Type Here to Get Search Results !

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023 | dr BabaSaheb Ambedkar essay in Marathi 2023

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023 | dr BabaSaheb Ambedkar essay in Marathi 2023

14 एप्रिल हा दिवस आपण महामानव ,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ,भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आंबेडकर जयंती म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वर्गासाठी केलेले कार्य हे खरोखरच खूप उल्लेखनीय आहे.आज आपण dr BabaSaheb Ambedkar essay in Marathi 2023 पाहणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023 पाहिल्यानंतर आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उघडणार आहेत.चला तर निबंध पाहूया.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023



बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध (toc)


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023 | dr BabaSaheb Ambedkar essay in Marathi 2023 Doctor babsaheb anbedkar marathi nibandh 2023 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदू धर्मातील चातुरवर्णी व्यवस्था अजिबात मान्य नव्हती. त्यांनी या समाज व्यवस्थेवर सडकून टीका केली.या विषमतावादी समाजाचे चित्र बदलायचे असेल तर व्यक्तीला स्वतःमध्ये आपल्या क्षमता विकसित कराव्या लागतील. यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनामध्ये शिक्षणाला प्रचंड महत्व दिले. कारण त्यांच्या मते व्यक्ती जर ज्ञानी असेल तर समोरच्या व्यक्तीला त्याच्या ज्ञानाला सलामा करावाच लागतो. त्यांचे शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे  म्हणणे खरोखरच रास्त होते.

बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेत असताना जातीभेद ,अस्पृश्यता, गरिबी या सर्वांचे चटके सहन करत आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर देखील ते स्वतःला नेहमी विद्यार्थी समजत होते आणि कायम नवीन शिकण्याचा त्यांचा अट्टाहास होता. 1933 मध्ये परळ येथील एका सभेत त्यांनी माझे संपूर्ण आयुष्य विद्यार्थी म्हणून जावे अशी इच्छा व्यक्त केली होती. ज्ञानाची भूक लागावी म्हणून मी पोटाची भूक मारून अनेक ग्रंथ खरेदी केले असे देखील त्यांनी त्या भाषणात सांगितले होते. वाचनाची आवड जोपासण्यासाठी त्यांनी प्राध्यापकाची नोकरी काही काळ केली, परंतु कालांतराने अस्पृश्यांचे प्रश्न आणि सामाजिक प्रश्न लक्षात घेऊन त्यांनी दलित चळवळ पुढे नेन्यावर भर दिला. स्वतःला निवारा म्हणून नाहीतर पुस्तकांसाठी मला एक टोलेजंग घर असावे असा विचार मांडणारे बाबासाहेब संपूर्ण जगातील एक विद्वान महापुरुष ठरले.


@आंबेडकर जयंती  अप्रतिम मराठी शुभेछा  👈


dr babasaheb ambedkar in marathi nibandh 2023 बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर मराठी निबंध 2023 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा ,अर्थशास्त्र ,समाजशास्त्र ,राज्यशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान पत्रकारिता, शिक्षण ,धर्मशास्त्र  व राज्यघटना अशा कितीतरी विषयांचा अभ्यास अगदी सहजपणे त्यांनी केला. अभ्यास किंवा वाचन करत असताना त्यांचा एकच हेतू होता की ,या ज्ञानाच्या माध्यमातून मानवाचे दुःख निवारण झाले पाहिजे आणि याचेच फलित म्हणून भेदभाव मानणाऱ्या , माणसाला माणसासारखी वागणूक न देणारा हिंदूधर्म नाकारून त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. आंबेडकरांच्या शिक्षणाविषयी सांगायचे झाले तर त्यांनी 32 विषयांमध्ये पदव्या मिळवल्या होत्या. म्हणूनच त्यांना 500 ग्रॅज्युएटच्या बरोबरीचे महामानव असे म्हटले जायचे.

बाबासाहेब आंबेडकर यांनी आठ वर्षांचा अभ्यासक्रम केवळ दोन वर्ष आणि तीन महिन्यांमध्ये पूर्ण केला. यावरून त्यांच्या बुद्धिमत्तेची कल्पना आपल्याला येते. विसाव्या शतकातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखले जाते. हॉवर्ड विद्यापीठाने दि मेकर्स ऑफ द वर्ल्ड या पुस्तकामध्ये जगातील शंभर विद्वानांचा आढावा घेतलेला आहे. यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. यावरून त्यांची जागतिक स्तरावरील ख्याती आपल्याला समजून येते. खेदाची बाब की बाबासाहेब किती मोठे होते नि आहेत. हे भारतीयांपेक्षा  परकीय राष्ट्रांनी अधिक जाणले.

