Type Here to Get Search Results !

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 NCL प्रमाणपत्र जमा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ |11th Online Admission 2023 24 Three Months Deadline to Submit NCL Certificate|

अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 NCL प्रमाणपत्र जमा  करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत |11th Online Admission 2023 24 Three Months Deadline to Submit NCL Certificate 

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया 2023 24 मध्ये विद्यार्थ्यांना आपला कॉलेजमध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक आहे.ही कागदपत्रे अपलोड करत असताना SC& ST प्रवर्गातील उमेदवार सोडून VJNT, OBC, SBC यासारखे  इतर प्रवर्ग की जे अकरावी प्रवेशासाठी  आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितात अशा सर्व  विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर अर्थात प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक असते .अशा विद्यार्थ्यांना एक  दिलासा देणारी आजची  ही माहिती आहे.


अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 NCL प्रमाणपत्र जमा  करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ
अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 NCL प्रमाणपत्र जमा  करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ


NCL प्रमाणपत्र संपूर्ण माहिती (toc)

अकरावी प्रवेश 2023 24 NCL प्रमाणपत्र जमा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढ | 11th Admission 2023 24 Extension of three months for submission of NCL certificate

जे विद्यार्थी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये नॉन क्रिमीलेअर /NCLप्रमाणपत्र सादर करू शकत नाहीत,अशा विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळण्यासाठी केलेल्या अर्जाची पोहोच पावती आणि हमीपत्र भरून  प्रवेश देण्यात यावा. NCL प्रमाणपत्र सादर करण्यासाठी  तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी. असा आदेश कक्ष अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 22 जून 2023 रोजी काढलेला आहे.


💥ITI ऑनलाइन प्रवेश अर्ज सुरू असा करा अर्ज 👈


अकरावी प्रवेश नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र जमा करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत वाढ ती परिपत्रक पीडीएफ | Three Months Extension for Submission of Class XI Admission Non-Criminal Certificate Circular PDF

DOWNLOAD 👈 click here 


नॉन क्रिमीलेअर काढण्याची प्रक्रिया | A non-creamy layer extraction process

बऱ्याच विद्यार्थ्यांना तसेच पालकांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र  कसे काढतात या विषयी माहिती नसते. हे प्रमाणपत्र काढणे अतिशय सोपे आहे. त्या अगोदर प्रथम आपण नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र म्हणजे काय म्हणजे काय ते पाहूया. 


अकरावी प्रवेश 2023 24 दुसरा राऊंड कधी सुरू होणार ? | 11th Admission 2023 24 When will second round start ?

ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला हवे ते कॉलेज मिळालेले आहे ते विद्यार्थी अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये खुश आहेत.परंतु ज्या विद्यार्थ्यांना हवे ते कॉलेज मिळाले नाही त्या विद्यार्थ्यांना दुसरी फेरी कधी सुरू होणार? त्याचबरोबर काही कारणास्तव जे विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये भाग घेऊ शकले नाहीत, त्या विद्यार्थ्यांना देखील आता अकरावी प्रवेशाचा दुसरा राउंड कधी सुरू होईल? याविषयी उत्सुकता लागलेली आहे. साधारणपणे पहिला राउंड 24 जूनला संपल्यानंतर अंदाजे तीन ते चार दिवसांमध्ये विद्यार्थ्यांसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. यासंदर्भात लगेच अपडेट मिळवण्यासाठी आम्ही खाली आपल्याला आमच्या व्हाट्सअप ग्रुप ची लिंक दिली आहे त्यावर आपण जॉईन होऊ शकता.


अकरावी प्रवेश प्रक्रिया 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.

अकरावी प्रवेश मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक 

आपल्याला यावर सर्व माहिती दिली जाईल खालील पीडीएफ मध्ये सर्व माहिती आहे तरी जरूर एकदा ती वाचावी.  

अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈


नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र म्हणजे काय |What is Non Creamy Layer Certificate?

जे उमेदवार अनुसूचित जाती आणि जमाती म्हणजेच SC &ST जात प्रवर्गातील आहेत त्यांच्यासाठी हे प्रमाणपत्र जमा करण्याची अट लागू नाही. थोडक्यात एससी आणि एसटी या प्रवर्गातील उमेदवारांना कोणत्याही सुविधेचा किंवा आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची अट नाही. याव्यतिरिक्त ओबीसी,NT,VJNT,SBC या प्रवर्गातील उमेदवारांना आपण प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे जे प्रमाणपत्र सादर करावे लागते यालाच नॉन क्रिमिलियर म्हटले जाते.


💥अकरावी ऑनलाइन प्रवेश 1 असा भरा  👈 &




नॉन काढण्यासाठी उत्पन्नाची अट| Income condition for withdrawal of non

ज्या कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे  एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे असे व्यक्ती नॉन क्रिमीलेअर काढण्यासाठी पात्र असतात. किंवा ते त्यांना शासनाकडून उपलब्ध करून दिले जाते. थोडक्यात sc आणि St प्रवर्ग सोडता इतर प्रवर्गातील उमेदवारांना कोणताही लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा निश्चित केलेली आहे असे देखील याला  आपण म्हणू शकतो.


