शैक्षणिक वर्ष 2023 24 पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पृष्टांच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शक सूचना परिपत्रक | Academic Year 2023 24 Guidelines Circular on Effective Use of Blank Pages in Textbook
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थात बालभारती यांच्याकडून शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी शासनाचा नवीन उपक्रम पाठ्यपुस्तकातील वह्यांची पृष्टे यांचा वापर प्रभावीपणे कसा करावा ? याबाबत बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी एक परिपत्रक काढलेले आहे. या परिपत्रकामध्ये सर्व मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्या मार्गदर्शक सूचना सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी अमलात आणायच्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी पुस्तकांमध्येच वहीची पाने असणे अगदी नवीन आहे. विद्यार्थी व शिक्षक यांना पाठ्यपुस्तकातील वह्यांच्या पानांचा उपयोग कशा पद्धतीने करावयाचा आहे ? या संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ते आपण पाहूया.
शैक्षणिक वर्ष 2023 24 पाठ्यपुस्तकातील वाह्यांच्या पृष्टांच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शक सूचना परिपत्रक |
पाठ्यपुस्तकात वाह्या असलेल्या पुस्तकांची रचना कशी आहे |How are the books outside the textbook structured?
शैक्षणिक वर्ष 2023 24 साठी शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार पाठ्यपुस्तकांमध्ये व यांच्या पानांचा जो समावेश केलेला आहे. ही सर्व पृष्ठे माझी नोंद या शीर्षकाखाली पाठ्यपुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली आहे.
पाठ्यपुस्तकात वह्यांची पृष्ठे असणाऱ्या पुस्तकाचे वैशिष्टे | Features of a book with book pages in a textbook
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासनाकडून पाठ्यपुस्तकांमध्येच अधिकची पाने जोडून विद्यार्थी त्या ठिकाणी नोंदी घेणार आहेत. आपला अभ्यास करणार आहेत. इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी चार भागांमध्ये पथदर्शी स्वरूपात ही पुस्तके प्रकाशित केली जाणार आहेत. हा उपक्रम व्यवस्थित रित्या राबवण्यासाठीच या परिपत्रकातील सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याकडे आपण वळूया.
💥दहावीनंतर इंजिनियरिंग डिप्लोमा कोर्स 2023 24 साठी ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात 👈
पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा उपयोग या कामासाठी करावा Pages from the textbook should be used for this work
पुस्तकातील पानाचा वापर, सर्वसाधारणपणे खालील स्वरूपाच्या नोंदी आवश्यकतेनुसार घेण्यासाठी करता येईल.
१. माझी नोंद यामध्ये लवचिकता
प्रत्येक विदयार्थ्यांच्या 'माझी नोंद' यामधील नोंदी समान असण्याचा आग्रह धरू नये.
२.नोंदी तारखानिहाय नोंदवा
विदयार्थ्यांनी तारीखवार नोंदी कराव्यात.
३. वर्गातील चर्चेतील नोंदीबाबत
वर्गातील चर्चेदरम्यान उपस्थित झालेले मुद्दे लिहून ठेवण्यासाठी
४. महत्त्वाचे मुद्दे नोंदवण्यासाठी
मुलांना शिकवत असतानामहत्त्वाचे मुद्दे नोंदवून घेण्यासाठी
५.शिकत असताना मनात आलेले प्रश्न नोंदवण्यासाठी
वर्गात सूचवलेले अधिकचे प्रश्न नोंदवण्यासाठी
६. संदर्भ नोंदी
काही संदर्भ, वर्तमानपत्रांत विषयांच्या अनुषंगाने आलेली विविध प्रकारची माहिती / साहित्यांची नोंद घेणे.
७. अवांतर नोंदी घेण्यासाठी
पाठाच्या अनुषंगाने वर्तमानपत्रे, माध्यमे इत्यादींद्वारे प्रकाशित झालेल्या अवांतर माहितीची पाठ्यपुस्तकांबाहेरी माहिती लिहून ठेवण्यासाठी.
