खासदार गिरीश बापट यांचे निधन | girish bapat passed away | girish bapat yanche nidhan| गिरीश बापट यांची प्राणज्योत मालवली
भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. पुणे येथील दीनानाथ रुग्णालयामध्ये बऱ्याच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते या आजाराशी त्यांची ती झुंज आज अखेरची ठरली. दिनानाथ रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी या जगाला कायमचा रामराम केला. भाजप पक्षाची यशस्वी वाटचाल आणि वाढ व्हावी यासाठी गिरीश बापट यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांच्या जाण्याने भाजप पक्षाला खूप मोठा धक्का बसला आहे.
खासदार गिरीश बापट यांचे निधन |
गिरीश बापट जीवनपट (toc)
गिरीश बापट यांची राजकीय कारकीर्द
गिरीश बापट 1973 पासून म्हणजेच गेली 40 वर्ष ते राजकारणामध्ये सक्रिय होते. कसबा पोटनिवडणुकीच्या बाबतीमध्ये सांगायचे झाले तर इतके आजारी असून देखील त्यांनी प्रचारामध्ये सहभाग घेतला होता.
गिरीश बापट यांची राजकारणात एन्ट्री प्रवेश
गिरीश बापट नेमके राजकारणामध्ये कसे आले? हे सांगायचे झाले तर साधारणपणे 1973 मध्ये ते पुणे येथील टेल्को कंपनीमध्ये कामाला होते. एक कामगार नेता म्हणून त्यांना विशेष असा मान होता. आपली नोकरी सांभाळून ते कामगार संघटनेमध्ये सक्रिय होते. कामगार संघटनेतील त्यांचे नेतृत्व पाहून हळूहळू ते पुणे महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये सक्रिय होऊ लागले. सर्वप्रथम 1983 झाली त्यांनी पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाची निवडणूक लढवली. त्या निवडणुकी मध्ये त्यांना पहिल्याच प्रयत्नात यश आले.
गिरीश बापट यांचे राजकारणातील यश
गिरीश बापट यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरसेवक पदापासून केली. महानगरपालिकेमध्ये तीन वेळा ते नगरसेवक पदावर निवडून आले. कालांतराने त्यांचा राजकीय दबदबा वाढू लागला आणि पुणे ते एक राजकीय नेते म्हणून नावारूपाला आले. 1993 साली ते कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये सर्वप्रथम उभे राहिले परंतु त्या पहिल्याच आमदारकीच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु आमदारकीची सुरुवात जरी परावापासून झाली असली तरी पुढे सलग पाच वेळा ते कसबा पेठ मतदारसंघांमध्ये आमदार म्हणून विजयी झाले. चे मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची आजही भाजप पक्षामध्ये ओळख आहे.
गिरीश बापट यांचे कार्य
बापट यांनी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्यांवरती मंत्री म्हणून काम पाहिले. पुण्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी पुण्यासाठी अतिशय प्रभावी योजना आणल्या आणि त्यांची अंमलबजावणी देखील केली.
गिरीश बापट यांची खासदारकी
गिरीश बापट यांचा राजकारणातील दांडगा अनुभव पाहून भाजप पक्षाने 2019 मध्ये त्यांना खासदारकीचे तिकीट दिले या खासदारकीच्या तिकिटावर ते प्रचंड बहुमताने निवडून आले. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांना आरोग्याच्या समस्या उद्भवत होत्या तरीदेखील ते आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत राजकारणामध्ये सक्रिय राहिले.
पुण्याची कसबा पोटनिवडणूक आणि बापट
नुकतीच पुणे येथे झालेली कसबा पोटनिवडणूक की जे भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा मतदारसंघांमध्ये झाली. अगदी सुरुवातीला कसबा पोटनिवडणुकीमध्ये आपल्या शरीर स्वस्थ्यामुळे ते प्रत्यक्ष प्रचाराला हजर राहतील की नाही याविषयी शंका होती. परंतु आपले भाजप पक्षाप्रती असणारे प्रेम आणि आपली एक राजकारणी म्हणून असलेली जबाबदारी लक्षात घेऊन पोटनिवडणुकीच्या प्रचारामध्ये गिरीश बापट व्हीलचेअर घेऊन प्रचारासाठी हजर राहिले. नव्हे तर आपला मतदानाचा अधिकार देखील त्यांनी बजावला.
बापट यांच्या मनाचा मोठेपणा
खासदार गिरीश बापट यांच्या मनाचा मोठेपणा याबाबत सांगायचे झाले तर आपल्या मतदारसंघात खासदार निधीतून विविध कामे करत असताना कसबा गणपती समोर त्यांनी जी विकास कामे सुरू केली त्या विकास कामांच्या कार्यक्रमाला काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र दंगेकर यांना देखील त्यांनी त्या कार्यक्रमासाठी बोलावले होते. या कार्यक्रमासाठी भाजपमधील पराभूत झालेले हेमंत रासने यांना देखील त्या ठिकाणी बोलवून राजकारणामध्ये कोणी कोणाचा वैरी नसतो असा एक आदर्श खासदार गिरीश बापट यांनी या प्रसंगातून घालून दिला. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राष्ट्रातील भाजपचे एक वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
गिरीश बापट निधन बातमी व्हिडिओ | girish bapat nidhan video | girish bapat nidhan breaking news marathi
आमचे अप्रतिम लेख