Type Here to Get Search Results !

व्हॅलेंटाईन डे मराठी माहिती | valentines day information in Marathi

व्हॅलेंटाईन डे मराठी माहिती | valentines day information in Marathi व्हॅलेंटाईन डे स्पेशल माहिती | valentines day special information 

कोणतेही सण-उत्सव हे अखिल मानव जातीला आनंद देण्यासाठी साजरे केले जातात.होळी, दिवाळी,दसरा, नाताळ असो की ईद.तसेच विविध दिन जसे मातृदिन,पितृदिन, गुरुपौर्णिमा इत्यादी.......  अशाच एका दिवसांपैकी एक दिवस की ज्याचीत आपण आज माहिती पाहणार आहोत. तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे.अनेक जण व्हॅलेंटाईन डे म्हटल्यानंतर तो पाश्चात्य लोकांचा दिवस म्हणून त्याला विरोध करतात. परंतु आपण त्यातून ज्या चांगल्या बाबी आहेत त्या स्वीकारायला काहीच हरकत नाही. चला तर मग व्हॅलेंटाईन डे मराठी माहिती आपण पाहूया. valentines day information in Marathi आपण ही माहिती वाचल्यानंतर आपण देखील या दिवसाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाल याची आम्हाला खात्री आहे.


व्हॅलेंटाईन डे मराठी माहिती 2023
व्हॅलेंटाईन डे मराठी माहिती 2023


व्हॅलेंटाईन डे मराठी माहिती (toc) 


व्हॅलेंटाईन डे कधी साजरा केला जातो | valentines day kadhi sajra kela jato |When is Valentine's Day celebrated?


आपल्याला सर्वांना माहितीच आहे. फेब्रुवारी महिना उजाडला की, खास करून शाळा,महाविद्यालय कॉलेजमधील विद्यार्थ्यांना ओढ लागलेली असते ती म्हणजे व्हॅलेंटाईन डे ची. तर हा व्हॅलेंटाईन डे (प्रेम दिवस) 14 फेब्रुवारी रोजी मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो.


व्हॅलेंटाईन डे चा इतिहास | Valentine's history| संत व्हॅलेंटाईन यांची माहिती | Valentine's marathi information 

व्हॅलेंटाईन डे म्हणजे केवळ प्रेमीयुगुल किंवा जोडपे यांच्यासाठी असलेला एक खास दिवस .अशी जर संकल्पना या दिवसाविष्यिय आपल्या डोक्यात असेल तर .... आपल्याला व्हॅलेंटाईन डे विषयी तितकीशी माहिती नाही असे म्हणावे लागेल चला तर आपण त्या दिवसाविषयी माहिती पाहूया.


Sent velentine (संत व्हॅलेंटाईन) 

हे एक इंग्लंड मधील महान व्यक्ती होती. 14 फेब्रुवारी या दिवशी संत व्हॅलेंटाईन यांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या स्मरणार्थ किंवा त्यांची आठवण म्हणून इंग्लंड आणि अमेरिका या देशांमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जाऊ लागला. अलीकडच्या काळामध्ये आज संपूर्ण जगभरामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. सेंट व्हॅलेंटाईन यांच्या हा बलिदानाचा दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे हा दिवस साजरा केला जातो. तसा विचार केला तर एका व्यक्तीचा बलिदान दिन परंतु कालांतराने त्या व्यक्तीच्या कार्यापासून प्रेरणा घेऊन त्याने दिलेला प्रेमाचा संदेश पाहून त्यांची आठवण म्हणून हा दिवस प्रेम दिवस किंवा ज्याला आपण व्हॅलेंटाईन डे म्हणतो तो जगभरामध्ये साजरा होऊ लागला.