८. पूरक माहिती
पाठ्यपुस्तकांबाहेरील परंतु आशयाला पूरक माहितीची नोंद घेणे.
९.अध्ययन अध्यापन प्रश्न नोंदी
अध्ययन अध्यापन होत असताना निर्माण झालेले प्रश्न या ठिकाणी विद्यार्थी नोंदवू शकतात.
१०. आकृत्या काढण्यासाठी
चित्राकृती, चित्र, आलेख, आकृत्या काढण्यासाठी
११. पाठातील पूरक मुद्दे नोंदवण्यासाठी
पाठाला पूरक मुद्दे लिहून ठेवण्यासाठी
१२. कच्चे काम करण्यासाठी
कच्चे काम (पेन्सिलने ), सूत्रलेखन, महत्त्वाचे संबोध, गणित सोडवण्याची वेगळी रीत मांडणे, पाढे तयार करण पडताळणी करणे इत्यादी.
१३. महत्वाचे नियम सूत्रे लिहिण्यासाठी
नियम, सूत्रे, घटना, संबंध, घटनाक्रम आकृत्या, ओघतक्ता, संकल्पनाचित्र, मुक्तोत्तरी प्रश्नांची नों तुलनात्मक नोंदी, व्यावहारिक अनुभव विश्वातील उदाहरणे, नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद, स्वनिम्ि उदाहरणांची नोंद
१४. शब्दार्थ लिहिण्यासाठी
प्रतिशब्द, संकल्पना, पर्यायी शब्द, वाक्प्रचार, जोडशब्द, म्हणी, भाषिक खेळ, भाषिक सौं असणारी वाक्ये, व्याकरणातील व्याख्या व उदाहरणे, महत्त्वाचे जोडशब्द, विरुद्धार्थी, समानार्थी शब् सुविचार, सुभाषित, ब्रीदवाक्ये, भाषिक खेळ, इंग्रजीतील शब्दांचे उच्चारण देवनागरी लिपीमध्ये लिहिणे. १५. सहसंबंध लावण्यासाठी, महत्त्वाच्या संकल्पना उतरवण्यासाठी, विस्तारित अर्थ नोंदवणे.
१६. चित्रकला छोट्या मुलांसाठी
रेखाकाम, ठसेकाम, चित्रकाम (इयत्ता पहिली ते पाचवीसाठी)
१७. उदाहरणे लिहिण्यासाठी
विषयाच्या अनुषंगाने विदयार्थ्यांना सूचलेल्या स्वतःच्या उदाहरणांच्या नोंदीसाठी
१८सहसंबंधाची नोंद
. विषय शिकताना इतर विषयाशी आलेल्या सहसंबंधाची नोंद
१९. घरचा अभ्यास लिहिण्यासाठी
गृहकार्य लिहून घेण्यासाठी
२०. विमर्शी (Reflective) किंवा चिंतनशील मुद्दयांची नोंद
मुलांना शिकत असताना चिंतन करायला भाग पडणारे प्रश्न या ठिकाणी नोंदवले जातील.
२१. शंका नोंदवून ठेवणे
अध्ययन करताना आलेल्या शंका लिहून ठेवण्यासाठी
पाठ्यपुस्तकातील वाह्यांची पाने या उपक्रमाचा उद्देश
या नावीन्यपूर्ण उपक्रम राबवन्यामागील उद्देश पुढीलप्रमाणे आहे, हे विचारात घेऊन या पानांचा अत्यंत प्रभावी वापर होईल असे पाहावे :
१.दप्तराच्या बोजाच्या प्रश्न
एकच पाठ्यपुस्तक शाळेत न्यावे लागेल त्यामुळे दप्तराचे ओझे कमी होण्यास मदत होईल.
२.स्वयंअध्ययन करताना मदत
पाठ्यपुस्तकांचे स्वयंअध्ययन करताना या नोदींचा वापर विद्यार्थ्यांना करता येईल.
