भरतवाक्य कविता मुद्द्यांच्या आधारे कृती | bharat vakya mudyanchya aadhare kruti
इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये चार गुणांसाठी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कवितेवरील कृती होय.कवितेवरील कृतींमध्ये विद्यार्थ्यांना काही मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांना अनुसरून त्या कविते संदर्भात विद्यार्थ्यांनी माहिती द्यायची असते. बोर्डाच्या परीक्षेत कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृतीसाठी चार गुण देण्यात आलेले आहेत. आजच्या लेखांमध्ये आपण भरतवाक्य कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती पाहणार आहोत. भरतवाक्य कवितेतील मुद्दे पाहिल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण कविता समजणार आहे. चला तर मग भरतवाक्य कवितेवरील आधारित कृती आपण पाहूया.
भरतवाक्य कविता मुद्द्यांच्या आधारे कृती |
भरतवाक्य (toc)
भरतवाक्य कवितेवरिल मुद्द्यांच्या आधारे कृती | bharatvakya kavitevaril kruti
भरतवाक्य कविता मुद्दे bharat vakya kavita mudde
प्रश्न खालील मुद्द्यांच्या आधारे भरतवाक्य कवितेवरील कृती सोडवा.
१) भरतवाक्य प्रस्तुत कवितेचे कवी –
मोरोपंत
२) भरतवाक्य कवितेचा रचनाप्रकार –
पंडितीकाव्य
३) भरतवाक्य कवितेचा काव्यसंग्रह –
केकावलि
४) भरतवाक्य कवितेचा विषय –
आत्मोध्दारासाठी
परमेश्वराकडे केलेले मागणे./सज्जन माणसाचे आपल्या जीवनातील महत्त्व यात सांगितले आहे.
५) भरतवाक्य कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायीभाव) –
शांतरस
६) भरतवाक्य कवितेच्या कवीची लेखन वैशिष्टये –
भाषा संस्कतप्रचुर, संवादी, ‘पृथ्वी’ या अक्षरगणवृत्तात या कवितेचे लेखन. रुपक, अनुप्रास इ. अलंकारांमध्ये लेखन.तसेच उत्तम यमक अलंकाराचा वापर या कवितेत केला आहे. शब्दांना नादसौंदर्य लाभलेले असून त्यातील अलंकार कवितेचे अर्थसौंदर्य वाढवितात.ही कविता अतिशय आशय संपन्न आहे.
७)भरतवाक्य कवितेची मध्यवर्ती कल्पना –
८) भरतवाक्य कवितेतून व्यक्त होणारा विचार –
सज्जनांची संगत घडावी, सदविचार कानी पडावेत . मन सदैव भगवतचरणी
रहावे. विषयवासनेपासून दूर सर्व कल्याणांचे स्थान परमेश्वराचे नाम, ते सदैव मुखी असावे.
परमेश्वराच्या नामस्मरणात मन राहण्यासाठी ते विकारापासून दूर झाले पाहिजे. ‘नामभक्ती’
हा परमेश्वरप्राप्तीचा मार्ग सांगितला आहे.
९) भरतवाक्य कवितेतील आवडलेली ओळ
सुसंगति सदा घडो; सुजन वाक्य कानीं पडो;
कलंक मतिचा
झडो; विषय सर्वथा नावडो;
सुभाषिताचे
मोल प्राप्त झालेल्या या ओळी मला अधिक आवडल्या आहेत. यामध्ये सज्जनांची संगत घडावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सद्विचार सदैव कानी पडावेत. बुध्दीची मलिनता झडून जाऊ दे विषय वासनेची नावड निर्माण
होवो इ. मागणे मागितले आहे. आदर्श व्यक्तित्त्वासाठी हे आवश्यक आहे असे प्रतिपादन या कवितेत केले आहे.
१०) भरतवाक्य कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –
प्रस्तुत कवितेची भाषा संस्कृत वळणाची असली तरी वाचता
वाचता सहज समजते, या कवितेत कवीने स्वत:च्या उध्दारासाठी परमेश्वराशी संवाद साधलेला
आहे. सत्कर्मात, सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून मिळते. म्हणूच
ही रचना मला फार आवडते.
११)भरतवाक्य कवितेतून मिळणारा संदेश –
माणसाने खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला बळी पडू नये. सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात रहावे हा संदेश या रचनेतून मिळतो.आपल्या भाषेत संदेश लिहावा.
आमचे हे लेख वाचा