पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माध्यमिक शिक्षण विभागामार्फत गुणवत्तेनुसार मानधनावर शिक्षक भरती 2023 24 | Recruitment of teachers on emolument through secondary education department in Pimpri Chinchwad Municipal Corporation 2023 24
नमस्कार! पुण्यामध्ये आपण तात्पुरत्या स्वरूपात नोकरीची संधी शोधत आहात तर मग हा लेख तुमच्यासाठी आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी पुणे या ठिकाणी माध्यमिक शिक्षण विभागामार्फत तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी बी,एससी, बीएड, बीए बीएड बी. पी. एड. उत्तीर्ण परीक्षेतील शिक्षकांच्या नेमणुका गुणवत्तेनुसार करण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माध्यमिक शिक्षण विभागामार्फत गुणवत्तेनुसार मानधनावर शिक्षक भरती
पिंपरी चिंचवड माध्यमिक शिक्षक भरती (toc)
💥शिक्षक भरती स्वरूप
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी तात्पुरत्या स्वरूपामध्ये एकत्रित मानधन या तत्त्वावर मराठी व उर्दू माध्यमांसाठी सहाय्यक शिक्षकांची भरती केली जाणार आहे. यासंदर्भात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी यासंदर्भात परिपत्रक निर्गमित केलेले आहे.
💥महाराष्ट्रात होणार मेगा तलाठी भरती जाहिरात 👈
मराठी माध्यम जागा
शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी तात्पुरत्या स्वरूपात मराठी माध्यमांमध्ये जवळजवळ 184 पदे भरली जाणार आहेत आणि ही १८४ पदे एकत्रित मानधनावर भरली जाणार आहेत. एकत्रित मानधन देखील खूपच चांगले आहे या कर्मचाऱ्यांना 27500 रुपये प्रति महिना एकत्रित मानधन दिले जाणार आहे.
💥दहावी निकाल पाहण्यासाठो वेबसाइट लिंक्स 👈
💥मराठी माध्यम माध्यमिक शिक्षक जागा तपशील
बी.एस्सी.बी.एड. विज्ञान - ३३
बी.एस्सी.बी.एड. गणित ३०
बी.ए.बी.एड. मराठी - ३२
बी. ए. बी. एड. - हिंदी २२
बी.ए.बी.एड. इंग्रजी २५
बी.ए.बी.एड. - इतिहास १०
बी.ए.बी.एड. भूगोल १०
बी.पी.एड. (क्रीडा शिक्षक) २२
अशा एकूण मराठी माध्यमाच्या 184 जागा भरल्या जाणार आहेत.
💥अकरावी प्रवेश student registration आणि भाग एक कसा भरावा 👈 क्लिक
पिंपरी चिंचवड माध्यमिक शिक्षक ऊर्दु माध्यम जागा तपशील एकूण पदे २५
बी.एस्सी.बी.एड. ऊर्दू ९
बी.ए.बी.एड. (उर्दु - भूगोल) ७
बी.ए.बी.एड. इंग्रजी इतिहास ९
सविस्तर माहिती सोबत दिलेल्या pdf मध्ये पहा.
💥पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माध्यमिक शिक्षक निवडीसाठी अटी
१) सदर पदाची निवड (सहाय्यक शिक्षक) ही पुर्णपणे तात्पुरत्या व हंगामी स्वरूपाची आहे. उमेदवारास मनपा सेवेत राहण्याचा अधिकार सांगता येणार नाही. सदरची नेमणूक शैक्षणिक वर्ष २०२३ २०२४ याकरिताव श्यकतेनुसार राहील.
२) एकत्रित मानधन शिक्षकांची नेमणुक ही आदेशाचे दिनाकापासून सहा महीने राहील, त्यामुळे अर्जदारास कोणत्याही कायमपदी नेमणुकीचा हक्क प्राप्त राहणार नाही. तसेच नेमणुकी संदर्भात न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र सादर करावे लागेल. ३) एकत्रित मानधन रक्कम रुपये २७,५००/- (अक्षरी रकम रूपये सत्तावीस हजार पाचशे रुपये फक्त) एवडे राहील, उमेदवारांना शालेय सुख्या वगळुन इतर सुख्या राहणार नाहीत. दिवाळी, उन्हाळी सुट्टीचे वेतन देयह राहणार नाही.