सेंट व्हॅलेंटाईन यांची माहिती | sent valentines information 

सेंट व्हॅलेंटाईन यांच्या बद्दल वेगवेगळ्या दंतकथा सांगितल्या जातात. तिसऱ्या शतकामध्ये रोमन साम्राज्यात ज्या ख्रिश्चन लोकांचा छळ केला जात होता. त्या लोकांची सेवा केल्याबद्दल संत व्हॅलेंटाईन यांना तुरुंगात जावे लागले. सेंट व्हॅलेंटाईन यांच्या या सत्कार्याला प्रचंड विरोध झाला असेही सांगितले जाते.लोकसेवा करणाऱ्या सेंट व्हॅलेंटाईन यांना तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आले. परंतु त्याच सेंट व्हॅलेंटाईन यांनी त्या ठिकाणी त्या तुरुंगाचा जो जेलर होता त्या जेलरच्या अंध मुलीला आपले डोळे दान केले. 

व्हॅलेंटाईन यांना ज्या दिवशी फाशी झाली, त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी जेलरच्या मुलीसाठी एक भेटकार्ड लिहिले आणि त्या भेट कार्ड मध्ये युवर व्हॅलेंटाईन असा शब्द उल्लेख केला व आपले डोळे त्या मुलीला दान केले. याचाच अर्थ कोणाही व्यक्तीने एकमेकांची मदत करत असताना किंवा प्रेम करत असताना ते जीवापाड करावे अशी यामागे भूमिका आहे. जीवन जगताना आपल्याशी कोणी कसाही वागू? परंतु आपण त्याच्याशी मात्र चांगले वागावे. प्रेरणेतून पुढच्या काळामध्ये व्हॅलेंटाईन यांचा प्रेम दिवसांशी संबंध जोडला गेला. आणि तो दिवस व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस किंवा सेंट व्हॅलेंटाईन डे किंवा सेंट व्हॅलेंटाईन डे चा उत्सव म्हणून साजरा होऊ लागला.ती तारीख म्हणजे 14 फेब्रुवारी होय.


व्हॅलेंटाईन यांची कथा|story of valentine 

व्हॅलेंटाईन यांच्या बद्दल अजून एक दंतकथा सांगितली जाते. या दंतकथेनुसार पूर्वीच्या काळी ख्रिश्चन सैनिकांना लग्न करण्यासाठी बंदी होती, कारण कोणतीही व्यक्ती संसारामध्ये अडकली की, ती चांगल्या पद्धतीने देशभक्ती किंवा आपले काम करू शकत नाही अशी त्याकाळच्या राज्यकर्त्यांची धरणा होती. परंतु या उलट व्हॅलेंटाईन यांच्या मते जर व्यक्तीला आपले चांगले काम करायचे असेल तर त्याला मानसिक समाधान हवे. म्हणजेच वैवाहिक सुख व्यक्तीकडे असेल तर ती व्यक्ती कोणतेही काम करू शकतो. मग यावर उपाय म्हणून सेंट व्हॅलेंटाईन यांनी सैनिकांचे गुप्त पद्धतीने विवाह घडवून आणले. ही घटना ज्यावेळेस त्या राज्यकर्त्यांना कळाली त्यावेळेस त्याचा शिरच्छेद करण्यात आला.तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे अर्थात 14फेब्रुवारी होय. त्या दिवसापासूनच इंग्लंड, अमेरिका या देशातील जोडपे व्हॅलेंटाईन डे दिवशी व्हॅलेंटाईन यांच्या प्रेमरूपी कार्याला अर्पण म्हणून 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणून साजरा करतात.


व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पद्धत | valentines  day sajra karnyachi padhti 

आपण व्हॅलेंटाईन डे कशा पद्धतीने आजपर्यंत साजरा होत गेला?  याचा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येईल की, चौदाव्या पंधराव्या शतकाच्या दरम्यान 14 फेब्रुवारी चा संबंध प्रेम दिवस म्हणून केला जाऊ लागला. इंग्लंडमध्ये वसंत ऋतुच्या सुरुवातीला लव बर्ड (,पक्षी) यांचे प्रमाण वाढते. साहजिकच यादरम्यान एकमेकांवर प्रेम करणारी जोडपी एकमेकांविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाची फुले देऊन, तसेच भेटकार्ड आणि चॉकलेट मिठाई यासारखे गोड गोड पदार्थ देऊन व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देऊ लागली. त्याचबरोबर आपल्या आणि आपल्या प्रियसीचे हृदय हे वेगळे नाही. याचेच प्रतीक म्हणून बदामाचा आकार किंवा हृदयाचा आकार असणारे ग्रीटिंग कार्ड व्हॅलेंटाईन डे ला एकमेकांना मोठ्या प्रमाणात दिले जातात. ते देण्यामागे हे आहे की  आज  तुझे आणि माझे हृदय वेगळे नाही .आपण आता एक आहोत.

