इयता दहावी रसग्रहण नमुने ssc rasgrahan question prepration |रसग्रहण प्रश्नांची तयारी
इयता दहावी बोर्ड परीक्षेत कविता या घटकावर विविध प्रश्न विचारले जातात. त्यातील रसग्रहण हा प्रश्न आहे. म्हणूनच आजच्या लेखात रसग्रहण प्रश्नांचे काही नमुने आपण पाहणार आहोत. हे पाहिल्यावर रसग्रहण करणे किती सोपे आहे हे आपल्याला समजेल.
इयता दहावी रसग्रहण नमुने |
दहावी रसग्रहण आदर्श उत्तरे (toc)
दहावी बोर्ड परीक्षा रसग्रहण प्रश्नांची तयारी कशी करावी ?
बोर्डाच्या परीक्षेत रसग्रहण करत असताना आपल्याला तीन परीचेद बनवावे लागतात. त्याची माहिती पुढीलप्रमाणे
१. पहिल्या परीचेडात आपल्याला दिलेल्या ओली कोणत्या कवितेतील आहेत. तसेच त्या कवितेचे कवी कोण आहेत?याची माहिती द्यावी लागते.
२. दुसऱ्या परीचेडात आपल्याला दिलेल्या ओळींचा अर्थ स्पष्ट करायचा असतो. तो जरा सविस्तर लिहावा.
३. तिसऱ्या परीचेडात कवीची जी रचना आहे त्याची भाषिक वैशिष्ट्ये लिहावीत. तसेच त्या कवितेतील अलंकार यासारखी वैशिष्टे लिहावीत.
चला तर काही रासग्रहणाचे नमुने पाहूया यातून आपल्याला हा घटक किती सोपं असतो हे समजेल.
दहावी रसग्रहण प्रश्नांचे नमुने आदर्श रसग्रहण नमूना उत्तर कसे असावे ?
रसग्रहण नमूना उत्तर कसे असावे ?
१)खालील ओळ्यांचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा.
‘जनी आर्जव तोडूं नये! पापद्रव्य जोडूं नये।
पुण्यमार्ग सोडूं नये। कदाकाळीं॥
उत्तर: ही ओळ ‘उत्तमलक्षण’ या कवितेतील असून यात कवीने उत्तम लक्षणे सांगितलेली आहेत.
आदर्शत्वाची संकल्पना मांडत असताना संत रामदास स्वामी म्हणतात की, समाजव्यवस्थेमध्ये
राहत असताना समाजातील प्रत्येक व्यक्तीशी वर्तन करताना सरळपणाचे वर्तन केले पाहिजे.
वाईट मार्गाचा अवलंब करुन धनसंपत्ती जोडण्यामध्ये काहीच अर्थ नाही. जीवन जगताना नीतीधर्माचा
मार्ग हा सर्वश्रेष्ठ आहे हा मार्ग स्वीकारला पाहिजे. हा मौलिक संदेश संत रामदास
स्वामी यांनी या काव्यपंक्तीतून दिलेला आहे.
या कवितेतील भाषा उपदेशपर आहे. कविता जीवनात उपयोगी पडणारी आहे. (अशा पद्धतीने ३ para बनवता येतील.
२)रसग्रहण करा.
‘सभेमध्ये लाजों नये। बाष्कळपणें बोलों नये।
या ओळीतील विचार स्पष्ट करा.
उत्तर : वरील काव्यपंक्ती ही ‘उत्तमलक्षण’ या काव्यरचनेतील आहे. या कवितेचे कवी संत रामदास
आहे. या काव्यरचेमध्ये आदर्श व्यक्तीची वैशिष्ट्ये सांगितलेली आहे.
चारचौघामध्ये किंवा सभेमध्ये
बोलताना मनी लाज धरू नये. पण त्याचबरोबर आचरटपणे काहीही बोलू नये. आपल्या बोलण्याला
काही तरी अर्थ असला पाहिजे. आपल्या शब्दाला किंमत असली पाहीजे. बडबड आणि बाष्कळपणे
बोलण्याला समाजरचेमध्ये शून्य अर्थ आहे. मोजके बोलणे हे व्यक्तीमत्वाचे उत्तम लक्षण
होय. हा विचार वरील ओळीतुन अभिप्रेत होत आहे.
तिसऱ्या para मध्ये वरीलप्रमाणे भाषिक वैशिष्ट्ये लिहिणे अपेक्षित आहे.
तुम्हाला समजलेला अर्थ यावरील नमूना प्रश्न
३) आळसें सुख मानूं नये। या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा.
