हॉल तिकीट वरील चुका कशा होतील दुरुस्त
क्लिक 👆