Type Here to Get Search Results !

बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 जाहीर, यावर्षी का लागला बारावीचा कमी निकाल? | maharashtra hsc result live

बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 जाहीर, यावर्षी का लागला बारावीचा कमी निकाल | maharashtra hsc  result 2023 live 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून याबाबत आत्ताच आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन बारावी निकालाचे अपडेट आपल्यासाठी दिलेले आहेत. चला तर मग बारावी बोर्ड परीक्षेचा 2023 चा निकाल किती टक्के लागला त्याचबरोबर यावर्षी बारावीचा निकाल कमी का लागला? याविषयीची सविस्तर माहिती पाहूया.

बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 जाहीर, यावर्षी का लागला बारावीचा कमी निकाल?
बारावी बोर्ड परीक्षा निकाल 2023 जाहीर, यावर्षी का लागला बारावीचा कमी निकाल? 


बारावी निकाल 2023 (toc)


2023 बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल किती टक्के लागला?

राष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यावर्षी एकूण निकाल 91.25% लागलेला आहे. अशी अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेमध्ये राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी नुकतीच केलेली  आहे. या पत्रकार परिषदेला मंडळाचे इतर अधिकारी देखील उपस्थित होते.


💥आपला निकाल फास्ट पाहण्यासाठी क्लिक करा. 


बारावी बोर्ड परीक्षा निकाल  विद्यार्थी आकडेवारी 

बारावी बोर्ड परीक्षा 2023 या परीक्षेचा आपण जर विचार केला तर यावर्षी बोर्डाने जवळजवळ 3000 मुख्य केंद्रांवर परीक्षेचे आयोजन केले होते. या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 283 एवढ्या विद्यार्थ्यांनी आपली बोर्ड परीक्षा देण्यासाठी नोंदणी केलेली होती. दरवर्षीपेक्षा हा आकडा सगळ्यात जास्त होता म्हणूनच या निकालाकडे सगळ्यांची उत्सुकता लागलेली होती.


💥तुम्हाला पेपर सोपा जाऊन कमी गुण मिळलेत 😌मग तुम्हाला शिकवणाऱ्या शिक्षकांडून उत्तरपत्रिका तपासून घ्या सविस्तर माहितीसाठी क्लिक करा 👈


बारावी परीक्षेला बसलेले नियमित विद्यार्थी 

बारावी परीक्षेला यावर्षी 1416371 विद्यार्थी बसले होते यापैकी 1292468 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या आकडेवारीच्या जोरावरच आजचा निकाल हा 91.25% लागलेला आहे.


बारावी बोर्ड परीक्षा 2023 निकालाची वैशिष्टे 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ मार्फत बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर या निकालाची नेमकी कोणती वैशिष्ट्ये आहेत हे सांगावयाचे झाल्यास 


1.निकालात घसरण 

आपण गेल्या वर्षीच्या निकालाचा जर विचार केला तर यावर्षी निकालाची टक्केवारी ही जवळ तीन टक्क्याने घसरलेली आपल्याला पाहायला मिळते कारण गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल ९४ टक्के लागलेला होता आणि यावर्षी 91 टक्के च्या आसपास लागल्यामुळे निकालामध्ये प्रचंड घसरन झालेले आपल्याला पाहायला मिळते.जवळ जवळ 3 टक्के निकाल कमी लागला आहे. 


2. मुलींची बाजी 

बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मार्च 2023 या निकालाचे विश्लेषण करत असताना अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यावर्षीच्या निकालामध्ये पास होण्याचे प्रमाण हे मुलींचे सर्वाधिक असल्याचे दिसून आलेले आहे. हे देखील या एकमेकांना निकालाचे वेगळेपण आहे.


3.दिव्यांग विद्यार्थ्यांचा समाधानकारक निकाल 

फेब्रुवारी मार्च बारावी बोर्ड परीक्षा 2023 निकाल दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल पाहत असताना त्या दिव्यांग कुठे लागलेला आहे ही देखील एक समाधानकारक बाब आहे.


4.कोकण विभागाची बाजी 

आपण जर या वर्षीचा बारावी बोर्डाचा निकाल पाहिला तर यावर्षी देखील कोकण विभागीय मंडळांनी निकालामध्ये बाजी मारलेली आहे कोकण विभागीय मंडळाचा 96 टक्के निकाल लागलेला सून सर्वात कमी निकाल हा मुंबई विभागाचा सून केवळ 88% निकाल हा मुंबई विभागीय मंडळाचा लागलेला आहे.

2023 बोर्डाच्या परीक्षेचा निकाल कमी का लागला ? 

आपल्याला यावर्षी बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल हा तीन टक्क्यांनी घसरलेला दिसत आहे,यामागील  कारणे आपण शोधली तर आपल्या लक्षात येईल कारण मागील दोन वर्षांपूर्वी कोरोना महामारीमुळे शिक्षण व्यवस्थेवरच नव्हे तर अवघ्या जगावर खूप मोठे संकट आलेले होते. विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने शिक्षणाची सोय उपलब्ध नव्हती साहजिकच यावर्षी बारावी बोर्ड परीक्षेला बसणारे विद्यार्थी यांना याचा फटका बसलेला पाहायला मिळत आहे. कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना प्रसार माध्यमांचे व्यसन हे देखील यामागील एक कारण असू शकते.तसेच या विद्यार्थ्याना कोरोना काळात दहावी बोर्डाची परीक्षा देता न आल्याने यांना बारावी बोर्ड परीक्षा देताना दबाव आला असावा यामागील हे देखील एक कारण असू शकते.

अशा प्रकारे यावर्षीच्या बोर्डाच्या बारावीच्या निकालाची  वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील.


बारावी बोर्ड निकाल 2023महत्त्वाचे लेख 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area