कालांतराने हळूहळू व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याच्या पद्धती बदलत गेल्या आणि व्यक्ती विषयी प्रेम व्यक्त करण्याचा सुयोग्य दिवस म्हणून व्हॅलेंटाईन डे या दिवसाची ओळख निर्माण झाली.


भारतातील व्हॅलेंटाईन डे |India's valentine day  

भारतामध्ये व्हॅलेंटाईन डे कशा पद्धतीने साजरा केला जातो? याविषयी माहिती पाहिली तर काही ठिकाणी शाळा, महाविद्यालय कॉलेजात हा दिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. परंतु काही संघटना किंवा समूह यांचा या दिवसाला विरोध आहे. प्रेम करण्यासाठी अमुकच दिवस हवा का ? म्हणून या दिवसाचा विरोध देखील केला जातो. व्हॅलेंटाईन डे या दिवशी अनेक मुलींना या दिवशी मोठ्या तणावाचा सामना भारतामध्ये करावा लागतो. बऱ्याचश्या मुलांची अशी धारणा आहे की ,या दिवशी आपण कोणापुढे आपले प्रेम व्यक्त करू शकतो. या दिवशी आपल्याला विरोध होणार नाही. परंतु खरोखर आपण जर व्हॅलेंटाईन डे चा इतिहास पाहिला तर ज्या व्यक्तीचे आपल्यावर प्रेम आहे त्या व्यक्तीसमोरच आपण या दिवशी व्यक्त झाले पाहिजे.ही भूमिका अनेक मुले मुली विसरतात आणि साहजिकच ज्याला आपण विघातक प्रेम किंवा एकतर्फी प्रेम जे की खूप घातक असते त्याचाच या निमित्ताने वाढताना दिसते असो असे असले तरी अलीकडच्या काळामध्ये मात्र व्हॅलेंटाईन डे साजरा होताना दिसत आहे.

भारतामध्ये देखील व्हॅलेंटाईन डे  प्रसार माध्यमांच्या साह्याने अतिशय वेगाने साजरा होताना दिसत आहे. आपला  मुद्दा हाच की आपण एखाद्या दिवसा मागून कोणती प्रेरणा घेतो? त्यातून काय शिकतो ? हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. हा व्हॅलेंटाईन डे केवळ14 फेब्रुवारीला साजरा होतो असे नाही तर हा संपूर्ण व्हॅलेंटाईन वीक किंवा व्हॅलेंटाईन आठवडा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. चला तर आपण त्या वेलेंटाइन डे  वीक विषयी माहिती पाहूया.


व्हॅलेंटाईन डे वीक मराठी माहिती | valentines day week marathi mahiti

व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना व्हॅलेंटाईन डे आपण 14 तारखेला साजरा करतो परंतु तत्पूर्वी 7 फेब्रुवारी पासून व्हॅलेंटाईन डे चे विविध दिवस व्हॅलेंटाईन डे वीक म्हणून साजरे केले जातात. चला तर मग व्हॅलेंटाईन वीक लिस्ट 2023 पाहूया. व्हॅलेंटाईन डे चार्ट माहिती आपल्याला टाईम डे साजरा करत असताना नक्कीच उपयोगी पडेल.


