Type Here to Get Search Results !

दहावीचा निकाल कधी लागेल? | When will the maharashtra 10th result be released?

दहावीचा निकाल कधी लागेल? | When will the maharashtra 10th result be released? दहावीचा निकाल देखील दुपारीच लागणार 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 30 मे ला लागण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र  तो निकाल तब्बल पाच दिवस लवकरच लागला. या निकालानंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात ssc  बोर्डाचा दहावीचा निकाल कधी लागेल? असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे. हा ह्या निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा बोर्डाकडून केली जाईल.बारावी प्रमाणे दहावीचा निकाल देखील दुपारी 2 वाजता जाहीर होण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षी दहावी बोर्डाचा निकाल दुपारी एक वाजता जाहिर करण्यात आला होता.  

दहावीचा निकाल कधी लागेल?
दहावीचा निकाल कधी लागेल?



एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल ही लवकरच लागेल SSC board 10th result will be out soon

आपण जर बारावी परीक्षेचा विचार केला तर बारावी परीक्षेचा निकाल संभाव्य तारखेच्या 5 दिवस  अगोदर लागला. याचाच अर्थ दरवर्षी दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये साधारण 6 जून  ते 10 जून च्या दरम्यान लागत असतो. मार्च 2023 दहावी बोर्डाच्या परीक्षेचा आपण जर विचार केला तर तो निकाल देखील जून महिन्याच्या अगदी सुरुवातीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.कारण अकरावी प्रवेश प्रकिया ही अतिशय वेळखाऊ असते म्हणून मुलांची गैरसोय टळावी यासाठी ssc बोर्डाकडून लवकर निकाल लावला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.  


 💥बोर्डाकडून आपल्याला आपली उत्तरपत्रिका मिळवून आपल्या विषय शिक्षकांडून  तपासून गुण वाढवण्यासाठी अर्ज करता येतो  अधिक माहीती साठी क्लिक करा 👈


महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल कोठे  पाहता येणार Where to check Maharashtra Board 10th Result

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अर्थात SSC बोर्डाचा निकाल हा महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर लागणार आहे.त्याच बरोबर इतर देखील काही महत्त्वाची संकेत स्थळे आहेत ज्यावर दरवर्षी बोर्ड आपला निकाल जाहीर करते. 


💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈


दहावी निकाल मार्च 2023 संकेतस्थळे 10th Result March 2023 Possible Websites


Mahasscboard.in 

maharesult.nic.in 

Mkclsscresult.in 

या website वर जाण्यासाठी क्लिक करा. 


💥दहावी निकाल पाहण्यासाठो वेबसाइट लिंक्स 👈


अशा काही महत्वाच्या वेबसाईटवर दहावीचा निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. मागील वर्षांच्या अनुभवानुसार या वरील वेबसाईट वरतीच इयत्ता दहावीचा निकाल हा लागत असतो.


दहावीचा निकाल पाहताना कोणत्या गोष्टी सोबत असाव्यात What things should be accompanied while checking the 10th result 

दहावीचा बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी आपल्याला आपला आसन क्रमांक म्हणजे सीट नंबर जवळ हवा. दहावी निकालाबबत अधिकृत घोषणा झाल्यानंतर त्याच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याचबरोबर इतरही संकेतस्थळावर दहावीचा निकाल हा जाहीर केला जाईल. त्यावेळी विद्यार्थ्यांनी.निकालाच्या  वेबसाईटला भेट देऊन सर्वप्रथम आपला बैठक क्रमांक त्या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि त्यानंतर आईचे नाव इंग्रजीमध्ये नोंदवल्यानंतर व्ह्यू रिझल्ट या बटणावर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना निकाल हा पाहता येणार आहे.


💥दहावीचा निकाल मोबाईलवर कसा चेक करावा माहिती  👈


थोडक्यात काय तर अगदी या दोन ते चार दिवसांमध्येच दहावीच्या निकालाची तारीख घोषित होईल.आणि दहावीचा निकाल कधी लागेल ?हा प्रश्न लवकर निकालात निघेल. 


आमचे हे लेख वाचा 

अकरावी प्रवेश student registration आणि भाग एक कसा भरावा 

करावी प्रवेश नोंदणी आणि भाग एक भरणे संपूर्ण डेमो 

अकरावी भाग 2 कसा भरावा यासाठी एक फॉर्म भरून दाखवला आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area