दहावी बारावी हॉल तिकीट ची दुरुस्ती कशी करावी | How to correct 10th 12th hall ticket | dahavi baravi hall ticket varil durusti Kashi kravi
दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा आल्या की विद्यार्थ्यांना परीक्षेचा एक वेगळा ताण येत असतो. आतापर्यंत त्यांनी दिलेल्या परीक्षा त्यांच्या शाळेमध्येच होत असतात परंतु ही बोर्डाची परीक्षा बोर्डाने घोषित केलेल्या केंद्रावर होत असल्याने त्याची एक वेगळीच बैठक व्यवस्था ,परीक्षा यंत्रणा, हॉल तिकीट अशा सर्व बाबी यामुळे तर तो विद्यार्थी पूर्ण घाबरून जातो. अशावेळी जर त्याच्या हॉल तिकीटमध्ये काही चुका आढळल्या मग तर बोलायलाच नको. त्याचा ताण अभ्यासापेक्षा कित्येक पटीने वाढून जातो.म्हणूनच आजच्या लेखाच्या माध्यमातून दहावी बारावी हॉल तिकीटची दुरुस्ती कशी करावी? याविषयी आम्ही सविस्तर माहिती आपल्याला देणार आहोत.
दहावी बारावी हॉल तिकीट ची दुरुस्ती कशी करावी |
हॉल तिकीट दुरुस्ती (toc)
दहावी बारावी हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे | How to Download 10th XII Hall Ticket | hall ticket kase download krave?
दहावी, बारावीच्या परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेतल्या जातात. विद्यार्थ्यांना दहावीच्या किंवा बारावीच्या परीक्षेला सामोरे जात असताना एक हॉल तिकीट दिले जाते. साधारणपणे परीक्षेच्या अगोदर एक महिना ते हॉल तिकीट एसएससी बोर्डाच्या संकेतस्थळावर येत असते. त्या संकेतस्थळावरून शाळा आपले स्कूल log in करून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश पत्र किंवा हॉल तिकीट देत असतात.
@@हातात हॉल तिकीट येताच या बाबी तपासून पहा
हॉल डाऊनलोड करण्यासाठी संकेतस्थळ | Website to download hall | ssc hall ticket download karnyasathi website
दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना आपले हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी बोर्डाच्या संकेतस्थळावर स्वतः लॉगिन करण्याची ऑथॉरिटी विद्यार्थ्याना दिलेली नाही ,परंतु त्या विद्यार्थ्यांनी ज्या शाळा महाविद्यालयातून बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. त्या विद्यार्थ्याला मात्र संबंधित शाळा प्रशासन आपल्या लॉगिन आयडीने प्रवेश पत्र किंवा हॉल तिकीट डाउनलोड करून देते.हॉल तिकीट करण्यासाठी संकेतस्थळ या अक्षरांवर क्लिक करून शाळा प्रशासन विद्यार्थ्यांचे ऑनलाईन हॉल तिकीट डाऊनलोड करू शकते.
www.mahahsscboard.in या बोर्डाच्या संकेतस्थळावरती बोर्ड परीक्षा बाबत सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाते.
कमी दिवसात अधिक अभ्यास करण्याची सूत्रे
दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट डाउनलोड कसे करावे? | How to correct 10th 12th hall ticket | ssc hall ticket download karnyachi prakriya step
दहावी बोर्ड परीक्षेचे मार्च 2023 चे हॉल तिकीट 6 फेब्रुवारी 2023 दुपारी तीन वाजल्यापासून एसएससी बोर्डाच्या संकेतस्थळावरती स्कूल लॉगिन मार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहे. दहावीचे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी शाळेने खालील प्रमाणे कार्यवाही करावी.
- १. सर्वप्रथम एसएससी बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.
- २. एसएससी बोर्डाच्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर आपले स्कूल log in करावे.
- ३. शाळा लॉगिन केल्यानंतर दिलेल्या टॅब मध्ये हॉल तिकीट डाउनलोड यावर क्लिक करावे.
- 4. हॉल तिकीट डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांची हॉल तिकीट डाउनलोड होतील. ती हॉल तिकीट प्रिंट करून घ्यावीत. नंतर शाळेचा शिक्का व head master यांच्या सही नंतर विद्यार्थ्यांकडे सुपूर्द केली जातात.
आपल्या लक्षात आले असेल दहावीचे हॉल तिकीट कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे किंवा ते कोठे आणि कधी डाऊनलोड करायचे याची देखील आपल्याला कल्पना आली असेल. आपल्याला हॉल तिकीट मिळाले परंतु त्या हॉल तिकीटमध्ये जर काही चुका असतील तर नेमके काय करावे? ह्या आपल्या मुख्य प्रश्नाकडे आपण जाऊया.
दहावी बारावी हॉल तिकीट ची दुरुस्ती कशी करावी How to correct 10th 12th hall ticket hall tickit correction kase karave
समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या दहावी बारावीच्या हॉल तिकीट मध्ये काही चुका आहेत तर त्या चुका कशा पद्धतीने दुरुस्त करता येतील.यासाठी बोर्डाने परिपत्रकात अतिशय स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत या सर्व सूचना पाहिल्या की आपल्याला How to correct 10th 12th hall ticket या प्रश्नाचे उत्तर नक्कीच मिळेल.