व्हॅलेंटाईन डे लिस्ट  मराठी valentines day week list

ज्याला आपण व्हॅलेंटाईन डे वीक किंवा व्हॅलेंटाईन आठवडा म्हणतो तो फेब्रुवारी 2023 मध्ये व्हॅलेंटाईन सप्ताह किंवा व्हॅलेंटाईन आठवडा कशा पद्धतीने साजरा होणार आहे? ते आपल्याला पुढील तक्त्यामध्ये समजेल.


व्हॅलेंटाइन दिवस यादी | valentines week marathi list


दिनांक व्हॅलेंटाईन डे लिस्ट चार्ट वार
7 फेब्रुवारी 2023 रोज डे मंगळवार
8 फेब्रुवारी 2023 प्रपोज डे बुधवार
9 फेब्रुवारी 2023 चॉकलेट डे गुरुवार
10 फेब्रुवारी 2023 टेडी डे शुक्रवार
11फेब्रुवारी 2023 प्रॉमिस डे शनिवार
12 फेब्रुवारी 2023 हग डे रविवार
13 फेब्रुवारी 2023 किस डे सोमवार
14 फेब्रुवारी 2023 व्हॅलेंटाईन डे प्रेम दिवस  मंगळवार 
 
आपण पाहिले की आठवडाभर व्हॅलेंटाईन डे चे विविध दिवस साजरे केले जातात त्या व्हॅलेंटाईन डे दिवसांची आपण माहिती पाहूया. 

व्हॅलेंटाइन वीक मराठी माहिती | valentines week marathi list information 


1. Rose day | रोझ डे दिवस (गुलाबपुष्प दिवस)

व्हॅलेंटाईन डे वीक मधील म्हणजेच त्या आठवड्यातील पहिला दिवस म्हणून rose 🌹 day  साजरा केला जातो. हा रोझ डे ७ फेब्रुवारीला आहे.सात फेब्रुवारी या दिवशी ज्याला आपण प्रेमाचे प्रतीक म्हणतो, तो गुलाब देऊन प्रियकर आणि प्रेयसी आपले प्रेम व्यक्त करतात. या रोज डे च्या दिवशी विविध रंगांचे गुलाब आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदार एकमेकांना देतात. या गुलाबाच्या रंगांवरून देखील त्या नात्यांमध्ये कोणते बंध अपेक्षित आहेत याची जाणीव आपल्याला होऊ शकते. लाल गुलाब हा प्रेमाचे प्रतीक म्हणून एकमेकांना दिला जातो तर पिवळा गुलाब हा एकमेकांमध्ये मैत्रीची मागणी करणारा गुलाब किंवा आपली मैत्री दृढ व्हावी यासाठी दिला जातो. अगदी नव्याने जर नाते जुळणार असेल तर पांढऱ्या गुलाबापासून त्याची सुरुवात केली जाते. म्हणूनच व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना किंवा व्हॅलेंटाईन डे चा आठवडा साजरा करत असताना या व्हॅलेंटाईन डे आठवड्यातील पहिला दिवस म्हणून रोज डे ला विशेष असे महत्त्व आहे. थोडक्यात सांगायचे तर व्हॅलेंटाईन डे हा केवळ एका दिवसापुरता नसून संपूर्ण आठवडाभर वेगवेगळ्या दिवसांनी तो चर्चेत असतो. या व्हॅलेंटाईन डे वीक मुळे नात्यांमध्ये दृढता यायला नक्कीच मदत होते.

2. प्रपोज डे | propose day 

व्हॅलेंटाईन डे वीक/ आठवड्यातील दुसरा दिवस म्हणजे प्रपोज डे. रोज डे साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा प्रपोज डे साजरा केला जातो. या दिवशी आपल्या दोघांमधील नातेसंबंध कायमस्वरूपी टिकावेत. यासाठी व्यक्ती एकमेकांकडे प्रेमाचे आवाहन करतात. किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीकडे आपल्या प्रेमाच्या नात्यासाठी त्या व्यक्तीला प्रपोज करत असते. थोडक्यात आपल्या प्रेमाची हाक दुसऱ्याला देण्याचा दिवस किंवा त्या व्यक्तीला तिचे आपल्यावरती प्रेम आहे की नाही किंवा ती त्याचा स्वीकार करते की नाही. यासाठी व्यक्त होण्याचा  दिवस म्हणजे प्रपोज डे. 


