Type Here to Get Search Results !

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 ची कार्यवाही सुरू करण्याबाबत शिक्षण संचाललनालयाकडून आदेश जारी | 11th Online Admission Process 2023 24 Order issued by Education Directorate

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 ची कार्यवाही सुरू करण्याबाबत शिक्षण संचालनयाकडून आदेश जारी | 11th Online Admission Process 2023 24 Order issued by Education Directorate 

शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये  महाराष्ट्र राज्यातील मुंबई महानगर महानगरपालिका , पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्र याठिकाणी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने राबवली जाते. दहावीचा निकाल लागल्यानंतर अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला वेग येण्यासाठी खालील कार्यवाही अपेक्षित आहे.असा आदेश शिक्षण संचालनयाकडून आदेश जारी केला आहे . या आदेशात खालील बाबी आहेत. 


अकरावी प्रवेश 2023  24 परिपत्रक (toc)


१.ऑनलाइन अर्ज भरणे व अन्य प्रवेश कार्यवाहीचे टप्पे खालीलप्रमाणे असतील.


१.उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालयांसाठी विद्यालय नोंदणी Jr College Registration - ७ जून 2023 पर्यंत करणे 

अकरावी प्रवेश देण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेश प्रक्रियेच्या पोर्टलवर नोंदणी करणे.आवश्यक आहे. त्यासाठी लॉगीन आयडी तयार करून देणे, विद्यालयांची भरलेली माहिती प्रमाणित करणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे इ. कार्यवाही शिक्षण उपसंचालक यांचेकडून करण्यात यावी.)


२.प्रवेश प्रक्रियेची कार्यपद्धती

अकरावी ऑनलाइन प्रवेश विद्यार्थ्यांना  कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश दोन प्रकारे घेता येतील.


💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈 


१. केंद्रीय प्रवेश फेन्यांद्वारे Allotment मिळवून. (CAP Seats) किंवा


२. कोटांतर्गत जागांवर संबंधित विद्यालयास संपर्क साधून (Quota Seats) 


CAP ROUND  - यासाठी वेळापत्रक येईल 

प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भाग-१ भरुन प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर,

 (CAP Seats) करीता आयोजित करण्यात येणान्या प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्यांस अर्जाचा भाग २ मध्ये प्रवेशासाठी विद्यालये निवडता येतील.


💥अकरावीला आपल्याला कोणते कॉलेज मिळाले असे चेक करतात 👈


अकरावी प्रवेश 2023 24 साठी CAP राऊंड साठी किती कॉलेज निवडता येतील 

किमान १ कमीत कमी 

 कमाल १० पसंतीक्रम जास्तीत जास्त 

 देता येतील. विद्याथ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार CAP प्रवेश फेरीमध्ये Allotment देण्यात येईल व विद्यार्थी संबंधित विद्यालयात आपला प्रवेश निश्चित करतील.



QUOTA प्रवेश 


(Quota Seats) वरील प्रवेशासाठी Quota Choices मध्ये ऑनलाईन विद्यालये निवडता येतील. कोटांतर्गत प्रवेशासाठी विद्याथ्यांनी दिलेल्या कोटा पसंतीनुसार यादी संबंधित विद्यालयास दर्शविण्यात येईल.


सदर यादीनुसार विद्यालये कोटा निहाय गुणवत्ता यादी तयार करतील व पात्र विद्यार्थी संबंधित विद्यालयात आपला प्रवेश निश्चित करतील. विद्यालयामध्ये झालेले सर्व प्रवेश त्या-त्या वेळी संकेतस्थळावर नोंदविले जातील. 


अकरावी प्रवेश विद्यार्थी यांच्यासाठी महत्त्वाचे 

३.विद्यार्थी व मार्गर्शन केंद्र यांचेसाठी पोर्टलवर करावयाची कार्यवाही

विद्यार्थ्यांनी या बाबी पूर्ण कराव्यात त्या त्यांच्यासाठी महत्वाच्या आहेत.


