Type Here to Get Search Results !

लेखनाचा वेग कसा वाढवावा | how to write fast

 लेखनाचा वेग कसा वाढवावा| how to write fast | लिहिण्याचे स्पीड कसे वाढवावे|lekhnacha veg kasa vadhvava 

दहावी बारावी बोर्ड परीक्षा जवळ आल्या की, विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो परंतु अनेक विद्यार्थ्यांना आपला पेपर वेळेत पूर्ण होईल की नाही? याची चिंता सतत सतवत असते. आपल्या लिखाणाचा वेग कसा वाढवावा? त्यासाठी काय काय करता येईल. यासाठी तो वेगात लिहिण्याच्या टिप्सचा शोध घेत असतो. या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला how to marathi Hindi and English fast या विषयी माहिती सांगणार आहोत. भाषा कोणतीही असो आपला लिहिण्याचा वेग कसा वाढवायचा? त्यासाठी काही बाबी आपण जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे. चला तर मग आपल्या आजच्या या दहावी बारावी बोर्ड परीक्षा विशेषांका मध्ये लिखाणाच्या वेगा विषयी काही महत्वाच्या टिप्स पाहूया.भाषा विषयात लेखन विभागाला खूपच महत्त्व आहे.म्हणून तर निबंध ८ गुणासाठी विचारला जातो.

लेखनाचा वेग कसा वाढवावा
लेखनाचा वेग कसा वाढवावा


लेखन वेग संपूर्ण माहिती (toc)

परीक्षा आणि लिखानाचा वेग| exam and writing 

आपल्याला लिहिण्याचा वेग कसा वाढवावा?  हे सांगण्याचा अगोदर परीक्षा आणि लिखाण यांचा काय जवळचा संबंध आहे याविषयी माहिती असणे गरजेचे आहे. आपण वर्षभर अभ्यास करत असतो.आपली परीक्षा ही बोर्डाने दिलेल्या विहित वेळेमध्ये आपल्याला आपली उत्तरपत्रिका पूर्ण करायची असते. म्हणजेच काय तर दहावी बारावी महत्वाचे वर्ष म्हटल्यानंतर विद्यार्थी अभ्यास तर करतच असतो परंतु त्या तीन तासांमध्ये जो बाजी मारतो म्हणजेच अतिशय वेगामध्ये पेपर लिहितो आपला पेपर कव्हर करतो त्याला साहजिकच चांगले गुण मिळतात.

हस्ताक्षर आणि परीक्षेतील गुण | writing and exam marks

लिखाणाची स्पीड कसे वाढवावे? हे पाहण्या अगोदर आपले हस्ताक्षर आणि आपल्याला मिळणारे गुण यांचा काही जवळचा संबंध आहे का? असा अनेकांना प्रश्न पडतो.बऱ्याच विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर खराब असते म्हणून त्यांना असे वाटते की, माझे परीक्षेमध्ये गुण कापले जातील. मी तर म्हणेन परीक्षेमध्ये हस्ताक्षर सुंदर हवेच परंतु त्याच्या जोडीला अभ्यास देखील हवा. अभ्यास नाहीआणि हस्ताक्षर खूप सुंदर आहे. अशा विद्यार्थ्याला गुण जास्त कसे बरे मिळतील? म्हणजेच काय तर आपले अक्षर हे वाचनीय असावे आणि आपल्या लिखाणाला प्रचंड वेग असावा. म्हणूनच how to write fast exam tips आम्ही आपल्याला घेऊन आलेलो आहोत.