३.प्रत्याभरण
नोंदीचा वापर त्याला स्वयंअध्ययनासाठी करता येईल, त्यामुळे प्रत्याभरण (Feedback) व दृढीकरण (Fixation) होईल.
४. नोट्स लिहिण्याची सवय
विदयार्थ्यांना स्वत:च्या शब्दांमध्ये स्वतःच्या नोंदी करता येतील व ही सवय त्यांच्या अंगवळणी पडेल.शिक्षकांनी दिलेली उदाहरणे विद्यार्थ्यांना 'माझी नोंद' यामध्ये नोंदवता येतील.
६. सुलभ साहित्य निर्मिती
त्यांचे स्वत:चे सुलभ संदर्भ साहित्य तयार होईल.
७.मुद्दे काढण्याची सवय
स्वतःचे मुद्दे विदयार्थ्यांना काढता येतील.
८. नोंदी जवळ राहतील
आशयानुसार दिलेल्या विशेष नोंदी करता येतील.
9. इतर उद्देश
1. महत्वाच्या नोंदी
अवांतर वाचनातून तयार झालेल्या महत्त्वाच्या नोंदी घेता येतील.
2. इतर माहिती संदर्भ नोंद
पाठाच्या संदर्भात वर्तमानपत्रे, नियतकालिके इत्यादी संदर्भाची माहिती त्या त्या पाठाला जोडून लिहिता येईल.
9. अभ्यासात मदत
पाठाची शिकलेली सर्व माहिती नोंद घेतलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुन्हा आठवणे सुलभ होईल.
10. ज्ञानार्थी विद्यार्थी
अध्ययनाच्या या सवयीचा फायदा त्यांना पुढील इयत्तांमध्ये उपयोगी पडेल.
१३. विषयातील सहसंभंध पक्के
पाठ्यपुस्तकात सर्व विषय असल्याने विषयांमधील सहसंबंध शोधणे सुलभ होईल.
१४.परीक्षा नियोजन करताना मदत
घटक चाचणी व सत्र परीक्षा या संदर्भाने नियोजन करणे सुकर होईल.
१५. मुलांची प्रगती
पालकांना मुलाची प्रगती समजेल तसेच पालकांना आपल्या मुलाला वर्गात आज नेमके काय शिकवले आहे ? हे समजेल.
शैक्षणिक वर्ष 2023 24 पाठ्यपुस्तकातील वाह्यांच्या पृष्टांच्या प्रभावी वापराबाबत मार्गदर्शक सूचना परिपत्रक pdf Academic Year 2023 24 Guidelines Circular on Effective Use of Blank Pages in Textbook pdf
आपल्याकडे ही माहिती कायम स्वरूपी राहावी यासाठी याचे परिपत्रक आपल्याला देत आहोत.
अशा व्यापक उद्देशाने शाशनाकडून हा उपक्रम राबवला जात आहे, शिक्षक व यांनी हा उपक्रम राबवत असताना वरील मार्गदर्शक सूचना पाळाव्यात जेणेकरून दपत्रांचे ओझे हा प्रश्न कायमचा निकालात निघेल.ही माहिती इतराना देखील पाठवा.
आमचे इतर लेख
पुणे विद्यापीठाचे नवीन कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या विषयी माहिती
अकरावी प्रवेश प्रक्रिया संपूर्ण माहिती
दहावीनंतर कोणती शाखा विषय निवडावेत यासाठी
दहावी उत्तरपत्रिका गुण पडताळणी आणि झेरॉक्स कशी मिळवावी याबाबत माहिती
अकरावी प्रवेश 2023 24 साठी झालेले महत्त्वाचे बदल
महाराष्ट्रात होणार मेगा तलाठी भरती जाहिरात 2023
दहावीनंतर कोणती शाखा विषय निवडावेत यासाठी
अकरावी ऑनलाइन प्रवेश घेताना कोणती कागदपत्रे लागतात
दहावी नंतर पुढे शिक्षणाच्या संधी