पवित्र पोर्टलवर नाव नोंदणीसाठी लागणारी कागदपत्रे 2023 | list of documents required for pavitra portal 2023 | Pavitra poratal kagadpatre 2023
शिक्षक भरतीची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यासाठी पवित्र पोर्टलची निर्मिती करण्यात आलेली आहे. आपल्याला माहीतच असेल पवित्र पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या शिक्षक जागांचा सर्व तपशील उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार tait परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना पडलेले गुण विचारात घेतले जातात. निवड करताना उमेदवाराचा जात प्रवर्ग आणि इतर आरक्षण या बाबींचा देखील पवित्र पोर्टल वर जागांची उपलब्धता पाहून ही सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. म्हणूनच आजच्या लेखात आपण पवित्र पोर्टल वर आपली माहिती नोंदवण्यासाठी कोणती कागदपत्रे सोबत असावीत म्हणजेच पवित्र पोर्टल वर नाव नोंदवण्यासाठी लागणारी कागदपत्रे 2023 संदर्भात माहिती आज आपण पाहणार आहोत.
पवित्र पोर्टल आवश्यक कागदपत्रे (toc)
पवित्र पोर्टलवर नाव नोंदणी साठी लागणारी कागदपत्रे 2023 |
Tait परीक्षेचा निकाल 2023 | tait exam result 2023
आपण जर 22 फेब्रुवारी ते तीन मार्च दरम्यान घेण्यात आलेल्या tait टेट परीक्षा अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2023 दिलेली असेल तर त्या परीक्षेचा निकाल नुकताच 24 मार्च रोजी जाहीर झालेला आहे. त्याचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
TAIT परीक्षा मेरिट लिस्ट pdf 2023 | tait exam merit list 2023
स्टेट परीक्षेचा निकाल लागल्यानंतर आपला आरक्षण आणि गुणवत्तेनुसार क्रमांक पाण्यासाठी किंवा एकंदरीतच आपल्याला मिळालेले गुण आणि इतर उमेदवारांना मिळालेले गुण किंवा गुणवत्ता यादी यामध्ये आपला क्रमांक कितवा आहे ही सर्व माहिती पाहण्यासाठी खालील पीडीएफ आपल्याला मदत करतील.
Tait परीक्षा निकाल pdf download
पवित्र पोर्टल साठी लागणारी कागदपत्रे | pavitra poratal sathi lagnari kagadpatre | पवित्र पोर्टल साठी आवश्यक कागदपत्रे यादी 2023
१. एसएससी गुणपत्रक व प्रमाणपत्र | ssc marklist and certificate
आपल्याला पवित्र पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी दहावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जवळ असणे गरजेचे आहे.
२.बारावी गुणपत्रक व प्रमाणपत्र
दहावी बरोबरच इयत्ता बारावीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देखील आपल्याला पवित्र पोर्टलवर अपलोड करावे लागणार आहे किंवा त्यातील तपशील आपल्याला सोबत भरावा लागणार आहे.
३. पदवी परीक्षा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र
जर विद्यार्थ्यांनी बीएड केलेले असेल तर त्याने डीएड करण्या अगोदर कोणत्या विषयात पदवी धारण केलेले आहे ते पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रदेखील आपल्याला सोबत ठेवावा लागणार आहे.
४. व्यावसायिक प्रमाणपत्र
विद्यार्थी डीएड धारक असतील त्यांना डीएड चे गुणपत्रक व प्रमाणपत्र व ज्यांनी बीएड केलेले असेल त्या विद्यार्थ्यांना देखील संबंधित डिग्रीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल.
५. रहिवासी दाखला
रहिवासी दाखला देखील आपल्याला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी पवित्र पोर्टल वर त्या संदर्भात देखील माहिती द्यावी लागेल.
६. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांसाठी जातीचे प्रमाणपत्र
विद्यार्थी विशिष्ट सामाजिक प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या त्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
७. नॉन क्रमिलियर प्रमाणपत्र
जे उमेदवार अनुसूचित जाती आणि जमाती सोडून इतर प्रवर्गातील आहेत आणि ते प्रगत उत्पन्न गटांमध्ये मोडत नाहीत अशाच उमेदवारांना आरक्षणाचा लाभ घेता येतो त्यासाठी त्या उमेदवारांजवळ नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र असणे अतिशय गरजेचे आहे अन्यथा त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही म्हणून विद्यार्थ्यांनी तात्काळ चालू वर्षाचे हे प्रमाणपत्र सोबत ठेवावे.
८. दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र
एखादा उमेदवार जर दिव्यांग असेल तर त्या विद्यार्थ्यांना त्या संदर्भात दिव्यांग प्रमाणपत्र सोबत ठेवावे लागेल.
९. टी ई.टी परीक्षा गुणपत्रक
जे विद्यार्थी टीईटी परीक्षा पास झालेले आहेत अशाच विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टल अंतर्गत भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेता येतो प्रत्यक्ष भरतीच्या वेळी तुम्हाला टीईटी परीक्षा गुणपत्रक सादर करावे लागेल.
१०. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
शासनाच्या नियमानुसार लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्यामुळे हे प्रमाणपत्र देखील आपल्याला सोबत ठेवावे लागेल.
११. एम एस सीआयटी प्रमाणपत्र
कोणत्या उमेदवाराला कोणत्या शासकीय भरतीसाठी अलीकडे संगणक तंत्रज्ञान असणे अतिशय गरजेचे आहे.त्यासाठी शासनाने परिपत्रक देखील काढलेले आहे. पवित्र पोर्टल द्वारे अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना देखील एमएस-सीआयटी उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.
१२. ईतर महत्वाची कागदपत्रे
ज्यांना महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी त्या महिला आरक्षणासंदर्भात लागणारी प्रमाणपत्रे सोबत ठेवावीत. त्याचबरोबर दुष्काळग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त असतील अशा उमेदवारांनी देखील तशा आरक्षणाची तरतूद असेल तर लागणारी सर्व कागदपत्रे सोबत ठेवावी.
FAQ इतर महत्वाची माहिती
1. पवित्र पोर्टल वर अर्ज करताना कोणती कागदपत्रे सोबत असावीत?
लेखात सांगितलेली सर्व कागदपत्रे सर्व गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
2. पवित्र पोर्टल वर अर्ज करताना टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे का?
हो आहे.
३.पवित्र पोर्टल कधी सुरू होईल?
पवित्र पोर्टल अंदाजे एप्रिल महिन्यात सुरू होऊ शकते
4.शिक्षक पदासाठी mscit उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे का?
होय अनिवार्य आहे.
पवित्र पोर्टल साठी आवश्यक कागदपत्रे व्हिडिओ | pavitra poratl required documents list information video
अशा पद्धतीने पवित्र पोर्टलवर नाव नोंदवण्यासाठी लागणारी आवश्यक ती सर्व कागदपत्रे आपण सोबत ठेवावीत जेणेकरून भरती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपली धावपळ होणार नाही.आमचा आजचा आलेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. ही माहिती इतरांना देखील पाठवा. धन्यवाद!