Type Here to Get Search Results !

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी 2023 | hanuman jayanti wishesh in marathi 2023

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी 2023 | hanuman jayanti wishesh in marathi 2023 | hanuman jayanti quotes best Vishesh marathi 2023 | hanuman jayanti marathi message status |Jay hanuman quotes in marathi 


प्रभू श्रीराम यांचा नितीन भक्त म्हणजे हनुमान. या भगवान हनुमंताचा जन्मदिवस म्हणून आपण हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करतो. चैत्र महिन्यामध्ये नवमीच्या दिवशी रामनवमी साजरी करून आपण रामाचा जन्मदिवस साजरा करतो तर त्यानंतर बरोबर सात दिवसांनी चैत्र पौर्णिमेला रामभक्त हनुमान यांचा जन्मोत्सव हनुमान जयंती म्हणून आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो.या हनुमान जयंती दिवशी सर्व  हनुमान भक्त भक्ती भावाने मंदिरात जातात आणि मनोभावे हनुमंत चरणी लीन  होतात.हनुमान जयंतीला आपण एकमेकांना शुभेच्छा देऊन हनुमानाप्रमाणे एक आदर्श भक्त बनावे? यासाठी संकल्प करत असतो. हनुमान जन्म हा सकाळच्या प्रहरी दिवस उगवण्याच्या सुमारास साजरा होत असल्यामुळे या दिवशी हनुमान भक्त हनुमानाच्या मंदिरात सकाळी सकाळी एकत्र येतात. भजन कीर्तन करतात. भक्तगण हनुमान जन्माच्या शुभ मुहूर्तावर मारुती चरणी  गुलाल उधळून हनुमान जयंती साजरी करतात. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये विविध कार्यक्रमांचे  आयोजन केले जाते. खेडेगावांमध्ये तर या हनुमान जयंतीला मोठमोठया  यात्रा भरत असतात. कुस्तीचे फड रंगत असतात. संध्याकाळी हनुमानाची पालखी वाजत गाजत संपूर्ण गावांमध्ये मिरवली जाते. फटाक्यांची आतिषबाजी,विद्युत रोषणाई असे काही सर्व चित्र या हनुमान जयंतीला आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर उत्तर प्रदेश राज्यांमध्ये देखील हनुमान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. म्हणून आज आम्ही आपल्यासाठी यावर्षीची म्हणजे 2023 ची हनुमान जयंती अगदी धुमधडाक्यात साजरी करता यावी यासाठी  hanuman jayanti wishesh in marathi 2023 घेऊन आलेली आहोत. या हनुमान जयंतीच्या अस्सल मराठी  शुभेच्छा आणि संदेश आपल्याला हनुमान जयंतीची स्टेटस ठेवण्यासाठी नक्कीच कामाला येतील. राम भक्त हनुमान याला आपण महारुद्र, पवनपुत्र, वायुपुत्र अशा विविध नावांनी ओळखतो. या हनुमान जयंतीची महिमा आपले मित्र मंडळी ,नातेवाईक तसेच मोबाईलच्या कायम  प्रभावाखाली असणाऱ्या तरुणाईला जर आपण या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा पाठवल्या (hanuman jayanti quotes best Vishesh marathi 2023 ) तर आजच्या तरुण पिढीला हनुमानाने ज्या बलाच्या उपासनेला महत्व दिले ते महत्व आजची तरुण पिढी समजून घेईल. आम्ही आपल्याला देत असलेले काही हनुमान जयंती निवडक शुभेच्छा संदेश आपण फेसबुक, व्हाट्सअप ,इंस्टाग्राम अशा प्रसारमाध्यमांच्या साह्याने एकमेकांना देऊ शकता. हनुमानाच्या जन्माची कथा देखील खूप रंजक आहे. ती देखील आपण आपल्या मित्रमंडळींना पाठवून यावर्षीचे हनुमान जयंती उत्साहाने साजरी करू शकता.
हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी 2023
हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी 2023



हनुमान जयंती 2023 (toc)

हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी 2023 | hanuman jayanti wishesh in marathi 2023 | हनुमान जयंती साठी मराठी शुभेच्छा 2023 | hanuman jayanti shubhecha in marathi 2023


ज्याच्या तन मनात आहे श्रीराम
अवघ्या विश्वात जो आहे बलवान
अशा असीम राम भक्ताला शत शत प्रणाम
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!


सत्ता संपत्ती यासाठी शपथ  घेणारे अनेक भेटतील
परंतु आपल्या भक्तीमध्ये छाती फाडून दाखवणारा 
राम भक्त हनुमान अवघ्या विश्वात एकच आहे
बोलो बजरंग बली की जय !
हनुमान जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा!


भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनी सुता रामदूता प्रबंजना
महाबली प्राण जाता सकळा उठवी बळे
सौख्य कारी  दुःखहरी  दूत  वैष्णव गायका
तुज नमो तुज नमो तुज नमो 
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!


सूर्याचा ठाव घ्यायला  जो गेला खास
तो बजरंग आमच्या हृदयात वसे हमखास
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!


भक्तीच्या शक्तीच्या देवतेला
आज त्याच्या जन्मदिनी
करूया मनोमन वंदन 
बोलो जय बजरंग जय बजरंग
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा 


हनुमान जयंती sms 2023 | Hanuman jayanti sms in marathi | Hanuman jayanti marathi message| hanuman jayanti msg 2023

अंजनीच्या सुता तुला
 रामाचे वरदान 
एक मुखाने बोला
 जय हनुमान जय हनुमान ! 


