Type Here to Get Search Results !

दहावी हॉल तिकीट हातात मिळताच या बाबी तपासून पहा | dahavi hall ticket miltach ya babi tapasaun paha

दहावी हॉल तिकीट हातात मिळताच या बाबी तपासून पहा | dahavi hall ticket miltach ya babi tapasaun paha |ssc exam hall ticket update 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा म्हटले की,विद्यार्थ्यांना एक वेगळेच दडपण येत असते.अगदी वर्षभर करावयाचा अभ्यास तो कसा करावा? आपली मानसिकता,दडपण या सर्वांबरोबर अजून एक बाब महत्वाची आहे.ती म्हणजे आपले admit card किंवा दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीटजर यात काही चुका असतील तर त्या वेळीच दुरुस्त करून घ्याव्यात. म्हणूनच आजच्या लेखात दहावी हॉल तिकीट हातात मिळताच या बाबी तपासून पहा या लेखातून आम्ही अतिशय महत्वाची माहिती देत आहोत.

दहावी हॉल तिकीट हातात मिळताच या बाबी तपासून पहा
दहावी हॉल तिकीट हातात मिळताच या बाबी तपासून पहा

दहावी हॉल तिकीट (toc)

हॉल तिकीट मिळताच या बाबी बघून घ्या | hall ticket miltach ya babi tapasun ghya


मार्च महिन्यात दहावी परीक्षा होणार.त्याचे वेळापत्रक आपण पाहिले असेल.आपल्याला ६ फेब्रुवारीला शाळा स्तरावर हॉल तिकीट मिळणार आहेत.आपल्या हताता admit card  मिळताच खालील बाबी  नीट तपासा.....कारण भविष्यात कोणतीही परीक्षा देताना , नोकरीला अर्ज करायचा असो त्या ठिकाणी आपल्याला दहावी बोर्ड सर्टिफिकेट हमखास मागितले जाते. याचाच अर्थ आपण आपले hall tickit नीट तपासून पाहणे अतिशय गरजेचे आहे.यासाठीच तुमचे हॉल तिकीट हातात मिळताच त्यातील कोणत्या बाबी चेक करणार? याविषयी माहिती नीट जाणून घ्या.

दहावी हॉल तिकीट मधील महत्वाच्या बाबी | 10th hall ticket important babi | दहावी हॉल तिकीटाचे महत्व 


१. परीक्षार्थीचा फोटो व सही| Candidate photo and signature

दहावी असो की बारावी आपल्या हातात admit card पडताच पहिली बाब त्यावर असणारा फोटो आपलाच आहे का? हे तपासून पहा.तसेच आपण केलेली सही त्यावर आहे की नाही ? जर नसेल तर ही बाब आपल्या शिक्षकांना सांगा.फोटो अस्पष्ट असेल तर आपल्याकडील आयकार्ड size फोटो वर्गशिक्षक यांना द्या.ते आपला नवीन फोटो चिटकवून त्यावर head master यांची सही शिक्का घेऊन आपल्याला hall ticket देतील. अन्यथा आपल्याला परीक्षा केंद्रावर प्रवेश करताना अटकाव केला जाऊ शकतो.

2.परीक्षार्थीचे संपूर्ण नाव | candidate full name 

आपला फोटो आणि सही बरोबर आहे.याची खात्री केल्यावर आपले संपूर्ण नाव त्यातील spelling बरोबर आहेत का? याची खात्री करा... कधी कधी नजरचुकीने यात चुका राहू शकतात. आपले पूर्ण नाव तसेच आईचे नाव देखील तपासून पहा. बरीच मुले या बाबी पाहत नाहीत आणि नंतर बोर्ड प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचा दाखला यात तफावत दिसते.त्यामुळे पुढील शिक्षण घेताना अडचणी येऊ शकतात. 