वरील ओळ ही ‘उत्तमलक्षण’
या काव्यरचनेतील असून याचे कवी संत रामदास आहेत. संत रामदास यांनी व्यक्तीमध्ये कोणते
गुण असावेत कोणते गुण असू नयेत याचा विचार मांडला आहे.
आळस हा माणसाचा शत्रू
आहे. आळसाला जीवनामध्ये कधीही सुख मानू नये. आळसामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास खुंटतो.
हा अवगुण शरीरामध्ये वास केल्यावर याचे विपरीत परिणाम मानवाला दिसून येतात. आळसी व्यक्ती
हा जीवनाच्या कोणत्याही परीक्षेत उत्तीर्ण होऊ शेत नाही. आळसाला मानवी शरीरापासून,
तत्वापासून दूरच केले पाहिजे. हा विचार संत रामदास यांनी वरील आळीमधून मांडलेला आहे.
१ काव्यपंक्तीचे रसग्रहण करा.
‘तोंडाळासीं भोंडो नये। वाचाळासीं तंडों नये।
संतसंग खंडूं नये। अंतर्यामी॥ रसग्रहण करा.
उत्तर: कवी/कवयित्री, संदर्भ:
वरील
काव्यपंक्ती ही ‘उत्तमलक्षण’ या काव्यरचनेतील ‘श्रीदासबोध- दशक व्दितीय समास दुसरा’
– यातून घेतलेली आहे.
काव्यपंक्तीतून मिळणारा संदेश:
संत
रामदास यांनी ‘उत्तमलक्षण’ काव्यरचनेतून आदर्शव्यक्तीची संकल्पना स्पष्ट करत असताना.
भांडखोर किंवा शिवराळ व्यक्तीशी भांडू नये. वाचाळ व्यक्तीशी वाद घालू नये. सज्जन गुणांचा
पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीची कायम संगत करावी. सज्जन व्यक्तीच्या संगतीमध्ये कधीही
खंड पडू नये. मनामध्ये नेहमी सज्जनाची संगती असली पाहिजे हा संदेश वरील काव्यपंक्तीतून
देण्यात आला आहे.
भाषिक वैशिष्टये:
वरील
काव्यपंक्तीतून सामाजिक जाणीव नैतिक व अध्यात्मिक उन्नतीविषयी अखंड जागरुकता आणि अतीव
तळमळ संत रामदास यांच्या काव्यात आढळते. वरील काव्य पंक्तमध्ये शंत रसाचा वापर केलेला
आहे.
विचारसौंदर्य या घटकावर प्रश्न
१) कवितेच्या आधारे आदर्श व्यक्तीची लक्षणे तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर: ‘उत्तमलक्षण’ या काव्यरयचनेत संत रामदास यांनी आादर्शत्वाची संकलपना मांडलेली आहे. आदर्शव्यक्ती ही संकल्पना पूर्णत्वास येण्यासाठी व्यक्तीमध्ये असणरे गूण कोणते असावे हे कवितेच्या आधारे करावयाचे असल्यास कोणत्याही ठिकाणी पडलेली वस्तू घेऊ नये. इतर व्यक्तीसोबतचे वर्तन हे आपले सरळभावनेचे असले पाहिजे. वाईट मार्गाचा अवलंब करुन धनसंपत्ती जोडू नये. सज्जन व्यक्तीची साथ सोडू नये. आळसाला सुख मानू नये. वाचाळाशी वाद घालू नयेा. सत्यमार्ग सोडू नये. अभिमान मानू नये. बाष्कळपणे बोलू नये. आपली सर्त्कीती वाढवावी. ही लक्षणे आदर्शव्यक्तीमध्ये असतात.
उत्तर: शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन आहे. मानवाने आज जी अचाट अशी प्रगती केली आहे ती शिक्षणाच्या बळावरच. समाजामध्ये पर्यायाने मानवामये अवगूण आहेत. मानवामधील अवगूण नष्ट करण्यासाइी शिक्षणाचा आधार घेतला पाहिजेञ मानवी अवगूण नष्ट झाले तर शिक्षणाला महत्व आहे. म्हणजे मानवातील सदगूणचा विकास झाला पाहिजे. सदगूणचा विकास म्हणजे शिक्षण होय. सदगूणचा विकास नाही झाला तर शिक्षणला अर्थ राहत नाही.
अशा प्रकारे काव्य घटकावर बोर्ड परीक्षेला विचारले जाणारे विविध नमुने आज आपण पहिले. यात पाठांतर न करता आपण आपल्या भाषेत कोणत्या प्रश्न प्रकाराला उत्तर काय अपेक्षित असते याची आपल्याला नक्कीच कल्पना आली असेल.
आमचे हे लेख वाचा