आपला लिखाणाचा वेग आणि पेपरचा कालावधी | writing speed and paper hours co reletion 

आपल्याला भेटणारी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपल्याजवळ किती वेळ लागणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्याला कशा पद्धतीने द्यायचे आहे. याचा काही एक मेळ आपण घातला पाहिजे. आपल्याला विचारलेला प्रश्न किती गुणांसाठी आहे आणि त्याला अपेक्षित लिखाण काय आहे याची एक गोळा बेरीज आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. म्हणजेच आपला लिखाणाचा वेग आणि उपलब्ध वेळ यांचे योग्य समीकरण जुळायला हवे. या सर्व बाबी पाहिल्यानंतर ज्या उद्देशाने आपण आमचा लेख वाचत आहात त्या विषयाकडे आपण वळूया तो म्हणजे आपल्या लिहिण्याचा/लिखाणाचा वेग कसा वाढवावा? याकडे आपण वळूया.

लिखाणाचा वेग वाढविण्यासाठी टिप्स | लेखन गती कशी सुधारावी | speed writing tips| hand writing speed very fast| writing badhane ka tarika | handwriting badhane ke liye tips | लेखन गती स्पीड कसे वाढवावे? | वेगात पेपर कसा सोडवावा 

आपण खाली देत असलेल्या बाबी मन लावून केल्या तर लिखाणाबाबत आणि त्याच्या वेगा बाबत असलेल्या सर्व शंका नक्कीच दूर होतील.

1.पेनाचे वजन | pen weight 

आपण आपल्या लिखाणाचा वेळ वेग वाढवण्यासाठी कधी आपण पेन हलका वापरतो की वजनाने थोडा जास्त वापरतो. याविषयी दक्ष झाला आहात का? नसाल तर आपल्याला आपल्या लिखाणाचा वेग प्रचंड वाढवायचा असेल तर हलक्या वजनाचा म्हणजेच light weight पेन वापरणे अतिशय गरजेचे आहे. ज्यावेळी दुकानात पेन घ्यायला जातो त्यावेळी आवर्जून त्या पेनाचे वजन बघायला हवे. वजनाने हलका असलेला पेन आपली लिखाणाची गती वाढायला खूप मदत करतो. लिखाणाची गती वाढवण्यासाठी पहिले टिप्स आहे आपल्या पेनाचे वजन पहा.

2. शाई पेनचा वापर | pen ink 

परीक्षेमध्ये साधारणपणे विद्यार्थी बॉलपेन आणि शाही पेन यांचा वापर करतात. बॉलपेन हा लिहीत असताना आपल्याला दाबून द्यावा लागतो तर ती अक्षरे पानावरती उमटतात याउलट आपण जर इंक पेन म्हणजेच शाईचा पेन जर वापरला तर त्यांनी आपल्याला अतिशय वेगामध्ये लिखाण पूर्ण करता येते. आज बाजारामध्ये अनेक आकर्षक अशी शाई पेन आलेले आहेत.त्यांचा उपयोग करून आपण लिखाणाची गती वाढवू शकता. परंतु या ठिकाणी एक दक्षता लक्षात घ्या जर आपण आधीपासूनच शाई पेन वापरत नसू आणि अचानक शाई वापरला तर आपली ऐनवेळी गडबड होऊ शकते. याचाच अर्थ आपण परीक्षेच्या अगोदर दोन-तीन महिने शाईपेन वापरण्याची सवय लावावी.

3. लिखाणाच्या वेगाची तपासणी | writing speed checked 

बरेच विद्यार्थी माझा लिखाणाचा वेग कमी आहे. परीक्षेमध्ये उत्तरपत्रिका किंवा पेपर कव्हर होत नाही.अशा तक्रारी करत असतात अशा विद्यार्थ्यांना आपल्या लिखाणाची गती वाढवण्यासाठी टाईम वॉचच्या मदतीने timer लावून अमुक ओळी किती वेळात लिहितो. माझा एका मिनिटाचा लिखाणाचा वेळ किती आहे. यांच्या नोंदी घेतल्या पाहिजेत. आणि हळूहळू मात्र कमी वेळामध्ये जास्तीत जास्त वेगात लिखाण कसे करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे.

