Type Here to Get Search Results !

हनुमान जन्माची कथा मराठी 2023| hanuman birth story in marathi 2023

हनुमान जन्माची कथा मराठी | hanuman janmachi katha | hanuman birth story in marathi|maruti janmachi goshtha|मारुतीच्या जन्माची मराठी कथा | हनुमान जयंती कथा | hanuman jayanti katha|हनुमान जयंती २०२३ मराठी माहिती | hanuman jaynti marathi mahiti 

नमस्कार मित्रांनो हनुमान जन्मोत्सवानिमित्त आज आपण हनुमान जन्माची कथा मराठी पाहणार आहोत. लहान मुलांना आपली संस्कृती किती महान होती हे समजण्यासाठी मारुतीच्या जन्माची ही कथा आपल्याला नक्की आवडेल. हनुमान जयंती नेमकी का साजरी केली जाते ते देखील हनुमान जयंतीच्या गोष्टीतून आपल्याला आज नक्की समजेल. चला तर मग hanuman birth story in marathi आपण पाहूया. ही बजरंग भली यांच्या जन्माची कथा आपले मित्र मंडळी यांना आपण पाठवून त्यांना यावर्षीची हनुमान जयंती भक्ति भावाने साजरी करायला मदत करूया. 

हनुमान जन्माची कथा मराठी 2023
हनुमान जन्माची कथा मराठी 2023


हनुमान जयंती 2023(toc)

हनुमान जन्म कथा | hanuman janmachi katha 

हनुमान म्हणजेच ज्याला आपण मारुती बजरंग अशा विविध नावांनी जाणतो त्या राम भक्त हनुमान यांची जन्म कहाणी काही अजब अशीच आहे.चला तर मग महारुद्र बजरंग मारुती यांच्या जन्माची गोष्ट आपण पाहूया.प्रभू राम यांचा जन्म रामनवमीला झाला आणि त्यानंतर बरोबर सात दिवसांनी हनुमानाचा झाला.

प्रभू श्रीराम यांचा निष्ठावान सेवक,भक्तम्हणून हनुमान आपल्या सर्वाना परिचित आहे. हनुमानाची असीम भक्ती,अफाट शक्ती आणि असिम विनम्रता अशा अनेक गुणांसाठी ओळखले जातात. हनुमानाच्या जन्माची कथा ही श्रीरामांच्या जन्माशी निगडित आहे बरे का ? ती कशी तर हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते. अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून शंकर महादेवाची पूजा करत होती.आजही शिवभक्त महाशिवरात्रीला शंकराची उपासना करतात असो....याच दरम्यान अयोध्येचा राजा दशरथ आणि त्याच्या तीन राण्या देखील आपल्याला मूल व्हावे म्हणून देवाची आराधना करत होत्या. त्यांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अपत्य प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला. या यज्ञाचा समपन प्रसाद म्हणून त्यांनी तिन्ही राण्यांना देवाकडून फळ मिळाले ते देऊ केले. राणी कैकयीच्या हाती आलेले फळ एक पक्षी घेऊन पळाला. पण उडताना तिच्या हातून ते दिव्य चमत्कारी फळ खाली पडले. हेच फळ वाऱ्याने पक्ष्याच्या चोचितून अंजनीच्या हातात पडले. आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले फळ तिने देवाच्या कृपा प्रसाद म्हणून ग्रहण केले.

सुमित्रा राणीने आपले अर्धे फळ सोबत वाटून खाले. त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येच्या तिन्ही राण्याना आणि एकडेअंजनी या सर्वांना मुले झाली. केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला तो अतिशय ईश्वरी अवतार वाटत होता. त्यांनी त्याचे नाव मारुती म्हणजे वारा किंवा वायू. वाऱ्यामुळे म्हणजेच वायू देवांमुळे त्या देवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले. त्यामुळे मारुतीला वायुपुत्र हे नाव ठेवले. शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार म्हणजे शंकराचा अवतार असल्याची ही श्रद्धा आहे.