1. हॉल तिकीटवरील फोटो मधील दुरुस्ती | Correction in photo on hall ticket | hall ticket chi photo v sahi sathi durusti
समजा एखाद्या विद्यार्थ्याच्या प्रवेश पत्रावर त्याच्या फोटो संदर्भात काही दोष असतील किंवा तो फोटो अस्पष्ट असेल अशावेळी काय करावे ? तर संबंधित विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट वर शाळा स्तरावरून विद्यार्थ्यांचा फोटो तिथे चिटकवावा आणि मुख्याध्यापकांनी त्यावर शिक्का द्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.
2. ज्या विद्यार्थ्याचे नाव जन्मतारीख जन्मस्थळ या संदर्भात हॉल तिकीट वरील दुरुस्ती | hall ticket name date of birth and birth place correction durusti
एखाद्या विद्यार्थ्याचे नाव,वडीलाचे नाव किंवा आईचे नाव याबाबत चुका असतील अशावेळी या चुका विद्यार्थ्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांच्या त्या लक्षात आणून द्याव्यात. वर्ग शिक्षकांनी ती माहिती रेकॉर्डला तपासून पहावी. जर खरोखरच माहिती रेकॉर्ड प्रमाणे नसेल आणि त्यामध्ये चुका असतील तर संबंधित माध्यमिक शाळेने त्या हॉल तिकीट ची एक झेरॉक्स प्रत बोर्डाकडे पाठवावी आणि आपल्याला हवे असलेल्या दुरुस्त्या त्या ठिकाणी लाल पेन ने दर्शवाव्यात आणि त्याची एक प्रत तात्काळ बोर्डाकडे रवाना करावी. म्हणजे विद्यार्थ्यांचा निकाल येण्यापूर्वी त्या सर्व दुरुस्त्या केल्या जातील. त्यात जर काही चुका असतील तर शाळेने तात्काळ बोर्डाकडे पाठपुरावा करावा.
3.हॉल तिकीट वरील विषय माध्यम यामधील चुकांच्या दुरुस्तीसाठी | hall tickit subject and medium correction durusti
जर एखाद्या विद्यार्थ्याचे परीक्षेला बसवायचे विषय तसेच माध्यम याबाबत जर काही दुरुस्त्या करावयाचे असतील तर त्या दुरुस्त्या मात्र संबंधित शाळेने तात्काळ बोर्डाकडे जाऊन त्या दुरुस्त्या करून घ्याव्यात. कारण विद्यार्थ्यांच्या आसन व्यवस्थेनुसार सर्व प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका यांची अरेंजमेंट झालेले असते म्हणूनच विषय आणि माध्यम या चुकांसाठी बोर्डाची संपर्क करायचा आहे.
एखाद्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट हरवल्यास काय करावे?What to do if a student loses their hall ticket? Hall ticket haravle tar Kay krave?
कधी कधी घाई गडबडीमध्ये किंवा परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर म्हणा की नजर चुकीने एकाद्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट हे गहाळ होते आणि विद्यार्थी प्रचंड तणावात येतो, की आता मला उर्वरित बोर्ड परीक्षेला बसता येणार नाही. अशावेळी विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता दहावी बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट हरवले तर सर्वप्रथम आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटावे. भेटल्यानंतर त्यांना याबाबत सूचित करावे की माझे हॉल तिकीट हरवले आहे. अशा प्रकरणांमध्ये शाळेने संबंधित विद्यार्थ्यांचे प्रवेश पत्र पुन्हा एकदा एसएससी बोर्डाच्या संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करावे? आणि ती विद्यार्थ्याला शाळेचा सही शिक्का मारून नव्याने देण्यात यावी. परंतु ती देत असताना त्या हॉल तिकीट वर द्वितीय प्रत duplicate असा उल्लेख करणे मात्र बंधनकारक आहे.
अशा पद्धतीने आपल्याला दहावी बारावीचे हॉल तिकीट कशा पद्धतीने डाऊनलोड करायच? त्याचबरोबर आपल्या जर दहावी बारावी हॉल तिकीट ची दुरुस्ती करावयाची असेल तर ती दुरुस्ती कशी करावी ? याबाबत सविस्तर माहिती आपल्याला दिलेली आहे. थोडक्यात कोणत्याही प्रकारची आपल्या हॉल तिकीट वर चूक असेल तर ती चूक फक्त आपण आपल्या शाळेच्या लक्षात आणून द्यावी.शाळा अतिशय दक्षतेने त्यावर काम करते.विद्यार्थ्यांनी विनाकारण ताण घेऊ नये. फेब्रुवारी मार्चमध्ये होणाऱ्या दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा!
आमचे हे लेख वाचा
निबंध लेखनात ८ पैकी ८ हवेत गुण मग असे लिहा आत्मकथन
बोर्ड परीक्षेत येणारा प्रश्न शिक्षक दिनाची बातमी तयार करा
Rte मोफत प्रवेश संपूर्ण माहिती
अकरावी प्रवेश admission process एकदा पाहून घ्या
अभ्यास करून बोर झालाय मग हे जोक वाचा
भारताचे नवे शैक्षणिक धोरण २०२०
बोर्ड परीक्षा महत्वाचे वाक्प्रचार