आधारकार्ड पॅनकार्डला लिंक कसे करायचे संपूर्ण माहिती 2023 | How to Link Aadhaar Card to pancard Complete marathi Information 2023 |पॅनकार्डला आधार कार्ड कसे लिंक करावे?
भारत सरकार मार्फत एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. तो निर्णय म्हणजे प्रत्येक व्यक्तीचे आधार कार्ड पॅन कार्ड सोबत जोडले गेलेले म्हणजेच लिंक केलेले असणे अतिशय गरजेचे आहे.जे लिंक करणार नाहीत त्यांना भविष्यात अनेक अडचणी येणार आहेत. अनेक जणांच्या मनामध्ये या निर्णयामुळे एक भीतीचे वातावरण आहे.आधार कार्ड नेमके पॅन कार्ड ला लिंक कसे करायचे?असा अनेकांना पडलेला एक मोठा प्रश्न आहे परंतु आपण जर अगदी थोडी मेहनत घेतली तर घरबसल्या आपण मोबाईलवर देखील आपण दोन मिनिटांमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक करू शकतो. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण आधार कार्ड पॅनकार्डला लिंक कसे करायचे? याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.
पॅनकार्ड आधार कार्ड लिंक(toc)
पॅनकार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना का लिंक करावे ? |Why Link PAN Card and Aadhaar Card?
आपल्याला पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणे का गरजेचे आहे हे कळायला हवे. इन्कम टॅक्स विभागाने म्हणजेच आयकर विभागाने जे लोक आपल्या पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक करणार नाहीत त्यांची पॅन कार्ड रद्द केली जाणार आहेत म्हणजेच ती अवैध आहेत असे घोषित केले जाणार आहे. जे व्यक्ती आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करणार नाहीत अशा व्यक्तींना पुढे मोठ्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. बँकेचे कोणतेही कर्ज घेणे असो किंवा इतर देखील कोणती आर्थिक देऊ असो यासाठी आपल्याला पॅन कार्ड सादर करावे लागते परंतु जर आपण भारत सरकारने दिलेल्या मुदतीत पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक केले नाही तर आपल्याला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. थोडक्यात काय तर कार्ड आपल्या आधार कार्ड ला लिंक असणे अतिशय गरजेचे आहे. चला तर मग पॅनकार्डला आधारकार्ड लिंक कसे करायचे याची माहिती पाहूया.पण त्या अगोदर आपले आधारकार्ड पॅनकार्डला लिंक आहे का तपासून घ्या ते जर लिंक असेल तर घाबरण्याची गरज नाही.
पॅनकार्डला आधारकार्ड लिंक आहे का असे चेक करा | pancard la aadhar card link ahe ka ase check Kara. लिंक आधार स्टेटस कसे चेक करावे ? |How to Check Link Aadhaar Status?
१. सर्वप्रथम खाली दिलेल्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या संकेतस्थळावर भेट द्या. INCOME TAX GOV. IN
2. वरील निळ्या अक्षरांवर क्लिक केल्यानंतर आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या संकेतस्थळावर जाल. संकेतस्थळावर गेल्यानंतर आपल्यापुढे खालील प्रमाणे माहिती मागितली जाईल. त्यामध्ये पहिल्या कॉलम मध्ये आपला पॅनकार्ड नंबर आणि नंतरच्या कॉलम मध्ये आपला आधार कार्ड नंबर अचूक नोंदवा.
3. यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस यावर क्लिक करून आपले आधार कार्ड पॅन कार्ड ला लिंक आहे का याचे खातर जमा करून घ्या.
4. आपले आधार कार्ड पॅनकार्डला लिंक असेल तर तसा मेसेज आपल्याला स्क्रीन वरती दिसेल.जर लिंक नसेल तर खालीलप्रमाणे ते लिंक करून घ्या.
पॅनकार्डला आधार कार्ड लिंक करण्याच्या पायऱ्या | Steps to Link Aadhaar Card to PAN Card
1. ज्यांचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक नसेल त्यांनी खालील income tax department च्या अधिकृत संकेत स्थळावर जाऊन लिंक आधार यावर क्लिक करा.
Income tax website link pan to Aadhar 👈
6. link आधार यावर क्लिक केल्या नंतर आपला पॅनकार्ड आणि आधार कार्ड नंबर नोंदवा .
7. जर आपले आधार कार्ड पॅन कार्डला लिंक नसेल तर आधारकार्ड वर असलेला सर्व तपशील नोंदवा आणि तो CONFIRM करा. यानंतर आपला फोन NO टाकून त्यावर आलेला OTP प्रविष्ट करा.
8.यानंतर आपले पॅनकार्ड आणि आधारकार्ड जोडा.शेवटी पैशे भरण्याची प्रक्रिया पूर्ण करा.
अशा पद्धतीने आपणास पॅन कार्ड ला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते कसे पाहिजे आणि नसेल तर कशा पद्धतीने ते लिंक करायचे याविषयीची माहिती पाहिली. आमचा आलेख आपल्याला कसा वाटला या मला नक्की कळवा.
पॅनकार्डला आधार लिंक कसे करावे याचा मराठी विडियो डेमो pancard la aadhar card link karnyacha demo |Marathi video demo on how to link Aadhaar to PAN card
FAQ आधारकार्ड पॅनकार्डला लिंक कसे करायचे अधिकची माहिती
1. पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करणे बंधनकारक आहे का?
हो
2. पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्यासाठी किती रक्कम भरावी लागणार आहे ?
एक हजार रुपये
3.पॅनकार्डला आधारकार्ड लिंक करण्यासाठी अंतिम मुदत किती आहे ?
30 जून 2023
4. पॅनकार्डला आधारकार्ड लिंक न केल्यास काय होईल ?
भविष्यात कर्ज,आर्थिक व्यवहार,खरेदी विक्री अशा अनेक अडचणी येतील.
5.पॅनकार्डला आधारकार्ड लिंक कोणती वेबसाइट आहे ?
income tax department
आमचे हे लेख वाचा
सामान्य माणूस आणि शेअर मार्केट