अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 माहिती | 11th Admission Process Time Table 2023 24
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ! 2017 18 या शैक्षणिक वर्षापासून मुंबई महानगर क्षेत्र , पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांबरोबरच नाशिक औरंगाबाद अमरावती व नागपूर या महानगरपालिका क्षेत्रामध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबवायला सुरुवात झाली. यावर्षी देखील याच पद्धतीने ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना सादर करावयाचे आहेत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यावर्षी मुंबई महानगर क्षेत्र पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्र व त्याच बरोबर नाशिक अमरावती व नागपूर या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये देखील यावर्षी ऑनलाईन पद्धतीने अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने पार पडणार आहे.
या वरील क्षेत्रात विद्यार्थी संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी दहावी उत्तीर्ण झालेल्या अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. शैक्षणिक वर्ष 2023 24 या वर्षासाठी देखील महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक आणि संपूर्ण प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे याबाबत माहिती देण्यात आलेली आहे.तसे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे.
अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 माहिती |
अकरावी प्रवेश 2023 24(toc)
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 माहिती 11th Admission Process 2023 24 information
आपण वर उल्लेख केलेल्या सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये ही अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडत असते. विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी या ऑनलाइन प्रक्रियेचा भाग बनणे बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे.
💥अकरावी प्रवेश म्हणजे नेमके काय करू? 👈 क्लिक सर्व उत्तरे मिळतील
अकरावी प्रवेश 2023 24 अधिकृत संकेतस्थळ 11th Admission 2023 24 Official Website
मुंबई, पुणे,नागपूर, नाशिक,अमरावती या महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी महाराष्ट्र शासनाकडून एक अधिकृत संकेतस्थळ देण्यात आलेले आहे. याच अधिकृत संकेतस्थळामार्फत विद्यार्थ्यांनी आपले अकरावी प्रवेश 2023 24 घ्यावयाचे आहेत यासाठी विद्यार्थ्यांनी 11th admission.org.in या अधिकृत संकेतस्थळाला नेहमी भेट द्यायला हवी.
अकरावी प्रवेशासाठी अधिकृत संकेत स्थळ आपण या निळ्या अक्षरांवर क्लिक केल्यानंतर या अधिकृत संकेतस्थळावर एका सेकंदात जाऊन आपल्याला हवी ती माहिती पाहू शकता. यासाठी हे संकेतस्थळ अतिशय महत्त्वाचे आहे.
💥अकरावी registration कसे करावे ?👈
अकरावी ऑनलाइन प्रवेश बंधनकारक 11th Online Admission Compulsory
मुंबई, पुणे,नागपूर, नाशिक,अमरावती या महानगरपालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपला अकरावीचा प्रवेश निश्चित करत असताना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेणे बंधनकारक आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी या अधिकृत संकेतस्थळावर वारंवार भेटी देऊन त्याबाबतचे अपडेट आपल्यासमोर ठेवले पाहिजेत.
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 टप्पे 11th Admission Process 2023 24 Steps
1.पाहिला टप्पा
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणजे विद्यार्थ्यांनी आपले रजिस्ट्रेशन करणे.
2.दुसरा टप्पा
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरावा लागेल. अर्थात application part 1 संपूर्णपणे फील करावा लागेल.
3.तिसरा टप्पापसंतीक्रम नोंदवणे
अतिक्रम म्हणजेच option form आपल्याला तिसऱ्या टप्प्यामध्ये भरावा लागणार आहे.
4.अंतिम टप्पा प्रवेश घेणे
आपल्याला हवे ते महाविद्यालय मिळाल्यानंतर आपण त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे हा देखील अकरावी प्रवेश प्रक्रियेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. असे म्हणावे लागेल कारण बरेच विद्यार्थी एखाद्या महाविद्यालयाला प्रवेश निश्चित झालेला असून देखील केवळ वेळापत्रक पाहत नसल्यामुळे आपली प्रवेशाची संधी गमावून बसतात.
अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी चारही टप्प्यांवरती अतिशय दक्ष राहून आपला अकरावी प्रवेशाचा मार्ग सुकर करावा.
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 वेळापत्रक 11 th Admission Process 2023 24 Timetable
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत या अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे 2023 24 चे संभाव्य वेळापत्रक देण्यात आलेले आहे.
1. विद्यार्थी पालक कॉलेजेस जनजागृती व प्रसिद्धी 11 th Admission Process 2023 24 Timetable
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीने चालते. त्याचबरोबर या प्रवेश प्रक्रियेचा भाग बनणे वरील कार्यक्षेत्रांसाठी कसे बंधनकारक आहे.याविषयी पालकांना माहिती देण्यासाठी साधारणपणे मे महिन्यामध्ये याविषयी संपूर्ण माहिती याविषयी जनजागृती केली जाणार आहे.
2.MOCK DEMO सरावासाठी
मे महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जाणीव जागृती निर्माण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याचा सराव व्हावा यासाठी अकरावी प्रवेशाच्या अधिकृत संकेतस्थळावर मॉक डेमो रजिस्ट्रेशन कसे करावे? याविषयी माहिती देण्यात आलेली आहे. यानुसार विद्यार्थी आपल्याला अकरावी प्रवेशासाठी अर्ज करत असताना भाग एक यामध्ये जी प्राथमिक माहिती असते ती कशी भरावी यासंदर्भात सराव करून घेतला जाणार आहे. यासाठी 20 मे 2023 ते 24 मे 2023 हा कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे.
