डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 | Doctor Babasaheb Ambedkar Jayanti speech in Marathi 2023
14 एप्रिल हा शब्द उच्चारताच समोर उभा राहतो तो भीम जयंती अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा अभूतपूर्व उत्सव. भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले या महापुरुषांपैकी एक अलौकिक तेजस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण भारतभर अनेक कार्यक्रम होत असतात. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गासाठी तसेच एकंदरीतच जो वर्ग समाजामध्ये कायम दुर्लक्षिला गेला अशा सर्वच वर्गांसाठी कायदेशीर तसेच आंदोलनाच्या मार्गाने उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.दलितांचा हुंकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. 14 एप्रिल हा दिवस आपण सर्वजण एकत्र येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणून अगदी जल्लोषात साजरा करतो. परंतु खरे बाबासाहेब आपल्याला समजायचे असतील किंवा समजून घ्यावयाचे असतील तसेच त्यांचे विचार आपल्या रक्ता रक्तामध्ये भिडायचे असतील तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसाद करणे अतिशय गरजेचे आहे. आंबेडकर जयंतीला आंबेडकर जयंती निमित्त भाषण रूपाने आपल्याला बाबासाहेब कळत जातात. दहा पुस्तके वाचण्यापेक्षा एखाद्या वक्त्याचे भाषण जरी आपण ऐकले तरी त्यातून आपल्याला खूप मोठे ज्ञान मिळू शकते. म्हणूनच आज आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठीकी जे आपली मायबोली मराठी आहे या मायबोली मध्ये म्हणजेच (Doctor Babasaheb Ambedkar Jayanti speech in Marathi) आपल्याला समजेल उमजेल अशा भाषेत बाबासाहेबांचे विचार आपल्यापर्यंत घेऊन आलो आहोत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती भाषण मराठी 2023 |
आंबेडकर जयंती भाषण (toc)
आंबेडकर जयंती अप्रतिम मराठी भाषण 2023 | ambedkar jayanti apratim marathi speech 2023 | आंबेडकर जयंती छोटे मराठी भाषण 2023 | Ambedkar jayanti chote marathi bhashan speech 2023
कोणत्याही महान नेत्याची जयंती असो की शाळा महाविद्यालयामध्ये कोणताही कार्यक्रम असो अलीकडच्या काळामध्ये शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना या थोर व्यक्तीच्या जयंती पुण्यतिथी निमित्त त्या व्यक्तीच्या कार्याची थोरवी आपण थोडी तरी वर्णन करावी असा मोह होत असतो.थोडक्यात भाषण करण्याचा मोह होत असतो. आपण कोणत्याही भाषणाची तयारी करत असताना, सर्वप्रथम आपल्याकडे त्या व्यक्तीविषयी काही पायाभूत माहिती असणे गरजेचे आहे. जसे की आंबेडकर जयंतीच्या भाषणाची आपण तयारी करत असाल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील ठळक घडामोडी माहीत असायला हव्यात. आणि त्या घडामोडींची मांडणी आपण अगदी सुंदर रीतीने करायला हवी.आपले Ambedkar Jayanti speech अर्थात भाषण रटाळ न वाटता ते श्रोत्यांना लक्ष केंद्रित करण्यासाठी भाग पाडणारे असावे. जर आपण Doctor Babasaheb Ambedkar Jayanti speech in Marathi देत असाल तर आपल्या भाषणाची सुरुवात अतिशय सुंदर असावी.चला तर एक सुंदर असा भाषणाचा नमुना पाहूया ज्यातून तुम्हाला आंबेडकर जयंती निमित्त भाषण करत असताना कोणत्याही प्रकारचा दबाव येणार नाही.
आंबेडकर जयंतीच्या भाषणाची सुरुवात | Ambedkar jayntichya bhashnachi suruvat
मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तुत्वाची
तुम्ही जगाला शिकवली व्याख्या
माणसातल्या माणुसकीची
तुम्ही कोणी देव नव्हताच बरे
तुम्ही देवदूत देखील नव्हता
तुम्ही होता मानवतेची पूजा करणारे
खरे महामानव .
@@आंबेडकर जयंती मराठी शायरी 👈पाहण्यासाठी टच करा
अशा महान व्यक्तिमत्त्वाला सर्वप्रथम माझा सलाम. नमस्कार ! मी अबक आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी माझे विचार आपणापुढे मांडणार आहे तत्पूर्वी अध्यक्ष ,महाशय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!
आकाशाचा कागद केला
नि समुद्राची शाई केली
तरी त्यांचे कार्य वर्णन करायला कमी पडेल
@आंबेडकर जयंती अप्रतिम मराठी शुभेछा 👈
असे भारतरत्न ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, दलितांचे कैवारी , उपेक्षितांचे आधारस्तंभ ,मानवतेचे खरे पुजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मी आज त्यांच्या जयंतीनिमित्त माझे विचार (भाषण) मांडणार आहे ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव सपकाळ. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेश राज्यातील महू या गावी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सैन्यामध्ये सुभेदार पदावर होते. त्यामुळे त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कोलंबिया विद्यापीठात पुढील शिक्षण घेण्यासाठी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली. याच मदतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एम ए व पुढे पीएचडी करून पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. थोडक्यात अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. मोडेल पण वाकणार नाही अशा स्वभावाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्मातील चातुर वर्ण व्यवस्था म्हणजे अशी व्यवस्था की जी माणसाला माणसासारखी वागवत नव्हती. याची प्रचंड चीड आंबेडकरांना येत होती.म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले अवघे आयुष्य दलितांच्या उद्धारासाठी खर्ची घातले.