व्हॅलेंटाईन डे संदेश | valentines day message 


मी तुझा 
तू माझी 
माझी प्रीत तू
देते का तुझे प्रेम मजला .

अशाच काहीशा भावना प्रपोज डे च्या माध्यमातून व्यक्त होतात. थोडक्यात काय तर प्रपोज डे च्या निमित्ताने प्रेमाच्या नात्याला एक प्रकारे साद घातली जाते.
3. चॉकलेट डे माहिती | chocklet day mahiti information 
व्हॅलेंटाईन डे आठवड्यातील किंवा वीक मधील तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. या दिवशी आपले नाते तर एकमेकात गुंफत असताना नात्यातील गोडव्याचे प्रतीक म्हणून गोड पदार्थ द्यावा. या हेतूने चॉकलेट एकमेकांना दिली जाते.या चॉकलेट प्रमाणे आपले नाते चिरकाल गोड रहावे हीच हा चॉकलेट डे साजरा करण्यामागील मुख्य भूमिका आहे.

4. टेडी डे |tedi day 

टेडी म्हणजे खेळणी. खेळणी लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकालाच आवडत असतात. व्हॅलेंटाईन डे वीक च्या चौथ्या दिवशी एकमेकांमधील प्रेमाचे प्रतीक म्हणून आपल्या प्रिय व्यक्तीला छान छान टेडी भेट दिल्या जातात. अगदी ॲमेझॉन वरून देखील अशा छान छान गिफ्ट  म्हणून टेडी मागवू शकता. आपल्या प्रियजनांना ऑनलाइन ते तुम्ही देऊ शकता. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने खास वेगळ्या टेडी बनवल्या जातात. ते मनमोहक टेडी एकमेकांना गिफ्ट स्वरूपात दिले जातात. आपण वर म्हटल्याप्रमाणे कोणताही सण आपण त्याकडे कसा पाहतो त्या दृष्टिकोनातून तो चांगला की वाईट ठरत असते. आपल्याला व्हॅलेंटाईन डे म्हटल्यानंतर केवळ दोन प्रेमी युगुल किंवा जोडपे यांच्यातील प्रेम असा अर्थ न घेता आईचे मुलावरती असणार प्रेम, मुलाचे आई वरती असणार प्रेम , भावाचं बहिणीवर असणार प्रेम आणि ते व्यक्त करण्यासाठी घेतला जाणारा हा खेळण्याचा आधार. एक प्रकारे आपण ज्या पद्धतीने वाढदिवसाला एकमेकांना वेगवेगळी खेळणी देतो. त्याच पद्धतीने व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी टेडी भेट देणे खरोखरच कौतुकास्पद आहे.

5. प्रॉमिस डे |promiss day mahiti information 

प्रॉमिस डे यालाच आपण मराठीत वचन दिन असे देखील म्हणू शकतो. प्रॉमिस देणे म्हणजे एकमेकांना शेवटपर्यंत साथ देण्याची प्रतिज्ञा घेतल्यासारखेच आहे. ते नंतर व्हॅलेंटाईन विचार पाचव्या दिवशी हा प्रॉमिस डे साजरा केला जातो.


व्हॅलेंटाईन डे मराठी संदेश | valentines day marathi quotes 
आकाशात चंद्र सूर्य आहे तोपर्यंत
तुझ संगे हर एक क्षण जगून घ्यायचा आहे 

असं काहीसं सांगणारा दिवस म्हणजे वचन दिन होय. अजूनच शायरीच्या भाषेत सांगायचं झालं तर

हे विश्व जावो अथवा राहो
मी तुला वचन देतो 
काहीही होवो
घरच्या श्वासापर्यंत
 मी तुझ्यासोबत असेन.

