Type Here to Get Search Results !

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ माहिती मराठी | karmaveer bhaurao Patil University Marathi information

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ माहिती मराठी | karmaveer bhaurao Patil University Marathi information 

महाराष्ट्रामध्ये अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्थांपैकी एक शिक्षण संस्था म्हणजे रयत शिक्षण संस्था. या रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा या ठिकाणी केली. मात्र या रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या पुढाकाराने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाला एक वेगळीच ख्याती  प्राप्त होणार आहे. ती अशी की यापुढे सातारा या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ स्थापन केले जाणार आहे. त्याला तत्वता मंजुरी देखील मिळालेली  आहे. म्हणूनच आजच्या लेखात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ यासंदर्भात आपण मायबोली मराठी मध्ये माहिती पाहणार आहोत. चला तर मग karmaveer bhaurao Patil University Marathi information आपण अगदी सविस्तरपणे पाहूया. सातारा व आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची एक नवीन संधी या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे चला तर मग या नव्याने सुरुवात असलेल्या विद्यापीठाच्या स्थापने संदर्भात काही पायाभूत माहिती पाहूया.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ माहिती मराठी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ माहिती मराठी

भाऊराव पाटील विद्यापीठ (toc)

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मान्यता

भारतामध्ये आता यापुढे समूह विद्यापीठे स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेले आहे. यानुसार आपल्या महाराष्ट्र मध्ये अनेक पुढारलेल्या  शिक्षण संस्थांनी आपले रजिस्ट्रेशन केले होते. याचाच एक भाग म्हणून रयत शिक्षण संस्था सातारा या शिक्षण संस्थेने देखील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ या संदर्भात नोंदणी केली होती आणि आता या विद्यापीठाला मान्यता देखील देण्यात आलेले आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलाधिकारपदी कोण आहे 

नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला कुलाधिकारपदी कोण असतील  याची सर्वांनाच उत्सुकता आहे परंतु तूर्तास तरी या कुलाधिकार पदी निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी कार्यभार पाहत आहेत.


महाराष्ट्रातील समूह विद्यापीठे 

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 11 समूह विद्यापीठे स्थापन करण्यात आलेले आहेत. मुंबई आणि सातारा या ठिकाणी अशा समूह विद्यापीठाचा प्रयोग सध्या सुरू आहे.


कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा फायदा

सातारा या ठिकाणी सुरुवात असलेल्या समूह विद्यापीठाचा फायदा या परिसरातील नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना होणार आहे. कारण अशा समूह विद्यापीठातून मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे म्हणजेच ग्लोबल लेव्हलचे शिक्षण आपल्या महाराष्ट्रात मिळणार आहे.


 🎯 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध 🏆


कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू

अजून तरी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला पूर्ण वेळ कुलगुरू देण्यात आलेले नाहीत तूर्ता शिवाजी विद्यापीठाचे डॉ. डी टी शिर्के या विद्यापीठाचा कार्यभार सांभाळत आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाला मान्यता कोणी दिली आहे

समूह विद्यापीठ केंद्र सरकारची एक योजना होती या योजनेअंतर्गत रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव विद्यापीठाला मान्यता मिळाली असून तसा प्रस्ताव रयत शिक्षण संस्थेने केंद्राकडे सादर केला होता आणि त्यानुसार या विद्यापीठाला आता मान्यता मिळालेली आहे.


कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाशी कोणत्या संस्था जोडल्या जातील

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाची या संस्थांना यूजीसी कडून A ग्रेड पेक्षा चांगली श्रेणी मिळालेली आहे अशा दर्जेदार महाविद्यालयांना या संस्थेची जोडले जाईल.

थोडक्यात काय तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षणाची संधी म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील समूह विद्यापीठ शिक्षण क्षेत्रामधील सर्व घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवणे या उद्देशाने आम्ही आज आपल्याला या विद्यापीठा संदर्भात माहिती दिली ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.


आमचे हे लेख वाचा 


काही सोपे योगा प्रकार करा आणि आजारांपासून मुक्ती 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area