मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदासाठी भरती 2023 | bombay high court peon hamal Bharti 2023
मुंबई उच्च न्यायालयात 2023 मध्ये शिपाई आणि हमाल पदासाठी मोठी मेगा भरती निघालेली आहे. आज आपण या बॉम्बे हाय कोर्टातील शिपाई आणि हमाल भरती बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.अलीकडे सरकारी नोकरी मिळणे अतिशय अवघड झाले आहे. मुंबई उच्च न्यायलयातील शिपाई भरती साठी केवळ सातवी पास ही अट असल्याने ही एक सरकारी नोकरीची नामी संधी आहे. चला तर मग मुंबई हाय कोर्टातील शिपाई /हमाल भरतीची संपूर्ण माहिती पाहूया.
मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदासाठी भरती 2023 |
मुंबई उच्च न्यायालयातील शिपाई आणि हमाल पदाच्या एकूण जागा
उच्च न्यायालय मुंबईच्या आस्थापनेवर शिपाई आणि हमाल पदासाठी जाहिरात आलेली आहे. या जाहिराती अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 133 पदांची भरती शिपाई / हमाल पदासाठी होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालय शिपाई& हमाल पदासाठी पात्रता
1. किमान सातवी पास
ज्या उमेदवाराला उच्च न्यायालयामध्ये शिपाई /हमाल पदासाठी अर्ज करायचा आहे तो उमेदवार किमान सातवी पास असावा.
2.वय
जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेला उमेदवाराचे वय किमान 18 आणि कमाल 38 वर्ष असावे. उमेदवार मागासवर्गीय आहे त्यांना वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत आहे. तसेच जे कर्मचारी न्यायालयामध्ये सध्या कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांना वयाची कोणतीही अट नाही.
3.चारित्र्य प्रमाणपत्र
शिपाई आणि हमाल पदासाठी अर्ज करणार आहे,त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा नसावा किंवा त्या संदर्भात खटला प्रलंबित नसावा. तसेच संबंधित उमेदवाराला चारित्र्य प्रमाणपत्र देखील सादर करावे लागेल.
4. लहान कुटुंबाचे हमीपत्र
महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार 28 मार्च 2006 किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्या दोन पेक्षा अधिक नसावी.
मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई/हमाल पदासाठी अर्ज करण्याची पद्धत
ज्या उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी अर्ज करावयाचा आहे त्या उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी website अर्थात संकेतस्थळ
अर्ज करण्यासाठी कालावधी
उच्च न्यायालयामध्ये शिपाई आणि अमल पदासाठी जी मेगा भरती निघालेली आहे त्या भरतीसाठी दिनांक 24 मार्च 2023 ते 7 एप्रिल 2023 पर्यंत आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल.
ऑनलाइन अर्ज शुल्क
उच्च न्यायालयामध्ये शिपाई आणि हमाल पदासाठी ऑनलाईन 25 रुपये शुल्क भरावयाचे आहे.
शॉर्ट लिस्टिंग
सुरुवातीला जे पात्र उमेदवार आहेत. त्या सर्व उमेदवारांचे ऑनलाईन अर्ज भरून घेतले जातील आणि त्यानंतर उमेदवारांची संख्या विचारात घेऊन शॉर्टलिस्टिंग SHORTLISTING म्हणजेच त्यातील काही विशिष्ट टक्केवारी ठरवून उमेदवारांना भरतीच्या पुढच्या प्रक्रियेमध्ये बोलावले जाईल. मात्र त्यावेळी विद्यार्थ्यांना 125 रुपये शुल्क भरावे लागणार आहे.जास्त अर्ज आल्यास छाननी केली जाईल.
मुलाखतीच्या वेळी लागणारी कागदपत्रे
ज्या उमेदवारांना शॉर्टलिस्ट नंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल.त्या उमेदवारांना जन्मतारखेचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला, जन्माचे प्रमाणपत्र किंवा एसएससी बोर्डाचे प्रमाणपत्र यापैकी एक कागदपत्र सादर करावे लागेल. इयत्ता सातवी, दहावी ,बारावी किंवा त्यानंतर केलेला एखादा डिप्लोमा किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेली पदवी याचे गुणपत्रक सादर करावे लागेल.
चारित्र्य प्रमाणपत्र
उमेदवाराला मुलाखतीच्या वेळी दोन प्रतिष्ठित व्यक्तींकडून चारित्र्यसंपन्नते विषयाची प्रमाणपत्रे सादर करावी लागतील.
रहिवास दाखला
मुलाखतीच्या वेळी महाराष्ट्राचे आदिवासी प्रमाणपत्र म्हणजेच डोमासाईल सर्टिफिकेट देखील सादर करावे लागेल.
इतर बाबी
उमेदवाराला मराठी भाषा बोलता वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे.
लेखी परीक्षा
शॉर्टलिस्टिंग नंतर उमेदवारांची 30 गुणांची लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपात घेतली जाईल.
शारीरिक क्षमता
सदर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शारीरिक क्षमता आणि त्याकडे असलेले विशेष गुण यासाठी 10 गुणांची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाईल.
तोंडी मुलाखत
शिपायाने अंमल पदासाठी 10 गुणांची तोंडी मुलाखत घेतली जाईल.
थोडक्यात शिपाई /हमाल पदासाठी एकूण 50 गुणांची परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे.
वेतन
15000 ते 47000 (सर्व भत्ते पकडून किमान 30000 च्या आसपास अंदाजे )
मुंबई उच्च न्यायाल शिपाई 2023 ची शॉर्ट लिस्ट केव्हा लागेल
उत्तर द्याहटवालिश्ट केव्हा लागेल
हटवाList kdhi lagel aajun kiti divsani
उत्तर द्याहटवा