आकाशी झेप घे रे पाखरा कवितेवरील कृती |aakashi zep ghe re kavitevaril kruti
दहावीचा अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांना कविता हा घटक थोडा अवघड जातो कवितेच्या घटकावर आधारित एक प्रश्न आज आपण पाहणार आहोत तो म्हणजे कवितेवरील कृती कशा पद्धतीने सोडवाव्यात यासाठी आपणास आकाशी झेप घे रे पाखरा या कवितेवरील कृतींचा अभ्यास करणार आहोत.
आकाशी झेप घे रे पाखरा कवितेवरील कृती |
आकाशी झेप घे रे पाखरा स्वाध्याय (toc)
कवितेवरील कृती यावर प्रश्न
कवितेवरील कृती या घटकावर आपल्याला परीक्षेमध्ये दोन कवितांची नावे दिली जातात आणि त्यानंतर त्या कविते संदर्भात खालील मुद्द्यांच्या आधारे प्रश्न विचारले जातात.
आकाशी झेप घे रे पाखरा कवितेवरील कृती | akashi zep ghere yavril kruti
१)आकाशी झेप घे रे पाखराप्रस्तुत कवितेचे कवी –
जगदीश खेबुडकर
२) आकाशी झेप घे रे कवितेचा रचनाप्रकार –
गीतकाव्य,
भावकाव्य
३)आकाशी झेप घे रे कवितेचा काव्यसंग्रह –
४)आकाशी झेप घे रे कवितेचा विषय –
सामाजिक जाणिवेची
कविता. जीवनात प्रयत्न आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व या कवितेत सांगितले आहे.
५)आकाशी झेप घे रे कवितेतून व्यक्त होणारा भाव(स्थायीभाव) –
पराक्रम, शौर्य, कष्ट (वीररस)
६)आकाशी झेप घे रे कवितेच्या कवीची लेखन वैशिष्टये –
साधे, सोपे, पण अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीत लेखनाची वैशिष्टये, अल्पाक्षरत्व,
अलंकारिक भाषा, प्रतिमांचा चपखल वापर.कविता ताला सुरात म्हणता येते.
७)आकाशी झेप घे रे कवितेची मध्यवर्ती कल्पना –
कवी
पाखरांच्या प्रतिकातून माणसाच्या स्वत:च्या क्षमतांवर, सामर्थ्यावर विश्वास ठेवून ध्येयाची
उंच शिखरे पादाक्रांत करण्यास सांगतात. आयतं सुख मिळविण्याच्या मागे न लागता ‘कष्टाशिवाय
फळ ना मिळते’ यावर विश्वास ठेवून घामातून मोती फुलव असा कष्टाचे महत्व पटवून देणारा
विचार मांडलेला आहे.
८)आकाशी झेप घे रे कवितेतून व्यक्त होणारा विचार –
सोन्याच्या पिंजऱ्यात राहून रसाळ फळे खायला मिळतीलही पण हे पारतंत्रयातले सुख आहे.
अशा सुखाचा उपभोग घेत राहण्यापेक्षा स्वसामर्थ्यावर, स्वकष्टाने हव्या त्या गोष्टी
मिळवा. ध्येयाची अंच शिखरे पादाक्रांत करा.कष्टाने मिळवा. सुखाचा आनंद घ्या असा विचार
व्यक्त केला आहे.
९)आकाशी झेप घे रे कवितेतील आवडलेली ओळ –
‘कष्टाविण
फळ ना मिळते’ ही काव्यपंक्ती मला खूप आवडली. कारण या ओळीतून जीवनातील एक फार मोठे सत्य
कवीने सांगितले आहे. एखाद्याला कष्टाशिवाय संपत्ती मिळेलही; पण अशा संपत्तीचा उपभोग
फार काळ घेता येत नाही. मात्र स्वत: कष्ट करुन मिळालेल्या संपत्तीने आनंदही होतो. सुखही
लाभते.
१०)आकाशी झेप घे रे कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे-
ही कविता फार आवडली कारण हक एक गेयं काव्य आहे. एका चित्रपटात चित्रपट गीत म्हणून
हे घेतले आहे. स्वत:च्या क्षमता, सामर्थ्य हारवून बसलेल्या व आभासी सुखाचा आनंद घेणाऱ्या
माणसाला पाखराच्या रुपकातून पारतंत्र्याचे तोटे समजावून दिलेले आहेत. फार छान उपदेश
या काव्यातून केलेला आहे.म्हणून मला ही कविता आवडली.
११)आकाशी झेप घे रे कवितेतून मिळणारा संदेश –
कवी
पाखराच्या रुपकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. परावलंबित्वाचे कवच फोडून
स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद
घ्या. असा संदेश या कवितेतून मिळतो.
अशा पद्धतीने आपण आकाशी झेप घे रे पाखरा या कवितेवरील कृती सोडवू शकतो. आमचा हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा.
आमचे अप्रतिम लेख
मराठी पाठ्यपुस्तक दहावी पाठ परिचय
दहावी विषय इतिहास व राज्यशास्त्र उजळणी
दहावी मराठी पुस्तक परिचय पद्य व स्थूलवाचन