खचलेल्या मनाला उभारी देते ती भक्ती
राम नामाची जाणली ज्याने शक्ती 
बोलो रामभक्त हनुमान की जय!


पवनपुत्र महारुद्रवतार वायुपुत्र अंजनी सुता
राम भक्त वानरराज 
हनुमान की जय 
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!


आले किती गेले किती 
माझा बजरंगी होणे नाही 
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !


ज्याला रामाचे वरदान आहे
ज्याच्या हातामध्ये शोभणारी गदा आहे
शक्ती ज्याची ओळख आहे
भक्ती ज्याचे अस्त्र  शस्त्र आहे 
अशा संकट निवारण हनुमंतास कोटी कोटी वंदन 
हनुमान जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा!


राम लक्ष्मण जानकी
जय बोलो राम भक्त हनुमान की
हनुमान जयंतीच्या शुभेच्छा !


वायुपुत्र महारुद्रवतार
राम भक्त मारुतीरायाचा विजय असो
हनुमान जयंतीच्या खुप खुप शुभेच्छा!



हनुमान जयंती स्टेटस इन मराठी 2023| Hanuman jayanti status in marathi 2023


बजरंग याचे नाव आहे
राम भक्ती ज्याचे धाम आहे
अशा हनुमंताला कोटी कोटी वंदन
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!



जावे हनुमंताला शरण 
भक्तीने लिन व्हावे त्याचे चरण
दुःखाचे होईल कायम हरण 
बोलो जय श्री राम 



मुखी राम नाम जपतो तो योगी बलवान
दुख नाश केला तो आहे सर्व शक्तिमान 
त्याची भक्ती आकाशापेक्षाही उंच 
अशा हनुमंतास कोटी कोटी वंदन 
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा ! 


ज्याच्या मुखांमध्ये असतो राम 
तो सर्वच बाबीमध्ये असतो छान 
म्हणून तर आहे बजरंगाची कीर्ती महान 
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा !



हनुमान जयंती संदेश 2023 | Hanuman jayanti sandesh 2023 



या रे या ! राम नाम घ्या !
दुःखातून मुक्त व्हा !
भक्तीच असते शक्ती 
अशी शिकवण देणाऱ्या हनुमंताला वंदन.
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!


सीता मातेची रावणाकडून सुटका करणाऱ्या
अवघ्या विश्वात भक्तीचे महत्व सांगणाऱ्या
 हनुमंताला हनुमान जयंतीच्या दिनी 
नतमस्तक होऊन करू नमन 
हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!


हनुमान जयंतीच्या निमित्ताने राम भक्त हनुमान
 आपल्या जीवनात सुख, शांती ,समाधान घेऊन येऊन येवो
राम भक्त हनुमानाची कृपादृष्टी आपल्या कुटुंबावर कायम राहो 
जीवनात दुःखाचा लवलेश न राहो 
हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा!



हनुमान जयंती मराठी  बॅनर 2023 | hanuman jayanti marathi banner 2023 हनुमान जयंती मराठी फोटो | hanuman jayanti image in marathi


हनुमान जयंती मराठी शुभेच्छा
हनुमान जयंती बॅनर




हनुमान जयंती मराठी सुविचार | Hanuman jayanti quotes in marathi 2023 |हनुमान यांचे विचार | hanuman quotes in marathi 


असं म्हणतात सगळ्यात ताकदवान 
आहे बजरंग बली
जो तोडतो दुश्मन की नली 
कारण तो आहे महाबली
हॅप्पी हनुमान जयंती !


ज्याच्या हृदयात राम आहे 
जो भक्त म्हणून विनम्र आहे
तो वायुपुत्र अंजनी पुत्र केसरी नंदन
हनुमान आहे बोलो हनुमान की जय!


उपदेश करावा श्रीकृष्णासारखा
गुरू उपदेश पाळावा अर्जुनासारखा 
भक्ती करावी रामभक्त हनुमंतासारखी.


जे गेले ते आपले नव्हतेच 
जगात शिल्लक उरते ती फक्त भक्ती 
अशी शिकवण देणाऱ्या हनुमंताला
आज हृदयी  साठवूया. 


रामाचा भक्त मी आहे
मी रुद्रावतार आहे 
मी केसरी आणि अंजनी लाल आहे 
दृष्ट प्रवृत्तीसाठी मी काल आहे
बोलो जय बजरंग !


आज आहे जन्मदिन निसिम राम भक्ताचा
अंजनी पुत्र वायुपुत्र हनुमंताचा
जय जयकार करूया भक्त हनुमंताचा
श्रीराम जय राम जय जय राम जय हनुमान !


श्रीराम जय राम जय जय राम 
हा जप हनुमंताप्रमाणे अखंड जपूया 
हनुमंता चरणी वंदना 


ज्याच्या हृदयात बसले राम
 तो आहे भक्त हनुमान 
जय हनुमान जय हनुमान

तर आज आपण 2023 ची स्पेशल आणि खास हनुमान जयंती साजरी करत असताना हनुमान जयंती शुभेच्छा संदेश मराठी अर्थात (hanuman jayanti wishesh in marathi 2023) आपल्याला नक्कीच या हनुमान जयंतीला रामभक्त हनुमान याची महिमा सांगतील.आज आम्ही आपल्यासोबत शेअर केलेले hanuman jayanti shubhecha, sandesh,status,banner,quotes in marathi इतरांना देखील पाठवून यावर्षीचे हनुमान जयंती अगदी उत्साहात पार पडेल आणि त्यांना देखील बजरंग बली मारुतीराया यांचा आशीर्वाद कायम मिळेल. धन्यवाद ! 

आमचे हे लेख वाचा 








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area