Type Here to Get Search Results !

महाशिवरात्री मराठी माहिती कथा | mahashivratri marathi mahiti katha

महाशिवरात्री मराठी माहिती कथा महत्त्व | mahashivratri marathi mahiti katha mahattv|marathi story of shivratri 

शिवभक्तांसाठी महापर्वणी असलेला दिवस म्हणजे महाशिवरात्री होय. आज आपण या महाशिवरात्री सणाविषयी ती का आणि कशी साजरी केली जाते ? अशी सर्व माहिती पाहणार आहोत. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व शिव भक्त मंदिरांमध्ये शिवशंभो चा जयघोष होत होतो. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव अगदी मनोभावे शिव म्हणजे शंकराची पूजाअर्चा करत असतात. ज्या ज्या ठिकाणी शंकर धाम/मंदिरे आहेत त्या सर्व ठिकाणी प्रचंड अशी गर्दी होत असते. चला तर मग महाशिवरात्री म्हणजे नेमकं काय ते आपण पाहूया.

महाशिवरात्री मराठी माहिती कथा महत्त्व

महाशिवरात्री मराठी माहिती कथा

 

महाशिवरात्री संपूर्ण माहिती(toc)

महाशिवरात्री म्हणजे काय? Mahashivratri mhanje kay |what is Mahashivratri

आपण जर हिंदू पंचांग पाहिले तर , त्या पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातील तिसऱ्या दिवशी म्हणजे त्रयोदशीयुक्त चतुर्थीच्या दिवशी महाशिवरात्री असते. माघ महिन्यांमध्ये शिवरात्री येते तिला आपण महाशिवरात्री म्हणून ओळखतो. थोडक्यात माघ महिन्यांमध्ये येणारी शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री होय.

महाशिवरात्री म्हणजे वर्षातून एकदा देवाधिदेव शंकर भगवान यांच्या सन्मानार्थ एक उत्सव म्हणून साजरा केली जातो. तो उत्सव म्हणजे महाशिवरात्री होय. हिंदू बांधव अगदी मनोभावे महाशिवरात्री साजरी करत असतात. महाशिवरात्रीला प्रभू शिवशंकर यांची म्हणजे शिवाची महारात्र किंवा महान रात्र म्हणून देखील हिला म्हटले जाते.

थोडक्यात हिंदू धर्मामध्ये शंकर भगवान यांचे भक्ति महात्म्य सांगणारा दिवस म्हणजे शिवरात्री होय.



महाशिवरात्री का साजरी करतात? Mahashivratri ka sakti kartat |why celebration in shivratri 

महाशिवरात्री हा सण आपण का साजरा करतो याविषयी सांगायचे झाले तर अग्निपुराण ,शिवपुराण आणि पद्मपुराण या ग्रंथांचा जर आपण अभ्यास केला तर या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री सणाचे महत्व सांगितलेले आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाची पाने शंकराच्या पिंडीवर वाहून देवाधिदेव शंकर यांची पूजा केली जाते.



महाशिवरात्री कथा मराठी | mahashivratri Katha marathi |marathi story of mahashivratri | महाशिवरात्री आख्यायिका 

आपण पाहिले की हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण उत्सव म्हणून महाशिवरात्रीकडे पाहिले जाते. महाशिवरात्री का साजरी केली जाते? याविषयी एक आख्यायिका म्हणजेच कथा सांगितली जाते.

फार वर्षांपूर्वी एका जंगलामध्ये एक शिकारी राहत होता. जंगलात जे मिळेल त्याची शिकार करून तो आपल्या आणि आपल्या कुटुंबाचे उदरभरण करत होता .म्हणजेच उदरनिर्वाह करत होता. त्याचा हा शिकारीचा दिनक्रम दिवसेंदिवस चालू होता.

एके दिवशी तो जंगलामध्ये शिकारीला गेला आणि शिकारीला गेला असताना सावजाची वाट पाहत एका बेलाच्या झाडावरती तो लपून बसला होता. शिकार आली की लगेच तिच्यावर नेम धरायचा. शिकार मिळाली की लवकर घरी जायचे परंतु त्या रात्री काही केल्या शिकार मात्र येत नव्हती. तो वैतागलेल्या अवस्थेत होता आणि झोप येऊ नये म्हणून त्या झाडाची पाने म्हणजेच अर्थात बेलाची पाने हाताने तोडून खाली टाकत होता. त्याने तोडलेली ती बेलाची पाने कळत नकळतपणे त्या बेलाच्या झाडाखाली असलेल्या शिवाच्या पिंडीवर म्हणजे शिवलिंगावर पडत राहिली. त्याच्या हातून अप्रत्यक्षरीत्या शिवाची भक्ती घडत होती.

