Type Here to Get Search Results !

अक्षय तृतीया म्हणजे काय | akshaya tritiya mhanje kay

अक्षय तृतीया म्हणजे काय | akshaya tritiya mhanje kay 

या सृष्टीमध्ये अनेक जीव राहतात परंतु यामध्ये सगळ्यात जिज्ञासू जीव म्हणून जर कोणाला ओळखले जात असेल तर तो म्हणजे माणूस. माणसाला जीवन जगत असताना अनेक प्रश्न पडत असतात. अमुक एखादी घटना घडली तर ते का घडली? त्यामागे कोणती कारणे असतील याचा शोध माणूस कायम घेण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी एखादा सण उत्सव साजरा केला तरी तो सण साजरा करण्यामागे  करण्यामागे उद्देश काय आहे? तो कधीपासून साजरा केला जात आहे? अशी तो इतरांकडे  विचारपूस करतो किंवा इंटरनेटच्या मदतीने त्याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. 22 एप्रिल रोजी साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून ज्याला ओळखले जाते असा सण अक्षय तृतीया येणार आहे. म्हणून अक्षय तृतीया सण म्हणजे काय?या सणाच्या दिवशी काय काय करायचे असते, अक्षय तृतीया नेमकी कधीपासून साजरी होत आहे? असे अनेक प्रश्न जिज्ञासू माणसाला पडत असतात आणि म्हणूनच वाचकांना आपण akshaya tritiya mhanje kay आहे. हे सांगणार आहोत.

अक्षय तृतीया म्हणजे काय
अक्षय तृतीया म्हणजे काय




अक्षय तृतीया मराठी अर्थ (toc)


साडेतीन मुहूर्तापैकी एक सण अक्षय तृतीया sade tin muhurtapaiki ek san akshaya tritiya 

हिंदू धर्मामध्ये गुढीपाडवा,दसरा, दिवाळीचा पाडवा आणि अक्षय तृतीया या सणांना खास मुहूर्त असलेले सण म्हणून ओळखले जाते. त्यांना साडेतीन मुहूर्त म्हणून देखील विशेष असे महत्त्व आहे. या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेला खूप मोठ्या प्रमाणात दान आणि नवनवीन वस्तूंची खरेदी देखील केली जाते.


अक्षय तृतीया कधी असते akshaya tritiya kadhi aste 

अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यामध्ये असते. वैशाख महिन्याला सुरुवात झाल्यानंतर वैशाख शुद्ध तृतीयेला जो सण साजरा केला जातो त्या सणाला अक्षय तृतीया म्हणून ओळखले जाते.


अक्षय तृतीया म्हणजे काय 

आपण खाली दिलेली माहिती पाहिल्यानंतर आपल्याला नेमके कशाला अक्षय तृतीया म्हणायचे याची कल्पना येऊन जाईल.


1. वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया 

चैत्र महिन्याच्या सुरुवातीला आपण चैत्र महिन्यातील पहिला दिवस म्हणून गुढीपाडवा. हा सण साजरा करतो तर त्यानंतर लगेचच वैशाख महिन्यामध्ये वैशाख शुद्ध तृतीया या दिवसाला म्हणजेच या तृतीयेला अक्षय तृतीया म्हटले जाते.


2. अक्षय तृतीया म्हणजे एक शुभ मुहूर्त

आपण पाहिले की हिंदू धर्मामध्ये साडेतीन मुहूर्त सांगितलेले आहेत या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया होय थोडक्यात अक्षय तृतीया म्हणजे एक शुभ मुहूर्त असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.


 3. अक्षय तृतीया शब्दाचा अर्थ

अक्षय म्हणजे ज्याच कधीही क्षय होत नाही. सोप्या भाषेत अशी बाब की ज्याचा कधी नाश होत नाही त्याला आपण अविनाशी किंवा अमर देखील म्हणू शकतो. या दिवशी जो दानधर्म आणि पुण्य कर्म केले जाते ते अक्षय म्हणजे अखंड आपल्या सोबत राहते असे देखील अक्षय तृतीय विषय सांगितले जाते.