3.अकरावी प्रवेश 2023 24 विद्यार्थ्यांची नोंदणी 12 th Admission 2023 24 Enrollment of students
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 राबवत असताना 25 मे 2023 पासून सकाळी अकरा वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपल्या अर्जाची नोंदणी म्हणजेच मूलभूत माहिती त्या ठिकाणी भरता येणार आहे. भरल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळणार आहे.
4. अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 भाग 1भरणे 11th Admission Process 2023 24 Part 1 Filling
विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या अधिकृत संकेतस्थळावर आपली नोंदणी केल्यानंतर या अर्जाचा भाग 1 विद्यार्थ्यांनी भरायचा आहे.तो भाग एक भरण्यासाठी देखील 25 मे 2023 पासून सुरुवात होणार आहे.
💥अकरावी प्रवेशासाठी ही कागदपत्रे हवीत अन्यथा प्रवेश होईल रद्द 👈
5.अकरावी प्रवेश 2023 24 अर्जाचा भाग 1 भरण्यासाठी मुदत 11th Admission 2023 24 Deadline for Filling Part 1 of Application
ज्या विद्यार्थ्यांना अकरावी केंद्रीय पद्धतीने आपला प्रवेश निश्चित करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल लागेपर्यंत अवधी देण्यात आलेला आहे. इयत्ता दहावीचा निकाल साधारणपणे जून महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरायला सुरुवात करणे अतिशय गरजेचे आहे.
💥 अकरावी प्रवेश अशी करा कागदपत्रे अपलोड 👈
6. अकरावी प्रवेश 2023 24 भाग 1 व्हेरिफिकेशन Class XI Admission 2023 24 Part 1 Verification
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत दहावीचा निकाल लागल्यानंतर साधारणपणे दोन दिवस विद्यार्थ्यांना आपण भरलेली माहिती बरोबर आहे का ती व्हेरिफाय करता येणार आहे.
💥अकरावी प्रवेश प्रक्रिया समजून घेण्यासाठी ही पुस्तिका वाचा 👈
7. अकरावी प्रवेश 2023 24 पसंती क्रम नोंदवणे तारखा 11th Admission 2023 24 Preference form Registration Dates
दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना याबाबत तपशील देण्यात येईल यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्याला ज्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे तेव्हा महाविद्यालयांचा पसंती क्रम यामध्ये भरणे अपेक्षित आहे. पसंती क्रम भरत असताना विद्यार्थ्यांनी आपल्याला दहावीला पडलेले गुण आणि इतर बाबी तपासून आपले पसंती क्रम भरायचे आहेत.
💥 दहावी नंतर तत्काळ नोकरी हवीय हे कोर्स करा 👈
अकरावी प्रवेश प्रवेश फेऱ्या
या संपूर्ण प्रक्रियेनंतर गुणवत्ता निहाय केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या साधारणपणे तीन फेऱ्या होतील त्याबाबत कोणते वेळापत्रक अजून आलेले नाही ते वेळापत्रक आपल्याला ज्यावेळी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होईल त्यावेळी आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचे काम करू.
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 वेळापत्रक pdf 11th admission process 2023 24 time table pdf
आपल्याला अकरावी प्रवेश प्रक्रिये संदर्भात जे संभाव्य वेळापत्रक देण्यात आलेले आहे ते पीडीएफ स्वरूपात हवे असल्यास खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करा आणि ते आपणासोबत कायमसंग्रहवी ठेवा. परंतु हे वेळापत्रक अंतिम नाही हे संभाव्य वेळापत्रक आहे यामध्ये बदल होऊ शकतात.
💥अकरावी प्रवेश 2 भरताना या चुका करू नका 👈
अकरावी प्रवेश वेळापत्रक pdf DOWNLOAD
थोडक्यात काय तर वरील प्रमाणे अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 पार पडणार आहे आणि याच्या तारखांचे अपडेट आपल्याजवळ असणे अतिशय गरजेचे आहे यासाठी आपण आमच्या नव्याने सुरू केलेल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा कारण दरवर्षी हजारो विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी आमच्याकडून मार्गदर्शन घेत असतात आपण देखील या मार्गदर्शन प्रक्रियेचा लाभ घ्यावा.
👉आपला कोणत्या कॉलेजला नंबर लागला कसे चेक करतात ?👈
अकरावी प्रवेश विभाग निहाय नोंदणी करण्यासाठी लिंक
अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group
आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.
अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक 👈क्लिक
आमची ही माहिती आपल्या मित्र मैत्रिणी यांना तात्काळ पाठवा.
आमचे अप्रतिम लेख
अकरावी प्रवेश नोंदणी आणि भाग एक भरणे संपूर्ण डेमो
अकरावी भाग 2 कसा भरावा यासाठी एक फॉर्म भरून दाखवला आहे
बारावी बोर्ड परीक्षा उत्तरपत्रिका झेरॉक्स प्रत कशी मिळवावी