हा शिकाऱ्याचा बेल पाने खाली टाकण्याचा उद्योग सुरू असताना त्याने पाहिले की एक हरीण त्या झाडाखाली येत आहे.शिकाऱ्याने त्यावर नेम धरला. तेवढ्यात हरिण म्हणाले मला मारायचे तर मार! परंतु मला माझ्या एकदा कुटुंबाला भेटायचे आहे.ती माझी शेवटची इच्छा पूर्ण कर. थोड्या वेळानंतर हरणाचे कुटुंब त्या बेलाच्या झाडाखाली जमा झाले. शिकाऱ्याला एका हरणाची शिकार करायची होती, पण प्रत्येक हरीण तू माझा जीव घे! पण माझ्या साथीदारांना सोडून दे.एवढे एकच वाक्य बोलत होते. शिकारी मात्र हे सर्व पाहून चिंतेत पडला. या प्राणीमात्रांमध्ये एकमेकांवर प्रेमाची भावना कुठून आली. या विचाराने शिकाऱ्याने सर्व हरणांना सोडून दिले आणि त्या दिवशी कोणतेही शिकार केली नाही. सुरुवातीला बेलाची पाने शिवपिंडीवर पडली आणि खूप मोठे पुण्य त्या शिकाऱ्याला मिळाले. त्या रात्री त्या शिकाऱ्याकडून उपवास घडला. ही रात्र होती ती महाशिवरात्रीची रात्र. ही कथा सांगण्याचे तात्पर्य एवढे च की महाशिवरात्रीचा उपवास केल्यानंतर किंवा महाशिवरात्रीचे व्रत केल्यानंतर खूप प्रचंड पुण्य आपल्याला मिळत असते.

महाशिवरात्री विषयी अजून एक कथा सांगितली जाते ती कथा म्हणजे या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराने तांडव नृत्य केले म्हणून हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो.


महाशिवरात्री पूजा विधि /व्रत कशी करावी | mahashivratri Pooja vidhi vrat kase krave 

आपल्याला माहितीच आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त उपवास करतात. असेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा केली जाते. शंकराच्या पिंडीला पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, शेण गोमूत्र आणि दही लावून अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी दूध,तूप,मध,दही आणि साखर पंचामृतांच्या साह्याने शिवलिंगा वरती लेप दिला जातो. त्याचबरोबर शंकराच्या पिंडीवर बेलाची पाने तसेच चाफ्याची पांढरी फुले वाहिली जातात. महाशिवरात्रीच्या दिवशी भस्म कपाळाला लावले जाते. रुद्राक्षाच्या माळा गळ्यामध्ये घातल्या जातात. घराचा डमरू आणि त्रिशूल यांची पूजा केली जाते.



महाशिवरात्रीचा उपवास | mahashivratri upvas 

आपण पाहिले की महाशिवरात्रीच्या शुभप्रसंगी अनेक शिवभक्त उपवास करतात. महाशिवरात्रीचा उपवास करत असताना भक्तमंडळी फळे तथा खिचडी यांचे सेवन करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी प्रसाद म्हणून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात आणि त्यांचा नैवेद्य शिवलिंगाला दाखवला जातो.

सुख म्हणजे काय? चिंतन करायला लावणारा लेख  👈 क्लिक

महाशिवरात्री आणि भांग | mahashivratri ani bhang 

महाशिवरात्रीच्या पवित्र दिनी बऱ्याच ठिकाणी शिवभक्त दुधामध्ये भांग मिसळतात. काही ठिकाणी दुधामध्ये थंडाई दूध मसाला ड्राय फ्रूट मिसळतात हेच प्रसाद म्हणून भक्तांना वाटतात. ही भागामध्ये दुधामध्ये सुकामेवा मोठ्या प्रमाणात घातला जातो आणि ते दूध भक्तगणांना दिले जाते.


महाशिवरात्रीचे महत्व | mahashivratriche mhattv 

महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराची आराधना केली जाते उपवास केले जातात शंकराच्या पिंडीची पूजाअर्चा केली जाते. भगवान शंकराला प्रिय असणारा ओम नमः शिवाय हा मंत्र देखील बोलला जातो. महाशिवरात्री जवळ येताच काही भक्तमंडळी शिवलीलामृत ही शंकराची महिमा सांगणारी पोथी वाचतात. तसेच काही भक्तमंडळी महाशिवरात्रीचे निमित्त म्हणून जी बारा ज्योतिर्लिंगे आहेत त्या ज्योतिर्लिंगांना आवर्जून भेट देतात. त्या पवित्र स्थळी जाऊन भगवान शंकराच्या नामाचा जप करत असतात. थोडक्यात अधिक पुण्य कमावण्याचा दिवस म्हणून शिवभक्त या महाशिवरात्रीकडे अगदी एकटक होऊन तिची वाट पाहत असतात.

महाशिवरात्रीचा उपवास केल्यामुळे आपल्या मनातील वाईट विचार नाहीसे होतात आपल्या मनामध्ये कायम सकारात्मक आणि चांगले विचार येतात अशी शिवभक्तांची धारणा आहे म्हणूनच या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त अगदी मनोभावे भगवान शंकराची उपासना करत असतात. महाशिवरात्रीचा उपवास केल्याने आपल्याकडे सदाचारी प्रवृत्ती वाढते माणसाचा विवेक देखील जागा होतो अशी देखील शिवभक्तांची धारणा आहे. 


आमचे हे लेख वाचा 
















टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area