बाबासाहेब आंबेडकर जयंती दहा ओळींचे मराठी भाषण 2023| dr babasaheb ambedkar jayanti ten lines marathi speech
14 एप्रिल ही तारीख उच्चारताच आपल्या अंगामध्ये वेगळेच रोमांच येतात. कारण या पवित्र दिनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न, थोर अर्थशास्त्रज्ञ, दलित उद्धारक, कुशल राजकारणी, महान तत्ववेत्ते,मानवतावादी विचारांचे पुरस्कर्ते,चातुरवर्णी व्यवस्थेचा कडाडून विरोध करणारे, दलित वर्गाला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असे ठणकावून सांगणारे,या समाज व्यवस्थेत जे उपेक्षित आहेत त्या सर्वांना मानवतेची वागणूक मिळाली पाहिजे. यासाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांचा जन्मदिवस अर्थात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल रोजी संपूर्ण भारतभर नव्हे तर इतर देशांमध्ये देखील त्यांच्या विचारांचे पाईक या दिवशी मोठ्या उत्साहात आंबेडकर जयंती साजरी करतात. भारतभूमीला पडलेले सोनेरी स्वप्न म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दिवशी शाळा ,महाविद्यालय, कॉलेजेस सर्वच ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या कार्यक्रमांमध्ये लहान मुलांना देखील आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती सांगावी असा मोह होतो तो मोह त्यांना आवरत नाही म्हणून आंबेडकर जयंतीनिमित्त Ambedkar jayanti Marathi speech competition मध्ये ते भाग घेत असतात. यासाठी पालक वर्ग, शिक्षक वर्ग आंबेडकर जयंती निमित्त छोट्या छोट्या मराठी भाषणांचा शोध घेत असतात. आपल्याला इंटरनेटवर भली मोठी मोठी भाषणे पाहायला मिळतात, परंतु जी मुले छोट्या गटामध्ये किंवा प्राथमिक शिक्षण घेत असतात त्या मुलांना मात्र बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी भाषण देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती दहा ओळींचे म्हणजे अगदी छोटे भाषण असेल तर त्याची छान तयारी करता येते. परंतु अशी छोटी भाषणे आपल्याला इंटरनेटच्या महाजालावर सापडत नाहीत. म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण dr babasaheb ambedkar jayanti ten lines marathi speech जे अगदी तुम्ही एकदा वाचले तरी तुमच्या लक्षात राहील. मोठ्या मुलांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भाषण करायचे असेल तरी हे दहाच ओळीचे भाषण त्यांनी थोडे स्पष्टीकरण वजा सांगितले तर ते तुमच्यासाठी देखील कामाला येईल.चला तर मग वेळ न दवडता आंबेडकर जयंतीचे शॉर्ट बट स्वीट मराठमोळे मराठी भाषण 2023 पाहूया.
बाबासाहेब आंबेडकर जयंती दहा ओळींचे मराठी भाषण 2023 |
बाबासाहेब आंबेडकर जयंती दहा ओळींचे मराठी भाषण | dr babasaheb ambedkar jayanti ten lines marathi speech
आम्ही आपल्याला देत असलेले हे आंबेडकर जयंतीचे हे दहा वाक्यांचे भाषण किंवा दहा ओळींचे मराठी भाषण आहे. आपल्याला याचे पाठांतर करता यावे म्हणून वाक्यांना क्रमांक दिलेले आहेत. आपण मात्र भाषण सादर करत असताना एक सलग ते बोलावे. आंबेडकर जयंती निमित्त दहा ओळीच्या भाषणाची तयारी करीत असताना आपण निवडलेली वाक्ये घागर मे सागर अर्थात कमी शब्दांमध्ये खूप मोठा आशय सांगणारी असावीत. या दहा वाक्यांमधूनच नेमके बाबासाहेब कसे होते ? याची कल्पना श्रोत्यांना यायला हवी.एवढे दमदार हे भाषण हवे. आम्ही हा Ambedkar jayanti Marathi speech नमुना स्वरूपात आपल्याला देत आहोत आपण यामध्ये भर देखील घालू शकता, तसेच आपल्या कार्यक्रमाचे नेमके स्वरूप कसे आहे? यानुसार देखील यामध्ये बदल करू शकता. भाषणाची सुरुवात करत असताना ती थोडी आकर्षक असावी जेणेकरून श्रोत्यांचे लक्ष आपल्याकडे चटकन वेधले जाईल.ती कशी तर ..