4. अक्षय तृतीया म्हणजे त्रेता युगाचा आरंभ

पुराना मध्ये असे सांगितले आहे की त्रेता युगाला सुरुवात झाली. तो दिवस होता अक्षय तृतीयेचा.


5.  परशुरामाचा जन्मदिन

अक्षय तृतीया म्हणजे ज्या दिवशी परशुरामाचा जन्म झाला तो जन्मदिवस म्हणजे अक्षय तृतीया. अशी देखील आख्यायिका या अक्षय तृतीया मागे सांगितले जाते.


6. कृष्ण आणि सुदामा यांची भेट

श्रीकृष्ण हा राजपुत्र होता. त्याचा लहानपणीचा मित्र सुदामा यांची कथा आपल्याला माहित असेलच, एके दिवशी आपल्या मित्राची आठवण आल्यानंतर सुदामा श्रीकृष्णाला भेटायला गेला. त्यावेळी लक्ष्मी मातेने श्रीकृष्णाचा मित्र सुदामा याच्यावर कृपा करण्याचे ठरवले परंतु श्रीकृष्णाने पाहिले की सुदाम्याच्या भाग्यात धनदौलत नाही अशावेळी भगवान श्रीकृष्णांनी सुदाम्याच्या पायांची पूजा करीत असताना त्याची जुनी भाग्यरेषा पुसून काढली आणि नवीन भाग्यरेषा त्याच्या पायावर काढली आणि या दिवसापासून सुदाम्याचे  दिवस पालटले म्हणून अक्षय तृतीया म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू यांची पूजा करण्याचा हा दिवस.


7. आकीती म्हणजे अक्षय तृतीया 

काहीजण या अक्षय तृतीयेला ग्रामीण भागामध्ये आकिती  ते असे म्हणतात. या दिवशी आपले पूर्वज यांना पित्तर रूपाने पूजा केली जाते आपल्या पूर्वजांना ज्या गोष्टी आवडत होत्या त्यांच्या आठवणी मध्ये त्या गोष्टींचे मोठे दान या आकी तिच्या म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी केले जाते.


8. नव्याची खरेदी म्हणजे अक्षय तृतीया

या दिवशी आपण ज्या गोष्टी खरेदी करतो त्या गोष्टी किंवा वस्तू आपल्याला संपूर्ण वर्षभर कमी पडत नाहीत अशी देखील दारणा लोकांमध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात सोने नाणे यांची खरेदी या अक्षय तृतीयेला केली जाते.


2023 मध्ये अक्षय तृतीया कधी आहे akshaya tritiya kadhi ahe 

2023 या इंग्रजी कॅलेंडर मध्ये अक्षय तृतीया कधी आहे तर 22 एप्रिल रोजी अक्षय तृतीया हा सण साजरा केला जाणार आहे.


अक्षय तृतीया आणि शेतीची कामे

अक्षय तृतीया या सणाविषयी अजून सांगायचे झाले तर विदर्भामध्ये या सणाला प्रचंड असे महत्त्व दिले आहे. च्या कामाला सुरुवात करण्याचा दिवस म्हणजे अक्षय तृतीया म्हणून शेतकरी या दिवशी नांगराची पूजा करतात आणि आपल्या शेतातून अक्षय म्हणजे मोठ्या प्रमाणात पीक निघू दे अशी त्या भगवंताकडे मागणी करतात.


अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी का केली जाते

अक्षय तृतीयेला आपण ज्या गोष्टी खरेदी करतो त्या गोष्टीमध्ये उत्तरोत्तर वाढ होत जाते तिचा कधीही नाश होत नाही अशी धरणा असल्यामुळे लोक थोडे का होईना सोने खरेदी करतात जेणेकरून संपूर्ण वर्षभर आपली भरभराट व्हावी असाच काहीसा येतो या अक्षय तृतीया सण साजरा करण्यामागे आपल्याला दिसतो. 


अक्षय तृतीया म्हणजे काय दाखवा |what is meaning office akshaya tritiya in marathi vedeo




आमचे अप्रतिम लेख 

अक्षय तृतीया शुभेच्छा मराठी 

अक्षय तृतीया सणाची संपूर्ण माहिती 

वाढत्या तापमानात स्वताची काळजी घेण्यासाठी काही टिप्स  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area