💥अकरावी प्रवेश  आपल्यासाठी BEST कॉलेज एका मिनिटांत असे शोधा 👈


चला तर मग जर तुमचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल तर तात्काळ तुम्ही नॉन क्रिमीलेअर काढण्यासाठी अर्ज करावा.ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी NCL प्रमाणपत्र काढण्यासाठी कोणकोणती  कागदपत्रे तुम्ही सोबत न्यायची  आहेत ते आपण पाहूया. जवळजवळ तीन महिन्यांचा कालावधी दिल्यामुळे नक्कीच आपण उर्वरित कालावधीमध्ये नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढून आपला अकरावीचा प्रवेश निश्चित करू शकता.


नॉन क्रिमिलियर काढण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे |  Important Documents Required for Non-Criminal Removal


१. ओळखीचा पुरावा|Proof of Identity (किमान -1)

आपल्याला दिलेल्या यादी पैकी कोणतेही एक कागदपत्र आपल्याला ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता येईल. सर्वसाधारणपणे आज प्रत्येकाकडे आधार कार्ड आणि पॅन कार्ड त्याचबरोबर वोटिंग कार्ड ही कागदपत्रे असतात यापैकी कोणतेही एक कागदपत्र आपल्याला नॉन क्रिमीलेअर काढण्यासाठी जोडायचे आहे.


2. पत्त्याचा पुरावा म्हणून जोडावयाची कागदपत्रे  | Proof of Address (किमान -1) 

NCL काढण्यासाठी पत्त्याच्या पुराव्यासाठी देखील दहा प्रकारची कागदपत्रे सांगितले आहेत यापैकी आपण वर उल्लेख केलेले आधार कार्ड आणि वोटर कार्ड आपल्याकडे नक्कीच असेल.तसेच आपण खालीलपैकी कोणते एक कागदपत्र आपला रहिवास पुरावा म्हणून NCL काढण्यासाठी सादर करू शकता. यापैकी कोणतेही एक कागदपत्रे असावे. 

3.इतर कागदपत्रे | Other Documents (किमान -1) 

इतर कागदपत्रांमध्ये आपल्याला खालीलपैकी कोणते कागदपत्र त्या ठिकाणी सादर करावे लागेल.

अनिवार्य कागदपत्रे | Mandatory Documents(सर्व अनिवार्य) 

NCL काढण्यासाठी  काही कागदपत्रे अशी आहेत की, ती कागदपत्रे आपल्याला जमा करणे बंधनकारक आहे. विशेष करून आपला उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे यासाठी उत्पन्नाचा दाखला नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी अगोदर तो आपण काढून घ्यायचा आहे.

थोडक्यात काय तर ज्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढायचे आहे.अशा विद्यार्थ्यांना CAST सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला, ओळख आणि पत्त्याचा पुरावा & सर्वात महत्त्वाचे INCOME CERTIFICATE ही कागदपत्रे महत्वाची आहेत. तरी ती जर आपल्याजवळ असल्यानंतर आपल्याला लगेचच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळू शकते.


नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कोठे काढतात | Where do you get the Non-Criminal Certificate?

आपल्याला नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढण्यासाठी आपण महा-ई-सेवा केंद्र मध्ये देखील ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याचबरोबर आपण ज्या परिसरात राहतो त्या तहसील कार्यालयाशी संपर्क करून सेतू केंद्रावर जाऊन आपण सर्व चौकशी करून व लागणारी सर्व कागदपत्रे जमा करून आपले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढू शकता.


नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळवण्याबाबत सविस्तर माहिती यासाठी सांगितली की बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रमाणपत्र काढण्यासाठी अजून तीन महिन्यांचा कालावधी आहे. आणि साधारणपणे तीन ते चार आठवड्यांमध्ये आपल्याला नॉन क्रिमिलियर  प्रमाणपत्र मिळत असते. तरी सर्वांनी लवकरात लवकर आवश्यक ती कार्यवाही करून अकरावी प्रवेशासाठी लागणारे हे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र काढून घ्यावे ही विनंती. 

NCLप्रमाणपत्र ऑनलाइन काढण्याची प्रक्रिया | NCL Certificate Online Extraction Process

अधिक माहितीसाठी खालील vedeo पहावा. किंवा वर सांगितलेल्या ठिकाणी भेट देऊन NCLकाढून घ्यावे. 





अकरावी प्रवेशाच्या संदर्भात येणारे सर्व अपडेट आपल्यापर्यंत तात्काळ प्राप्त करण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

चला तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद

आमचे इतर लेख 

प्रत्यक्ष 11 प्रवेशाला कॉलेजला जाताना ही कागदपत्रे सोबत न्या 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area