आंबेडकर यांच्या मते, शिक्षण हेच समाजाच्या क्रांतीचे खरे साधन आहे. जर माणसाला शिक्षण नसेल तर माणूस तात्काळ गुलाम होतो म्हणून शासनाने सक्तीचे शिक्षण आणि ते देखील मोफत दिले पाहिजे असा विचार त्यांनी त्या काळामध्ये मांडला होता. आपल्याकडे ज्ञान असेल अभ्यास असेल तर समोरचा व्यक्ती तुमच्यावर हुकूमशाही किंवा दादागिरी करू शकत नाही. असा देखील विचार त्यांनी हैदराबाद येथील एका विद्यार्थी मेळाव्यामध्ये मांडला होता. थोडक्यात काय तर माणसाजवळ ज्ञान असणे अतिशय गरजेचे आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांनी वक्तृत्व कलेला देखील प्रचंड महत्व दिलेले आहे. जर आपल्याजवळ वक्तृत्व असेल तर आपण शत्रूला आपल्या वक्तृत्वाद्वारे त्याची जागा दाखवू शकतो. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या सभांना ,भाषणांना लाखोंची गर्दी होत होती. विद्यार्थ्यांनी स्वच्छता ,मेहनती व  स्वाभिमानी असणे, भरपूर वाचन करणे या बाबी जर अंगीकारल्या तर भविष्यामध्ये त्यांना मानसन्मान आपोआप मिळेल असा देखील सल्ला ते आपल्या भाषणांमध्ये देत होते.


@@आंबेडकर जयंती कविता चारोळ्या  👈 KLIK 


बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासाची प्रचंड आवड होती. घरची परिस्थिती बेताची असून देखील बाबासाहेबांच्या वडिलांनी त्यांना कायम नवीन पुस्तके खरेदी करून त्यांची वाचनाची आवड जोपासली 1907 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले.आपले मॅट्रिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले. विद्यार्थी दशेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिवसाचे12 तास देखील कमी पडत होते. ते ज्या खोलीमध्ये राहायचे त्या खोलीतील मुले गोंधळ करायला लागली की आता अभ्यास कसा करायचा अशावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या कानामध्ये कापसाचे बोळे घालून अभ्यास करत होते. इतकी ज्ञानलालसा असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एकमेव उदाहरण आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ पुस्तकी शिक्षण घेतले नाही तर आपल्या समाजापुढे असणारे असंख्य प्रश्न यांची उत्तम जाण त्यांना होती म्हणूनच की काय घटना समितीने त्यांच्यातील हा गुण जाणून त्यांना राज्यघटनेच्या मसुदा समितीची जबाबदारी दिली.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना सामावून घेईल अशी भारतीय राज्यघटना तयार केली. या राज्यघटनेने तळागाळातील लोकांना स्वाभिमानाने  जगण्याचा मार्ग दाखवून दिला.

गोरगरीब लोकांना शिक्षण मिळावे ? यासाठी त्यांनी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी सिद्धार्थ महाविद्यालय तर औरंगाबाद या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना करून तरुणांसाठी शिक्षणाची द्वारे खुली करून दिली.1924 मध्ये त्यांनी  बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली. यामागे एकच उद्देश होता अस्पृश्य म्हणजेच बहिष्कृत वर्गामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा. शिक्षणाविषयी जाणीव जागृती व्हावी. या सभेच्या एका भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेले उद्गार अतिशय महत्त्वाचे आहेत. मी मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग केवळ माझे कुटुंब व माझा समाज यासाठी करणार नाही तर सर्व समाजासाठी त्याचा उपयोग करेल.अस्पृश्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम जगासमोर आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करेन.अवघे आयुष्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित, मागास, आदिवासी, कष्टकरी, महिला अशा सर्वांचे प्रश्न मांडले आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.आंबेडकरांच्या महापरिनिर्वानानंतर दलित समाजात निर्माण झालेली पोकळी यावर तरुण वर्गाने विचार करावा. 

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निबंध मराठी 2023 pdf | dr BabaSaheb Ambedkar essay in Marathi 2023 Doctor babsaheb anbedkar marathi nibandh 2023 pdf

             DOWNLOAD

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंधाच्या माध्यमातून बाबासाहेब यांनी शिक्षणाचे जे महत्त्व सांगितले आहे ते आजच्या तरुण पिढीला नक्की कळू द्या.dr BabaSaheb Ambedkar essay in Marathi 2023 वाचल्यावर आजचा तरुण जो विघातक मार्गावर जाताना दिसत आहे त्याला योग्य दिशा देण्यासाठी हा निबंध मोलाची कामगिरी करेल. धन्यवाद !

मराठी निबंध बाबासाहेब आंबेडकर पहा essay on babasaheb ambedkar in marathi video 



आमचे हे लेख वाचा 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area