4. लिखाणाचा सतत सराव | writing practice 

त्याला जर आपले लिखाण अतिशय वेगाने करायचे आहे. तर सर्वात नामी उपाय म्हणजे आपण वाचनाबरोबर लिखाणाचा देखील सराव सतत केला पाहिजे.अभ्यास करत असताना पेन हातामध्ये ठेवून एखादा प्रश्न पाठ झाल्यानंतर तो प्रश्न लिहून काढला पाहिजे. साहजिकच यातून आपल्या लिखाणाचा सराव होतो आणि कळत नकळतपणे आपल्या लिखाणाचा वेग प्रचंड वाढतो.

5. पेनाचे टोपण | penache topan 

हा मुद्दा वाचल्यानंतर अनेकांना हसू येईल परंतु ते खरे आहे. आपण ज्यावेळी लिखाण करतो त्यावेळी आपल्या पेनाच्या मागच्या बाजूला जे टोपण अडकवतो ते टोपण जर आपण बाजूला काढून ठेवले तर आपल्या पेनाचे वजन किमान 30 टक्के कमी होते. वजन कमी झाल्यामुळे आपण लिहिताना थकत नाही आपली बोटे दुखत नाहीत. साहजिकच आपल्या लिखाणाचा वेग एकसारखा राहतो बऱ्याचदा सुरुवातीला वेग जास्त असतो आणि नंतर थकवा आला की वेळ कमी होतो हे टाळण्यासाठी आपल्या पेनाचे टोपण काढून बाजूला ठेवा.

6. पेन पकडण्याची पद्धत | style of pen grip

आपल्या बोटांमध्ये पेन पकडत असताना तो पकडण्याची जी पद्धत आहे ती विशिष्ट पद्धत अवलंबा. पेनाच्या टोकापासून आपली बोटे किती वर पर्यंत हवीत. यावर देखील आपला वेग अवलंबून असतो म्हणूनच पेनला उत्कृष्ट ग्रिप बसेल अशा पद्धतीने पेन पकडा.

7. आत्मविश्वास  | confidence 

विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये पेपर कव्हर न होण्याचे किंवा लिखाणाचा वेग मंदावण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना आत्मविश्वास नसणे हे आहे. मी वर्षभर अभ्यास केला आहे आणि मी परीक्षेत चांगल्या पद्धतीने संपूर्ण पेपर लिहिणार असा आत्मविश्वास आपल्याजवळ हवा तरच आपण परीक्षेमध्ये वेगाने पेपर लिहू शकतो.

8. लिहिताना विश्रांती | writing and rest

बऱ्याचदा आपण लिखाण करीत असताना एक सलग लिहीत असतो आणि आपल्या बोटांचे स्नायू त्यामुळे दुखावलेले असतात आपली बोटे दुखली तरी आपण लिहीतच असतो अशावेळी अर्ध्या तासाने किमान 30 सेकंद हाताला आराम द्यावा.कारण विज्ञान सांगते आपण थोडा आराम किंवा विश्रांती घेतल्यानंतर आपली कार्य करण्याची क्षमता वाढत असते. म्हणूनच आपण लिखाण करीत असताना मध्ये काही वेळ विश्रांती घ्यावी त्या विश्रांतीनंतर आपला लिखाणाचा वेग हा अतिशय वाढलेला असतो.

9. प्रचंड अभ्यास | hard work study

लिखाणाचा वेग आणि अभ्यास यांचा जवळचा संबंध आहे जर आपण आठवण आठवण उत्तर पत्रिका लिहायला लागलो तर त्या आठवण्यात आपला वेळ जातो म्हणूनच अभ्यास जास्त असला पाहिजे. अभ्यास करण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यांची माहिती आपण करून घेतली पाहिजे.

अशाप्रकारे आपण आपल्या लेखनाचा वेग अतिशय झपाट्याने वाढवू शकता. आमचा आजचा रायटिंग स्पीड संदर्भात लेख कसा वाटला.हे आम्हाला  नक्की कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद! 


आमचे हे लेख वाचा 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area