Type Here to Get Search Results !

खोद आणखी थोडेसे कविता मुद्द्यांच्या आधारे कृती | khod aankhi thodese mudyanchya aadhare kruti

 

खोद आणखी थोडेसे  कविता मुद्द्यांच्या आधारे कृती | khod aankhi thodese  mudyanchya aadhare kruti 

इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये चार गुणांसाठी एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कवितेवरील कृती होय.कवितेवरील कृतींमध्ये विद्यार्थ्यांना काही मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांना अनुसरून त्या कविते संदर्भात विद्यार्थ्यांनी माहिती द्यायची असते. बोर्डाच्या परीक्षेत कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृतीसाठी चार गुण देण्यात आलेले आहेत. आजच्या लेखांमध्ये आपण खोद आणखी थोडेसे कवितेवरील मुद्द्यांच्या आधारे कृती पाहणार आहोत.  खोद आणखी थोडेसे कवितेतील मुद्दे पाहिल्यानंतर आपल्याला ही संपूर्ण कविता समजणार आहे. चला तर मग खोद आणखी थोडेसे कवितेवरील आधारित कृती आपण पाहूया. 


खोद आणखी थोडेसे  कविता मुद्द्यांच्या आधारे कृती
खोद आणखी थोडेसे  कविता मुद्द्यांच्या आधारे कृती


 

खोद आणखी थोडेसे कवितेवरील कृती(toc) 


प्रश्न खोद आणखी थोडेसे कवितेच्या खालील मुद्यांच्या आधारे कृती सोडवा.   


१)  खोद आणखी थोडेसे कवितेचे कवी/ कवियत्री – 

        आसावरी काकडे


२) खोद आणखी थोडेसेकवितेचा रचनाप्रकार – 

           अष्टाक्षरी रचना


३)खोद आणखी थोडेसेकवितेचा काव्यसंग्रह –

                        लाहो


४) खोद आणखी थोडेसे कवितेचा विषय –

           सामाजिक जाणिवेची कविता/आपल्या जीवनात प्रयत्न किती गरजेचे आहेत याचे महत्त्व या कवितेत सांगिले आहे. 


५) खोद आणखी थोडेसे कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायीभाव) – 

                      आनंद, पराक्रम, कष्ट 


६) खोद आणखी थोडेसे  कवितेच्या कवीची लेखन वैशिष्टये –

          अष्टाक्षरी रचना, अल्पाक्षर हे खास वैशिष्टय, भाषा संवादी आहे. पाणी-नाणी, मनी, पानी असे छान यमक साधलेले ओत. खोटी नाणी, मनातली तळी, मिटलेली मूठ इ. प्रतिमांचा वापर करुन वर्णन केलेले आहे.आशय संपन्न भाषा शैली हे देखील या कवितेचे वैशिष्ट्ये आहे. 


७) खोद आणखी थोडेसे कवितेची मध्यवर्ती कल्पना – 

ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न सकारात्मकता यांची गरज असतेच परंतु तरीही निराशा येते तेव्हा प्रयत्न सोडून देण्याच्या अवस्थेला आपण येतो. अशावेळी आणखी थोडेसे असे उमेद वाढविणारे प्रेरणादायी शब्द कानावरं पडले तर पुन्हा प्रयत्न करुन यश मिळतेच फक्त धीर सोडायला नको, जिददीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने फक्त कार्यरत रहावे.


८)खोद आणखी थोडेसे कवितेतून व्यक्त होणारा विचार –

 कार्य करीत असताना अनेकदा निराशा वाटयाला येते, इच्छित ध्येयासाठी प्रयत्न करुनही यश हाती लागत नाही असे वाटते. अशावेळी प्रयत्न सोडून देण्याचा विचार मनात येतो पण ‘आणखी थोडेसे’ अशा शब्दात मनाला प्रेरणा दिली तर पुन्हा जोमाने प्रयत्न करुन ध्येयाप्रत पोहोचता येते. उमेदीने जगायला हवे. हा विचार या कवितेतून मांडलेला आहे.


९) कवितेतील आवडलेली ओळ –  

‘खोद आणखी थोडेस

 खाली असतेच पाणी’  

या कवितेच्या शीर्षक गीताच्या व सुरुवातीच्याच ओळी मला अधिक आवडल्या. कारण यामध्ये कवयित्री प्रयत्न सोडून देण्याच्या अवस्थेला आलेली असते. आपल्या मनाला ‘आणखी थोडेसे’ अशा शब्दात प्रेरणा देताना दिसते. कारण जिददीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत राहिल्यास यश मिळतेच खाली असतेच पाणी हा उमेद वाढविणारा संदेश दिला आहे.


१०)कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे –

 कविता आवडली कारण रचना अष्टाक्षरी आहे. या कवितेत प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे जीवनाती अनन्य साधारण महत्व सांगितले आहे. ध्येय साध्य करताना अपयश येते, प्रयत्न सोडून देण्याचा विचार मनात येतो पण अशावेळी ‘आणखी थोडेसे’ असे प्रेरणादायी शब्द, उमेद वाढविणारे शब्द कानावर पडले तर यशासाठी प्रयत्न निश्चित केले जातात.


११)  कवितेतून मिळणारा संदेश – 

ध्येय साध्य करताना संयमाने, जिददीने, आत्मविश्वासाने, चिकाटीने कार्यरत रहावे लागते.चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. वास्तव आनंदाने स्वीकारवे आणि कोणत्याही भ्रमात राहू नये. उमेदीने जग्यासाठी कष्टाची कास धरावी असा संदेश मिळतो.


आमचे हे लेख वाचा 

वस्तू कवितेवरील कृती 

तू झालास मुक समाजाचा नायक कवितेवरील मुद्दे कृती 

भारत वाक्य कवितेवतील प्रश्न कृती मुद्दे 

     मराठी पाठ्यपुस्तक दहावी पाठ परिचय 

     दहावी  विषय इतिहास व राज्यशास्त्र उजळणी 

     दहावी मराठी पुस्तक परिचय पद्य व स्थूलवाचन

    दहावी भूगोल महत्वाचे प्रश्न 

    गुढीपाडवा सणाची माहिती 

     शिवाजी महाराज माहिती 

   आमचे वाबळे गुरुजी 

    ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन  

   राम नवमी मराठी माहिती 

  भ्यास कसा करावा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area