१) विद्यार्थी नोंदणी Student Registration

(विद्याथ्र्यांनी ऑनलाईन नोंदणी करुन लॉगीन आयडी व पासवर्ड सेट करणे) ते कसे करावे यासाठी खालील लिंकवर संपूर्ण माहिती दिलेली आहे. 


२) प्रवेश अर्ज भाग-१ भरणे

 (भरलेला अर्ज स्वतःची इ.१० वी माध्यमिक शाळा किंवा मार्गदर्शन केंद्र यांचेकडून प्रमाणित करुन घेणे.) याबाबत माहिती साठी आमचा खालील लेख वाचा वाचण्यासाठी क्लिक करा. 

 ही कार्यवाही दि.१२/०६/२०२३ पर्यंत पूर्ण करणे.


३) पसंतीक्रम देणे, भाग-२

 (CAP Option Form ) भरणे (प्रवेश फेरीपूर्वी प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे)  (वेळापत्रक येईल त्याप्रमाणे पूर्ण करा.)


कोटा प्रवेशासाठी पसंती देणे, (Quota Choices) भरणे

(कोटांतर्गत प्रवेशासाठी पसंतीची कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन निवडणे) 


इनहाऊस कोटा म्हणजे काय 

 इनहाऊस कोटा हा त्यांच संस्थेची माध्यमिक शाळा संबंधित विभागात असेल तर अशा माध्यमिक शाळांमधील इ.१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना लागू होईल.

अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 



अल्पसंख्याक कोटा म्हणजे काय 

 फक्त अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालयात उपलब्ध असेल आणि या जागांवर अल्पसंख्याक प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी  प्रवेश देता येईल.


 व्यवस्थापन कोटा 

हा त्या संस्थास्तरावरील प्रवेशासाठी असेल. सदर कोटा हा शाळांसाठी ऐच्छिक असेल.


 कोणत्याही कोटांतर्गत राखीव जागांवर पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देणे व रिक्त जागा CAP साठी प्रत्यार्पित करणे वेळापत्रकानुसार सुरु राहील.

अर्ज भरतांना, केवळ ज्या विद्यार्थ्यांना  मुंबई महानगर क्षेत्र (MMR), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका या शहरांमधील राज्यमंडळ संलग्न कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल अशाच विद्यार्थ्यांनी या प्रणालीच्या मध्यमातून अर्ज करावा. राज्यातील उर्वरित ठिकाणच्या प्रवेशासाठी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांशी संपर्क साधावा. अशा सूचना विद्यार्थी व पालकांना द्याव्यात.

मार्गदर्शन केंद्र व माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांचे अर्ज वेळेत प्रमाणित करणेबाबत आवश्यक सूचना देण्यात येऊन ऑनलाईन प्रवेश क्षेत्रातील सर्व विद्यालये पोर्टलवर समाविष्ट झाली असल्याचे खात्री करावी. संबंधित घटकांसाठी आवश्यकतेनुसार आपल्या स्तरावरुन प्रशिक्षणाचे आयोजन करावे.

अशा सर्व सूचना अकरावी प्रवेश प्रक्रिया यासाठी देण्यात आलेल्या आहेत. 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 ची कार्यवाही सुरू करण्याबाबत शिक्षण संचाललनालयाकडून आदेश pdf 

Download 👈


आमचे हे लेख वाचा 

महाराष्ट्रात होणार मेगा तलाठी भरती जाहिरात  

दहावीनंतर कोणती शाखा विषय निवडावेत यासाठी

दहावी उत्तरपत्रिका गुण पडताळणी आणि झेरॉक्स कशी मिळवावी याबाबत माहिती 

अकरावी प्रवेश 2023 24 साठी झालेले महत्त्वाचे बदल 

अकरावी ऑनलाइन प्रवेश घेताना कोणती कागदपत्रे लागतात 

दहावी नंतर पुढे  शिक्षणाच्या संधी  


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area