Type Here to Get Search Results !

मुंबई महानगरपालिकेत नर्सिंग अभ्यासक्रम 2023 24 प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू|Mumbai Municipal Corporation Nursing Course 2023 24 online application for admission

मुंबई महानगरपालिकेत नर्सिंग अभ्यासक्रम 2023 24 ऑनलाईन अर्ज सुरू  | Mumbai Municipal Corporation Nursing Course 2023 24 online application for admission

ज्या महिला/मुलींना  सामान्य परिचर्या व प्रसूती शास्त्र अभ्यासक्रम अर्थात नर्सिंग कोर्स करायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही घेऊन आलेलो आहोत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नर्सिंग प्रशिक्षण संस्थांमध्ये सुरू होणाऱ्या नर्सिंग कोर्सेस विषयी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. चला तर मग या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 3 वर्षांच्या नर्सिंग कोर्सेस विषयी सविस्तर माहिती पाहूया. 


मुंबई महानगरपालिकेत नर्सिंग अभ्यासक्रम 2023 24  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
मुंबई महानगरपालिकेत नर्सिंग अभ्यासक्रम 2023 24  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू


नर्सिंग कोर्स 2023 24 (toc)


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नर्सिंग कोर्सेस साठी अर्ज करण्याची पद्धत

ज्या महिलांना सामान्य परिचर्या व प्रसूतीशास्त्र अभ्यासक्रम (3 वर्षांसाठी) अर्ज करायचा आहे त्यांनी तो अर्ज आपल्याला ऑनलाइन पद्धतीने करावयाचा आहे.


💥दहावी नंतर डिप्लोमा प्रवेश ऑनलाइन अर्ज सुरू👈 (अधिक माहितीसाठी क्लिक करा )


नर्सिंग कोर्सेस साठी अर्ज करण्यासाठी वेबसाईट

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या खालील वेबसाईटवर जाऊन आपण ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे.



💥केंद्रप्रमुख परीक्षा टिप्स आणि ऑनलाइन टेस्ट 👈


 मुंबई मनपा च्या ऑनलाईन सेवा या सदरामध्ये GNM NURSING ADMISSION या शीर्षकाखाली प्रवेश संपूर्ण प्रक्रिये विषयी माहिती तसेच वेळापत्रक देण्यात आलेले आहे.


https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous


नर्सिंग कोर्स साठी अर्ज करण्याचा कालावधी 

 दिनांक 13.01.2023 पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत यांची नोंद घ्यावी.ऑनलाइन अर्ज  भरण्याची मुदत 15.06.2023 ते  24.06.2023 अशी आहे.


नर्सिंग अभ्यासक्रमाचा कालावधी

निवड झालेल्या उमेदवारांना सामान्य परिचर्या व प्रसतिशास्त्र अभ्यासक्रमास सार्वजनिक आरोग्य परिचर्या आणि प्रसूतीशास्त्र आंतरवासिता सह 3 वर्षे अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घ्यावे लागेल.


निवासी नर्सिंग कोर्स 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 3 वर्षाच्या नर्सिंग कोर्सला प्रवेश घेतल्यानंतर संबधीत महाविद्यालयाच्या वसतिगृहामध्ये रहाणे अनिवार्य आहे.


💥अकरावी प्रवेश 21 जूनला पहिल्या राऊंड मध्ये  कोणते कॉलेज मिळाले असे चेक करा 👈


नर्सिंग कोर्स एकूण जागा 

नर्सिंग कोर्सेस साठी एकूण 350  जागा उपलब्ध आहेत.तसेच यासाठी सामाजिक आरक्षणाचा देखील विचार केला जाणार आहे. सविस्तर माहितीसाठी आपण आम्ही सोबत दिलेले पीडीएफ पाहू शकता.


अर्जाची फी

वर्षासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी

  •  खुल्या गटातील विद्यार्थ्यांना 601 
  •  मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 401

 इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा  करावे लागेल.


नर्सिंग प्रशिक्षणादरम्यान मिळणाऱ्या सुविधा 

प्रशिक्षण घेणाऱ्या महिला उमेदवारांना निवासाची तसेच भोजनाची मोफत सुविधा आहे.


💥Iti ऑनलाइन प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायला सुरुवात👈


नर्सिंग कोर्स करणाऱ्या महिलांसाठी भत्ते

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नर्सिंग महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यावेतन दरमहा रु.100-10-120 अधिक रु.340/- गणवेश भत्ता अधिक रु.150/- घुलाई भत्ता अधिक मोफत निवासस्थान मोफत भोजन या व्यवस्था आहेत. ही सर्व व्यवस्था या ठिकाणी उपलब्ध आहे.