हनुमान अत्यंत शक्तिशाली होता. एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्य बिंब पाहून मारुतीला तो सुंदर चेंडू वाटला. आणि त्याने सूर्याच्या दिशेने झेप घेतली. आता या सृष्टीचे कसे होणार ?म्हणून हनुमान देवाला अडवायला देवांचा राजा इंद्र आडवा झाला.त्यासाठी इंद्राने आपले वज्र वापरावे लागले. हा वज्रप्रहार मारुतीच्या हनुवतिला लागला.आणि ती थोडी वाकडी झाली. त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमानअसेही पडले.


हनुमानाची विविध नावे| marutichi vividh nave

मारुतीची अनेक नावे आहेत. आहेत केसरीचा मुलगा म्हणून केसरीनंदन म्हणून देखील मारुतीला ओळखले जाते.अंजनी चा मुलगा असल्यामुळे अंजनेय किंवा अंजणीपुत्र . वायूच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र. बजरंग हनुमंत या नावाने देखील मारुतीला ओळखले जाते.


हनुमान आणि शितेची सुटका | hanuman ani shitechi sutka

श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात होते त्यावेळी रावणाने शितेला पळवून लंकेला नेले.राम -लक्ष्मण सीतेच्या शोधात असताना त्यांची हनुमानाशी भेट झाली. इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेतला. रावणाशी लढाईत रामाला मदत केली. आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासून भक्ती केली. त्यामुळे सहसा जिथे रामाचे मंदिर आहेत त्यांच्या बाजूला हात जोडलेला हनुमान मंदिर असतेच. मारुती रायाला भक्तांचा शिरोमणी म्हटले जाते.हनुमान चिरंजीवी म्हणजेच अमर आहे अशी देखील भक्तांची धरणा आहे. त्यामुळे आजही भक्त मंडळी म्हणतात की तो भक्ती रूपात आजही जिवंत आहे. आणि लोकांना बळ देतो. जिथे जिथे रामयनाची पारायणे सांगितली जातात. तिथे हनुमान दुसऱ्या देशात आवर्जून जातो अशी श्रद्धा आहे.


हनुमान बलाची देवता | hanuman balachi deavta

हनुमानाच्या अतुलनीय बळामुळे त्याला बल देवता मानले जाते जेव्हा मुघल भारतात येऊन इथल्या हिंदू जनतेवर अन्याय नि अत्याचार करत होते तेव्हा हिंदूंमध्ये त्यांच्याशी लढण्याचे सामर्थ्य यावे म्हणून समर्थ रामदासांनी हनुमानाच्या म्हणजेच बलाच्या उपासनेला प्रोत्साहन दिले. संत रामदास यांनी विविध ठिकाणी हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. आजही कुस्तीच्या आखाड्यांमध्ये हनुमानाला वंदन करूनच पाहिलवाण कुस्ती खेळतात.


हनुमान जन्मोत्सव २०२३| hanuman jayanti २०२३

चैत्र पौर्णिमेला हनुमान जन्मोत्सव साजरा होतो. हनुमानाच्या मंदिरांमध्ये खूप मोठा उतस्व साजरा केला जातो. आजच्या तरुण मुलांनी या हनुमान जन्म कथेच्या माध्यमातून बोध घेऊन आपल्या जीवनात व्यायामाचे किती महत्त्व आहे हे ओळखले तरी खूप झाले. ही हनुमान जन्माची तथा मारुती जन्माची कथा घराघरात पोहोचवून आपण यावर्षी हनुमान जयंती साजरी करूया. धन्यवाद !


FAQ हनुमान जयंती विषयी अधिकची माहिती


१.हनुमानाच्या आईचे नाव सांगा ?

अंजणी 

२. हनुमान कोणाची भक्ती करत असे?

प्रभू श्रीराम

३. २०२३ मध्ये हनुमान जयंती कधी आहे ?

६ एप्रिल

४. मारुतीला कशाची देवता म्हणून ओळखले जाते?

बलाची देवता


आमचे हे लेख वाचा

रामनवमी अप्रतिम रामाचा पाळणा

अभ्यास कसा करावा

दहावी जेमतेम पास आज आहेत कलेक्टर 




काही सोपे योगा प्रकार करा आणि आजारांपासून मुक्ती मिळवा




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area