असे वचने एक मुलगा देखील आपल्या आईला मी तुझा शेवटपर्यंत सांभाळ करेल. अशा पद्धतीने देऊ शकतो फक्त यामध्ये आपल्याकडे तशी सर्वांगीण दृष्टी हवी असे मला वाटते.

6. हग डे |hug day आलिंगन दिवस 

व्हॅलेंटाईन डे वीक किंवा सप्ताह मध्ये एक दिवस हग डे (hug day) म्हणजेच आलिंगन दिवस म्हणून साजरा केला जातो. Hug म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीला मिठी मारणे. प्रेमाने जवळ घेणे. रोज डे पासून सुरु होणारा व्हॅलेंटाईन वीक हळूहळू एक एका पातळीवर नात्यांमध्ये जवळीकता आणत चालला आहे हे आपल्या ध्यानात आला असेल.

अशा पद्धतीने जणू काही खऱ्या अर्थाने आपल्या प्रिय व्यक्तीला व्यक्तीला आलिंगन दिले जाते.

7.कीस डे | kiss day 


तेर होटो को मेरे होट 
लगाने की तमन्ना है 
मोहबत की हर दीवार 
पार करना चाहते है 

या शायरीतील ओळीच खूप काही सांगून जातात. आता एकेका टप्प्यावर आपल्या दोघांमध्ये असलेले अंतर मला एकदम कमी करायचे आहे. यासाठीच आता तू माझ्या मिठीत आहे आणि सर्व काही विसरून मी तुला चुंबन करणार आहे. याचा अर्थ आपण खऱ्या अर्थाने नात्यांनी एकरूप होणार आहोत. सगळे भेदभाव विसरून आज आपण खऱ्या अर्थाने एकत्र येणार आहोत. असा हा दिवस म्हणजे किस डे किंवा चुंबन दिन हा देखील व्हॅलेंटाईन वीक मधील एक महत्त्वाचा दिवस आहे. आपल्याला लहान मुलांचे चुंबन देखील खूप आवडते.यातून त्याच्याविषयी प्रेमभावना दृढ होते.असेच प्रेम हवे.

8. व्हॅलेंटाईन डे |valentines day |  प्रेम दिवस माहिती | love day Marathi information | happy valentine's day marathi | happy valentine's day image|व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा|valentine day best marathi wishesh 

व्हॅलेंटाईन चार्ट मधील सगळ्यात शेवटचा आणि आठवा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे की जो दिवस 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या जोडप्यांना सर्वात प्रिय वाटतो. या दिवशी प्रियकर प्रेयसी तथा पती पत्नी दोघे एकमेकांना वेळ देतात. एकमेकांसोबत वेळ घालवतात. हे प्रेम केवळ या सप्ताहापुरते नाही तर आयुष्यभरासाठी अशाच पद्धतीने पुढे चालू राहणार आहे. दोन अंजान म्हणजेच एकमेकांसाठी अनोळखी असलेल्या, एकमेकांना ओळखत नसलेल्या दोन जीवांना,दोन आत्म्यांना एकत्र आणणारे हे व्हॅलेंटाईन पर्व किंवा व्हॅलेंटाईन आठवडा की ज्याला व्हॅलेंटाईन वीक म्हणतो या व्हॅलेंटाईन वीकच्या माध्यमातून आपल्या लक्षात आलं असेल की माणसाला जीवन जगत असताना नात्यांची किती गरज आहे. 


प्रेमरूपी व्हॅलेंटाईन डे 
आहे भारी न्यारा 
हमे सबसे लगे प्यारा 
व्हॅलेंटाईन च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! 