नर्सिंग कोर्ससाठी शैक्षणिक  पात्रता

1. उमेदवार महाराष्ट्र राज्य उम्य माध्यमिक शालांत परीक्षा याची उच्च माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (10+2) अथवा समतुल्य परीक्षा शासनमान्य संस्थेतून प्राधान्याने जीवशास्त्र, रसायनशास्त्र ,भौतिकशास्त्र  (BIOLOGY, CHEMISTERY, PHYSICS) या शास्त्र विषयासह (पी.सी.बी.) कमीत कमी 40 टक्के गुणांनी उत्तीर्ण /पास असणे आवश्यक आहे. 


💥महाराष्ट्र शासन 31 शिष्यवृत्ती योजना माहिती 👈


अतिशय महत्त्वाचे 

वरीलप्रमाणे आवश्यक पात्रता धारण करणारे उमेदवार पुरेशा संख्येने उपलब्ध झाले नाहीत तर महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाची कोणत्याही शाखेतील आणि कोणाही विषयातील माध्यमिक परिक्षा (10+2) कमीत कमी 40% गुणांनी उत्तीर्ण करणा-या खुला गटातील उमेदवारांचा व कमीत कमी 35 गुणांनी उत्तीर्ण होणा-या मागासवर्गीय गटातील प्रवेशासाठी विचार करण्यात येईल.


2.अपंगांसाठी पाच टक्के जागा आरक्षित राहतील या जागांवर उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या त्या  प्रवर्गातील उमेदवारांमधून निवड करण्यात येईल. 


3. उमेदवार दहावी (10वीं) व बारावी (12वी इयत्ता परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यम माध्यमिक अथवा समतुल्य शिक्षण मंडळातून उत्तीर्ण झालेली असली पाहिजे.


4. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तलाव उच्च परीक्षा किमान 50 गुणांचा मराठी विषय घेऊन (उच्च स्तर निम्न स्तर) उत्तीर्ण झालेली असली पाहिजे. मराठी भाषा सुलभतेने लिहिता वाचता बोलता आली पाहिजे.


5. पदांच्या संख्येत बदल होऊ शकतो. 


💥पहिली ते दहावी वार्षिक नियोजन 👈


नर्सिंग कोर्स वयाची अट 

दिनांक 31.07.2023 रोजी 17 से 35 वर्ष.

उमेदवारांचा जन्मदिनांक दिनांक 01.08.1988 पासून दिनांक 31.07.2006 पर्यंत असल्यास प्रदेशास पात्र समजले जाईल. 


नर्सिंग कोर्स समुपदेशन 

समुपदेशनासाठी निवड  झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी ऑनलाईन अर्जाची प्रत ,अर्ज शुल्क पावती सहीत हजर रहावे लागेल, समुपदेशन करीता पात्र उमेदवारांची यादी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नाहीर केली जाईल व समुपदेशनासाठी हजर राहणेकरीता उमेदवारांना कुठलाही वैयक्तिक पत्रव्यवहार केला जाणार नाही. 


समुपदेशन सेंटर 

 रा. ए.मा.रुग्णालय, परेल, मुंबई 400012, या ठिकाणी या समुपदेशन वर्गाचा आयोजन करण्यात आलेला आहे.

मुंबई महानगरपालिकेची नर्सिंग महाविद्यालय आणि त्यांचा पत्ता

मुंबई महानगरपालिकेत 5 महाविद्यालयासाठी नर्सिंग कोर्सेस उपलब्ध आहेत 

1. रा.ए. ना. रुग्णालय, परेल, मुंबई 400 012

2. लो. टि.स.स.रुग्णालय, सायन, मुंबई 400 022-

3. मा.प्र.स. नायर धर्मा रुग्णालय, मुंबई सेंट्रल, मुंबई 400008

4. डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले, मुंबई 400049

5. श्री हरिलाल भगवती रुग्णालय (पश्चिम), मुंबई 400103 

नर्सिंग प्रवेश परिपत्रक पीडीएफ nursing course all information pdf 

DOWNLOAD 👈click here 

मुलीना स्वतच्या पायावर उभे राहण्यासाठी तसेच तात्काळ नोकरी मिळवण्यासाठी अतिशय महत्वाचा कोर्स आहे. ज्यांची आर्थिक परिस्थिति नाजुक आहे त्यांनी तर आवर्जून हा कोर्स करावा. ही माहिती इतराना देखील पाठवा. 


आमचे इतर लेख 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area