Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र मेगा तलाठी भरती 2023 महाराष्ट्रामध्ये 4625 पदांची मेगा तलाठी भरतीचे जाहिरात प्रारूप प्रकाशित |Talathi Recruitment 2023 in Maharashtra 4625 Posts Megha Talathi Recruitment Advertisement Format Released |

महाराष्ट्र मेगा  तलाठी भरती 2023 महाराष्ट्रामध्ये 4625 पदांची मेगा  तलाठी भरतीचे जाहिरात प्रारूप प्रकाशित |Talathi Recruitment 2023 in Maharashtra 4625 Posts Megha Talathi Recruitment Advertisement Format Released 

जे उमेदवार तलाठी भरती 2023 ची वाट पाहत होते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट अर्थात ब्रेकिंग न्यूज आहे.प्रशासनाच्या भूलेख आणि महसूल विभाग यांच्या अंतर्गत येणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेसाठी 2023 मध्ये 4625 आमची मोठी अर्थात मेगा तलाठी भरती होणार आहे. महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या या तलाठी भरतीचे 2023 साठीचे प्रारूप प्रकाशित करण्यात आलेले आहे.

(Here is an important update i.e. breaking news for those candidates who were waiting for Talathi Recruitment 2023. Our big i.e. Mega Talathi Recruitment 2023 is going to be 4625 for Talathi Recruitment process which comes under Land Survey and Revenue Department of Administration. The format for this Talathi recruitment 2023 in Maharashtra has been published) ह्या तलाठी भरती जाहिरात आपण नीट समजावून घेऊया.  

महाराष्ट्रात तलाठी भरती 2023 महाराष्ट्रामध्ये 4625 पदांची मेगा तलाठी भरतीचे जाहिरात प्रारू प प्रकाशित
महाराष्ट्रात तलाठी भरती 2023 महाराष्ट्रामध्ये 4625 पदांची मेगा तलाठी भरतीचे जाहिरात प्रारूप प्रकाशित


तलाठी भरती प्रारूप 2023 (toc)

महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभाग विभागांतर्गत तलाठी अर्थात गट क संवर्गातील 4625 पदांच्या सरळ सेवा भरती करता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून 17 ऑगस्ट 2023ते 12 सप्टेंबर 2023 या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन सुरुवात ही तलाठी भरती होणार आहे असे देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेले आहे. जाहिरातीचे प्रारूप आहे आणि जवळजवळ याच पद्धतीने थोड्याफार फरकाने 2023 ची तलाठी भरती ही होणार आहे.


तलाठी भरती 2023 साठी अर्ज करण्याची पद्धत How to Apply for Talathi Recruitment 2023

ज्या उमेदवारांना तलाठी भरतीसाठी अर्ज करावयाचा आहे त्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज करावा लागणार आहे.


तलाठी भरती 2023 साठी पात्रता How to Apply for Talathi Recruitment 2023


1.भारताचा नागरिक 

तलाठी भरतीसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय असावी 


2.वयोमर्यादा 

तलाठी भरती 2023 साठी वयोमर्यादा गणन  करण्याचा कालावधी 1 जानेवारी 2023 आहे.

 विविध अराजपत्रित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा


💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈


१.प्रवर्ग खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही- २०१५/प्र.क्र.४०४/कार्या.१२. दि. २५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार किमान १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

२.मागासवर्गीय उमदेवारांसाठी

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही- २०१५/प्र.क्र.४०४/कार्या. १२. दि. २५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार किमान १८ वर्षापेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

तथापी उन्नत व प्रगत गटांमध्ये क्रिमीलेयर (Creamy Layer) मोडणाज्या वि.जा- अ, भ.ज.-ब, भ.ज.-क, भ.ज.-ड, विमा.प्र. इ.मा.व., एस.ई.बी.सी आणि ई.डब्ल्यु. एस (आर्थिकदृष्टया दुर्बल घटक) प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही.


३ पदवीधारक / पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी

शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. अशंका- १९१८/प्र.क्र.५०७/१६- अ दि. २ जानेवारी २०१९ मधील तरतूदीनुसार, कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील.

💢अकरावी प्रवेश माहिती पुस्तिका  👈

4.स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन १९९९ चे जनगणना कर्मचारी व सन १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी यांचेसाठी

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. निवक २०१०/प्र.क्र.०८/२०१०/१६-अ दि.६/१०/२०१० मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील. या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.


5.खेळाडू उमेदवारांसाठी

शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. राक्रीधो- २००२/प्र.क्र./६८ /क्रीयुसे- २ दि.१/७/२०१६ मधील तरतुदीनुसार, खेळाडूची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी असलेल्या विहीत वयोमर्यादेत ०५ वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येईल. तथापि, उच्चतम वयमर्यादा ४३ इतकी राहील.


६.दिव्यांग उमेदवारांसाठी

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही- १०९८/प्र.क्र.३९/९८/१६-अ, दि. २६ / ६ / २००१ मधील तरतुदीनुसार, उच्चतम वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष इतकी राहील. तथापि, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान दिव्यंगत्वाचे प्रमाण ४० टक्के असल्याबाबतचे स्थायी वैद्यकिय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच त्यांची निवड झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमीत करण्यापुर्वी शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ वैद्यकीय मंडळाने तो उमेदवार संबंधित पदावर काम करु शकेल असे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची अंतिम नियुक्ती केली जाईल. सदर प्रमाणपत्रावर उमेदवाराचा फोटो असणे आवश्यक आहे.