४) उमेदवाराने आपल्या अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक व व्यवसायिक अर्हताविषयक प्रमाणपत्र पदविका बी.एड./ बी.पी.एड. पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक, जातप्रमाणपत्र, अनुभव दाखला इत्यादी कागदपत्राच्या सत्य प्रती सादर कराव्यात.
⇨ दहावी बोर्डाचा निकाल फास्ट मोबाईलवर कसा पहावा 👈
५) ज्या दिवशी माध्यमिक शिक्षण विभागास सदर सहाय्यक शिक्षकांची आवश्यकता नसेल, त्यावेळी कोणत्याही नोटीशी शिवाय सदर उमेदवारांची सेवा संपृष्टात आणण्यात येईल या संबधीचे सर्व अधिकार माध्यमिक शिक्षण विभागाने राखून ठेवले आहेत.
६) जाहीरातीमधील विषयाच्या आवश्यकतेनुसार शिक्षक संख्या कमी जास्त करण्याचा अधिकार माध्यमिकशि क्षण विभागास राहील.
(७)अर्ज जमा करण्याच्या तारखा
अर्जदाराने आपले अर्ज महापालिका जाहिरातीमध्ये विहित केलेल्या नमुन्यातच करणे बंधनकारक राहील. सदरचा अर्ज मा. अति.आयुक्त (१) पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्या नावाने करावा. सदरचा अर्ज घेवून दि.०१/०६/२०२३ रोजी समक्ष दिनदयाळ माध्यमिक विद्यालय संततुकारामनगर, जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे-१८ या ठिकाणी सकाळी १०:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत हजर रहावे. अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी सर्व मूळ कागदपत्रे नसतील अथवा विहित नमुन्यात अर्ज नसेल तर आपला अर्ज बाद करणेत येईल, तसेच सायकाळी ०५:०० च्या नंतर आलेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
८) पोस्टाने, कुरियर अथवा ई-मेलव्दारे आलेले अर्जही स्विकारले जाणार नाहीत.
९) निवड झालेल्या उमेदवारास एकत्रित मानधना व्यतिरीक्त कोणत्याही सोयी सुविधा, हम नोकरी विषयक हक्क व इतर आर्थिक लाभ देय राहणार नाहीत. (उदा. दिवाळी बोनस तथा सानुग्रह अनुदान)
१०) अर्जदाराने अर्ज केला अथवा विहित अर्हता धारण केली म्हणजे नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्जदार विहित नमुण्यातील अर्ज / शैक्षणिक पात्रता धारण न करणारे, तसेच नेमणूकी संदर्भात दबावतंत्राचा वापर केल्यास उमेदवारी अथवा निवड कोणतीही पुर्व सुचना न देता रद्द करणेत येईल.
११) मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
१२) अपूर्ण अर्ज अर्धवट कागदपत्रे जोडलेल्या तसेच जाहिरातीनुसार नमूद केलेली शैक्षणिक अर्हता धारण न केलेल्या उमेदवारांचे अर्ज बाद करून अपात्र ठरविले जातील, याबाबत कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
१३) जाहिरामधील विहित नमुण्यातील अर्ज स्विकारले जातील.
१४) उर्दू माध्यमाचे सहाय्यक शिक्षकांना मनपाच्या कोणत्याही उर्दु विद्यालयात कामकाज करावे लागेल, तसेच बी.ए.बी.एड. उर्दु शिक्षकांना सर्व विषयाचे अध्यापनाचे काम करावे लागेल.
१५) नियुक्तीच्या वेळी उमेदवारास रक्कम रूपये ५००/- च्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज्ड करून) मनपा सेवेत भविष्यात नोकरीबाबतचा कोणताही हक्क राहणार नाही. तसेच न्यायालयात दाद मागणार नाही. याबाबतचे हमीपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
सदरची जाहीरात व अर्जाचा नमुना महापालिकेच्या https://www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देणेत आलेली आहे. जाहिरातीनुसार कार्यवाही करणे अथवा प्रक्रिया कोणत्याही स्तरावर रद्द करण्याचा अंतिम निर्णय मा. अतिरिक्त आयुक्त यांचा राहील.
💥 पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत माध्यमिक शिक्षण विभागामार्फत शिक्षक भरती अर्जाचा नमूना व परिपत्रक पीडीएफ
Download👈
आमचे इतर लेख
अकरावी प्रवेश नोंदणी आणि भाग एक भरणे संपूर्ण डेमो
अकरावी भाग 2 कसा भरावा यासाठी एक फॉर्म भरून दाखवला आहे
शिवराज्याभिषेक माहिती शुभेच्छा