2. माध्यम | midium  

आपल्याला दहावी बारावी हॉल तिकीट मिळताच त्यात आपण कोणत्या माध्यमातून परीक्षा देणार आहोत तेच माध्यम आहे का तपासा.वेळेवर जर बदल झाला नाही तर मात्र आपले नुकसान होऊ शकते.अशा अनेक केसेस घडल्या आहेत.
उदा.मराठी,इंग्लिश, हिंदी इत्यादी 

3. जन्मतारीख| date of birth 

आपण बोर्डाचा फॉर्म भरताना आपली जन्मतारीख अचूक आहे का ते तपासून पहा.जर काही चुका असतील तर वर्गशिक्षक यांच्या लक्षात आणून आवश्यक ते बदल करून घेऊ शकता.थोडक्यात आपला फॉर्म भरताना त्यातील  date of birth अगदी अचूक भरा.
उदा.
जसे की 13.09.2006  याच पद्धतीने बोर्ड बोर्ड फॉर्म वरील तारीख चेक करून घ्या.

4.जन्मस्थळ | birth place

भविष्यात आपल्याला कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेताना इतर कागदपत्रांमध्ये जनमस्थळ /रहिवास पुरावा म्हणून महत्वाचे आहे. म्हणूनच प्रवेश पत्रावरील जन्मस्थळ तपासून पहा. 

5.लिंग |Gender 

 मुलांनी male आणि मुलींचे female असे gender बरोबर दिले आहे की नाही.हे देखील तपासून पहा.

6. परीक्षार्थी प्रकार |type of candidate

यामध्ये विद्यार्थी नियमित आहेत त्यांनी reguler हा candidate टाईप आहे का? हे पाहून घ्या.

7. केंद्राचे नाव | center name 

आपल्या हॉल तिकीट वरील सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे आपण बोर्डाची परीक्षा कोणत्या केंद्रावरून देणार आहोत ? त्या केंद्राचे नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. कधीकधी एका संस्थेच्या दोन शाळा/इमारती असू शकतात.त्यावेळी आपला नंबर नेमका कोणत्या शाळेमध्ये आहे ?याची खातर जमा करून घ्या.कारण आपल्याला संपूर्ण परीक्षा एका केंद्रावरच द्यायची असते.

8.विषय आणि उत्तर लेखनाची भाषा| subject and languge of answer 

आपला बोर्डाचा फॉर्म भरत असताना आपण कोणकोणते विषय घेतलेले आहेत? तेच विषय आपल्या ऍडमिट कार्डवर म्हणजे हॉल तिकीट वर आहेत का? हे तपासून पहा.

उदा.
हिंदी विषय आपण लोकभारती घेतला की सुलभ भारती.हे सर्व तपासून पाहा.कधी कधी फॉर्म भरत असताना विषय कोड टाकत असताना शिक्षकांकडून गडबड होऊ शकते, म्हणूनच आपले हॉल तिकीट हातात येताच सर्व बाबी नीट तपासून पहा.

अशा पद्धतीने दहावी बारावी  बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट आपल्याला मिळताच सर्व बाबी तपासून घ्या. आपण केवळ आपला सीट नंबर बघतो आणि इतर बाबींकडे दुर्लक्ष करतो  ,परंतु ज्यावेळी पुढील शिक्षणासाठी आपल्याला आपली प्रत्यक्षात असलेली माहिती आणि आपल्या दहावी बोर्ड एडमिट कार्ड वर असलेली माहिती यामध्ये तफावत दिसते. त्यावेळी मात्र अनेक समस्यांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो.सरकारी नोकरी मिळवताना देखील अडचणी येऊ शकतात.या सर्व समस्या टाळण्यासाठी वरील सर्व बाबी आपण हॉल तिकीट वर नीट तपासून घ्या. आणि जर या संदर्भात आपल्या काही चुका असतील तर ते आपल्या वर्गशिक्षक किंवा शाळेचे मुख्याध्यापक यांच्या लक्षात आणून द्या. त्यामध्ये तात्काळ बदल करून आपल्याला नवीन हॉल तिकीट दिले जाईल परंतु ते लगेच करा अन्यथा तुमचे अंतर्गत मूल्यमापन सुरू झाल्यानंतर शिक्षकांना व्यस्त कामकाजामुळे यासाठी वेळ नसतो. आमची हॉल तिकीट संदर्भात दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल.

आमचे हे लेख वाचा  









टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area