७ प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी आणि भुकंपग्रस्त

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रकल्प- १००६/मु.स. ३९६/प्र.क्र५६/०६/१६-अ, दि.३/२/२००७ मधील तरतुदीनुसार, कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील. सदर वयोमर्यादा सरसकट शिथील केली असल्याने, मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारांनाही कमाल वयोमर्यादेबाबत ४५ वर्षांपर्यंतची सवलत राहील.


८माजी सैनिक उमेदवारांसाठी

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.मासैक- २०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ दि. २०/८/२०१० मधील तरतुदीनुसार माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. तसेच, अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षेपर्यंत राहील.

तथापि, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सनिव २०२३/प्र.क्र./१४/कार्या २२ दि. ३ मार्च २०२३ अन्वये दि.३१ डिसेंबर २०२३ पुर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.

💥अकरावी प्रवेशासाठी ही कागदपत्रे हवीत अन्यथा प्रवेश होईल रद्द 👈


तलाठी भरती 2023 साठी लागणारी कागदगपत्रे Documents Required for Talathi Recruitment 2023

1.तलाठी भरतीच्या प्रारूपामध्ये तलाठी भरतीसाठी अर्ज करत असताना खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ तसेच प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त याचा दावा करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

2. विविध सामाजिक व सामान्य समांतर आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना त्या संदर्भात लागणारी सर्व आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागतील.


तलाठी भरती 2023 साठी लागणारी कागदपत्रे कागदपत्रे तयार ठेवा Documents required for Talathi Recruitment 2023 Keep the documents ready


१.अर्जातील नावाचा पुराव (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)


2.वयाचा पुरावा


3.शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा


4.सामाजिकदृष्टया मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा


5.आर्थिकदृष्टया दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा


6.अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैष असणारे नॉन क्रिमीलेअर


7.प्रमाणपत्र पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा


8.पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा


9.खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा


10.प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा


11.भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा


12.अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा. अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.व, खेळाडू, दिव्यांग, माजी


13.सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर


14.कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र


15.एस.एस.सी नावात बदल झाल्याचा पुरावा


१६.मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा


17.लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र


१8. विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र (ज्या संवर्गाकरीता लागू


19.MS-CIT प्रमाणपत्र अथवा शासन मान्य 


अशाप्रकारे वरील सर्व कागदपत्रे विद्यार्थ्यांना ज्यावेळी तलाठी भरती जाहीर होईल त्यावेळी ती कागदपत्रे अपलोड करावी लागतील हे जाहिरातीचे प्रारूप आहे यामध्ये थोडेफार बदलले होऊ शकतात.


तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संकेत स्थळ Portal to apply online for Talathi Recruitment 2023

https://mahabhumi.gov.in/mahabhumilink


तलाठी भरती 2023  परीक्षा शुल्क किती असेल  Talathi Recruitment Exam Fee

तलाठी भरती 2023 साठी

1.खुला प्रवर्ग 1000 रुपये 

2.मागास उमेदवार 

मागास प्रवर्ग आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये शुल्का कारले जाणार आहे.


तलाठी भरती 2023 शुल्क भरण्याची पद्धत 

तलाठी भरती प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रकारेच क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड अथवा नेट बँकिंग याद्वारे परीक्षा शुल्क भरावयाची आहे.

तलाठी भरती 2023 ऑनलाइन अर्ज सादर करण्याचा संभाव्य  कालावधी Talathi Recruitment 2023 Online Application Submission Period

तलाठी भरतीच्या या प्रारूपानुसार साधारणपणे जून जुलै महिन्यामध्ये या संदर्भात सर्व प्रक्रिया दिली जाईल.


तलाठी भरती प्रारूप जाहिरत 2023 pdf | talathi bharthi prarup pdf

2023  मध्ये महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या मेगा  तलाठी भरतीचे जाहिरातीचे प्रारूप आपल्याला पाहिजे असेल तर खालील डाउनलोड बटणावर क्लिक करून ते आपल्यासोबत कायमस्वरूपी संघट ठेवा


तलाठी भरती प्रारूप DOWNLOAD 



तलाठी भरती 2023 जाहिरात प्रारूप vedeo 

हा पाहिल्यानंतर आपल्याला तलाठी भरती बाबत धिक माहिती मिळेल.



हे तलाठी भरतीचे 2023 चे प्रारूप अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत देण्यात आलेले आहे आता यानुसारच जिल्हा निहाय तलाठी भरतीची जाहिरात थोड्या दिवसांमध्ये निघेल तरी विद्यार्थ्यांनी तलाठी भरतीच्या अभ्यासाला सुरुवात करावी. आमची ही माहिती इतरांना देखील तात्काळ पाठवा.

आमचे हे लेख वाचा 

करावी प्रवेश नोंदणी आणि भाग एक भरणे संपूर्ण डेमो 

दहावीनंतर कोणती शाखा विषय निवडावेत यासाठी

दहावी उत्तरपत्रिका गुण पडताळणी आणि झेरॉक्स कशी मिळवावी याबाबत माहिती 

अकरावी प्रवेश 2023 24 साठी झालेले महत्त्वाचे बदल 

अकरावी ऑनलाइन प्रवेश घेताना कोणती कागदपत्रे लागतात 

दहावी नंतर पुढे  शिक्षणाच्या संधि 













टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area