या जगातील सर्वात अप्रतिम गोष्ट 
एकच आहे ती म्हणजे प्रेम
नाही तिचे मोल 
कारण ती आहे अनमोल 
HAPPY VALENTINE DAY 
 

 व्हॅलेंटाईन डे फोटो | Valentine day iamge 

Valentine day iamge




व्हॅलेंटाईन डे ची आजच्या काळामध्ये गरज need of valentines day celebration


 व्हॅलेंटाईन डे सारखे डे साजरे करणे ही आजच्या काळाची गरज आहे का?  याचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये किती तरी मायनस नकारात्मक बाबी आपल्याला दिसत असल्या...  तरी माझ्या मते, असे दिवस साजरे करणे ही ही काळाची गरज आहे. आज आपण जो नोकरदार वर्ग पाहतो त्या वर्गाचा जर विचार केला तर सकाळी घरातून बाहेर पडणारा माणूस संध्याकाळी घरातील सर्व व्यक्ती झोपल्यानंतर घरात येतो.त्याचे कोणाशी बोलणे होत नाही. घरामध्ये पती पत्नी आणि त्यांची मुले अशी चार डोके राहत असली तरी कधीमधी सुट्टीच्या दिवशी ते एकमेकांच्या समोर असतात. ही आजच्या गतिमान आणि धकाधकीच्या जीवनातील खरी वास्तवता आहे. मुलाला आईशी बोलायला वेळ नाही. आईला वडिलांशी बोलायला वेळ नाही. हे समाज वास्तव नाकारून चालणार नाही. आज बदलू पाहत असलेली कुटुंब व्यवस्था खूप भयानक होत आहे. या बदलत असलेल्या कुटुंब व्यवस्थेमध्ये माणसांना या व्हॅलेंटाईन डे सारख्या दिवसांच्या निमित्ताने व्यक्ती एकमेकांना कृत्रिम का होईना वेळ देतात.त्यामुळे नात्यांमध्ये एकताणता एक जीवपणा आणण्याचे काम करतात. थोडक्यात नातेसंबंध सक्रिय व्हायला  अशा valentines day दिवसांमुळे मदत होते. एकतर्फी प्रेमातून एखाद्याचे खून होण्यापेक्षा, आपल्या मनातील भावना मोकळेपणाने बोलून त्या भावनांना साद कोण घालत नसेल तर मात्र अगदी प्रांजळपणे समोरच्या व्यक्तीला त्याचा त्याचा मार्ग निवडून यावा. अशा अर्थाने व्हॅलेंटाईन डे साजरा झाला तर ना कोणावर ऍसिड फेकण्याच्या घटना होतील ना एकतर्फी प्रेमातून होणारे खून होतील. परंतु या प्रेमाच्या दिवसाकडे म्हणजेच व्हॅलेंटाईन डे कडे तितक्या निरपेक्षपणे आणि व्यापकपणेपने अतिशय गरजेचे आहे. आणि केवळ तरुण मुले मुले यांनी व्हॅलेंटाईन डे म्हणजे आम्हाला प्रेमासाठी व्यक्त होण्याचा दिवस एवढे या व्हॅलेंटाईन डे ला संकुचित न करता आपले मित्र मैत्रिणी आई वडील बहिण भाऊ आजी आजोबा या ना त्या प्रकारे सर्वांना एकत्र कसे बांधून ठेवता येईल. अशा अंगाने जर आपण व्हॅलेंटाईन वीक साजरे केले तर खऱ्या अर्थाने व्हॅलेंटाईन डे ची माहिती आपल्याला कळाली असा त्याचा अर्थ होतो.
या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला व्हॅलेंटाईन डे मराठी माहिती सांगितली. ही माहिती सांगत असताना व्हॅलेंटाईन डे कोणाच्या प्रित्यर्थ केला जातो. बरोबर व्हॅलेंटाईन डे वीक ही संकल्पना काय आहे हे देखील आपल्याला समजावले. आमचा हा प्रेमरूपी दिवसाला शुभेच्छा देणारा एक आगळावेगळा लेख आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद! 


FAQ 

१. व्हॅलेंटाईन डे कधी साजरा केला जातो? 
14 फेब्रुवारी 

2.व्हॅलेंटाईन वीक कधी सुरू होतो?
७ फेब्रुवारी 

3.व्हॅलेंटाईन दिने कशाचे प्रतीक आहे?  
प्रेम



आमचे हे लेख वाचा  













 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area