@आंबेडकरांचे ५० प्रेरणादायी विचार 👈
मूकनायक पाक्षिकाच्या माध्यमातून दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले. व्यक्तीला जर आपला उद्धार करायचा असेल शिक्षणाशिवाय दुसरे प्रभावी साधन नाही यासाठी त्यांनी तरुणांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. परंतु अलीकडच्या काळातील तरुण संघटित आहे व संघर्ष देखील करत आहे परंतु पहिला जो मुद्दा बाबासाहेब यांनी अग्रक्रमाने सांगितला तो म्हणजे शिका. या गोष्टीकडे कुठेतरी दलित वर्गआज दुर्लक्ष करताना दिसत आहे ही खरी खेदाची बाब आहे. आज देखील दलित वर्गातील हाताच्या बोटावर मोजण्या इतपत लोक पुढारलेले आहेत याचे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो शिकण्याचा म्हणजे शिक्षण घेण्याचा अनमोल संदेश दिला तो संदेश या तरुण वर्गाने तितकासा मनावर घेतलेला दिसत नाही यावर विचार होणे गरजेचे आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्व जाणले आणि म्हणूनच त्यांनी मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ महाविद्यालयाची स्थापना केली तर औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. जेणेकरून उपेक्षित आणि दलित वर्गातील मुले शिक्षण घेतील आणि त्यांच्यामध्ये एक वैचारिक क्रांती होईल यामुळे समाजामध्ये असणारी जातीयता कायमची नष्ट होईल. अशी त्यांची यामागील भूमिका होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कायदामंत्री म्हणून जबाबदारी हाती घेतली. शेतकरी ,मजूर, स्त्रिया ,दलित यांच्यासाठी भविष्यामध्ये विकासाच्या अनेक तरतुदी करून ठेवल्या. की ज्या तरतुदींमुळे आज स्त्रिया सन्मानाने शिक्षण घेत आहेत. दलित वर्गातील लोक उच्च पदावर विराजमान झालेले दिसत आहेत. या सर्वांचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा राज्यकारभार नीट व्हावा यासाठी भारताला नव्याने राज्यघटना निर्माण करणे गरजेचे होते. या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते आणि अगदी कमी वेळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करून आणि आपल्या भारतातील समाज व्यवस्था या सर्वांचा विचार करून आज जगातील सर्वात परिपूर्ण अशी राज्यघटना निर्माण केली म्हणूनच आज भारतीय राज्यघटनेची ओळख जगभरात आदर्श राज्यघटना म्हणून आहे त्याचे सर्व श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते.
@बाबासाहेब आंबेडकर अप्रतिम मराठी निबंध 👈
बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गाच्या सन्मानासाठी आणि त्यांना माणसाप्रमाणे वागणूक मिळावी यासाठी चवदार तळ्याचा सत्याग्रह तसेच काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी केलेला सत्याग्रह केले. या सर्वांमागे त्यांची एकच भूमिका होती माणसाला माणसाप्रमाणे जगू द्या आणि कुठेतरी हिंदू धर्म या सर्व बाबींमध्ये कमी पडताना दिसत होता म्हणूनच त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी मानवतेची शिकवण देणाऱ्या भेदाभेद अमान्य असणाऱ्या बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि दलित वर्गाला सन्मानाने जगण्याची एक दिशा दाखवली.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर केल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये म्हणजे 6 डिसेंबर 1956 रोजी वयाच्या अवघ्या 65 व्या वर्षी या महामानवाचे महापरिनिर्वाण झाले. अवघा दलित वर्ग त्यांच्या जाण्याने धाय मोकलून रडू लागला. आज आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जर त्यांना खरी आदरांजली अर्पण करायची असेल तर मी कोणावर अन्याय करणार नाही आणि कोणाचा अन्याय सहन करून घेणार नाही हिच त्यांच्यासाठी खरी आदरांजली असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे जे महत्व सांगितले त्या शिक्षणाकडे मी जाणीवपूर्वक पाहीन. असा जरी संकल्प केला तरी खूप झाले.दलित वर्गातील मुलांसाठी शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लाखो रुपयांचे अनुदान देते.
अशा या महामानवाला त्यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी वंदन. एवढे बोलून आंबेडकर जयंतीच्या माझ्या लांबलेल्या भाषणाला विराम देताना एवढेच म्हणेन.....
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे भारत देश की शान है
हर देशवासी के हृदय मे वे आज भी विराजमान है
देश और समाज की उन्नती के लिए किये उन्होने हजारो काम
इसलिये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर है सबसे महान
आंबेडकर जयंतीच्या भाषणाचा विडिओ ambedkar jayanti marathi speech video
आम्ही आंबेडकर जयंतीचे दिलेले सोपे मराठी भाषण शिक्षक बंधु भगिनी याना आपल्या विद्यार्थ्यांना आवर्जून पाठवा. धन्यवाद !
आमचे हे लेख जरूर वाचा
नव्याने सुरू होत असलेले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ संपूर्ण माहिती 👈
वाढत्या तापमानात स्वताची काळजी घेण्यासाठी काही टिप्स