अध्यक्ष!,महाशय!,गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो आज मी आंबेडकर जयंती निमित्त माझे बोबडे बोल आपल्यापुढे बोलत आहे. ते आपण शांतचित्ताने ऐकावे ही नम्र विनंती.
@बाबासाहेब आंबेडकर अप्रतिम मराठी निबंध 👈
आंबेडकर जयंती दहा ओळींचे मराठी भाषण नमूना dr babasaheb ambedkar jayanti ten lines marathi speech sample
१. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होय. त्यांचा जन्म सध्याच्या मध्यप्रदेश राज्यातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी एका दलित कुटुंबात झाला.
2. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर इंग्रजांच्या फौजेत शिपाई म्हणून काम करत होते त्यांना शिक्षणाचे महत्त्व उमगल्यामुळे ते स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी लक्ष घालत होते.
3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण सातारा या ठिकाणी झाले. त्यानंतर मॅट्रिक नंतरच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना बडोदा संस्थांनचे संस्थानिक सयाजीराव गायकवाड यांनी मोलाची मदत केली.
4. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अस्पृश्य कुटुंबात झाल्यामुळे अस्पृश्यता किती भयानक असते याचा अनुभव त्यांना वेळोवेळी येत होता म्हणूनच की काय त्यांनी ज्ञानापेक्षा मोठे काही नाही या विचाराने मन लावून आपले शिक्षण पूर्ण केले.
@आंबेडकर जयंती अप्रतिम मराठी शुभेछा 👈
5. दलितांसाठी कार्य करीत असताना दलित वर्गाला बजावून सांगितले की आपल्या जीवनात अमुलाग्र बदल करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र आंबेडकरांनी या उपेक्षित वर्गाला दिला.
6. इथली समाज व्यवस्था माणसाला माणसासारखे वागवत नाही म्हणून या समाज व्यवस्थेचा इथल्या चातुरवर्णी व्यवस्थेचा विरोध करण्यासाठी मानवतावादी विचारांनी आकारास आलेल्या बौद्ध धर्माचा स्वीकार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय विचारपूर्वक करून दलितांना सन्मानाने जगण्याचा एक नवा मार्ग दाखवून दिला.
7. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह किंवा नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह यासारख्या सत्याग्रहातून आम्ही अस्पृश्य म्हणून जन्माला आलो यात आमचा दोष नाही माणसाची कदर त्याच्या गुणांवरून व्हावी यासाठी कायमच आंबेडकर आग्रही राहिले.
@आंबेडकरांचे ५० प्रेरणादायी विचार 👈
8. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इंग्रजांच्या दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाल्यानंतर राज्यघटना निर्मितीच्या कामांमध्ये आपले अभूतपूर्व योगदान दिले, राज्यघटनेच्या माध्यमातून दिन ,दलित ,उपेक्षित स्त्रिया यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले.
9. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा, नि संघर्ष करा. या अनमोल उपदेशातील संघटित होणे आणि संघर्ष करणे यासाठी दलित वर्ग किंवा एकंदरीतच तरुण वर्ग अग्रेसर दिसत आहे. म्हणूनच आज वेगवेगळी आंदोलने आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्यातला मूळ गाभा की चांगले शिक्षण घ्या याला कुठेतरी बगल मिळताना दिसत आहे यावर विचार होणे ही आजची खरी गरज आहे.
@@आंबेडकर जयंती मराठी शायरी 👈पाहण्यासाठी टच करा
@नव्याने सुरू होत असलेले कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ संपूर्ण माहिती 👈
नींद अपने खोकर
जिसने जगाया हमको
आसू अपने गिरा कर हसाया हमको
कभी भूल न जाना उस महामानव को
जिसने मनुष्यता के लिए
अपने प्राण गवाये
आज आंबेडकर जयंती निमित्त ते विचार आपणापुढे सादर केले ते आपण शांतचित्ताने ऐकून घेतले याबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद! जय भारत !
आंबेडकर जयंती छोटे भाषण विडियो ambedkar jayanti short and small speech vedeo in marathi
भारताचे नवे शैक्षणिक धोरण २०२०
सावरकरांनी दलितांसाठी केलेले अनमोल कार्य