महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्रप्रमुख परीक्षा 2023 पुढे ढकलल्याची अधिकृत घोषणा |Center Pramukh Exam 2023 Postponed Official Announcement by Maharashtra State Examination Council
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 चे आयोजन करण्यात येणार होते. पात्र उमेदवारांकडून केंद्रप्रमुख पदासाठी ऑनलाइन आवेदन पत्र देखील उमेदवारांनी सादर केली होती. त्याचबरोबर या परीक्षेची संभाव्य तारीख राज्य परीक्षा परिषदेमार्फत जून अखेर अशी कळविण्यात आली होती. परंतु आता दिनांक 21 जून 2023 रोजी एका प्रसिद्धी पत्रकामध्ये महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा ही पुढे ढकलण्यात आलेली आहे याबाबत अधिकृत प्रसिद्धी पत्रक अर्थात परिपत्रक काढलेले आहे.
या परिपत्रकानुसार केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 ही परीक्षा जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यामध्ये घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते ,परंतु माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ, औरंगाबाद व नागपूर या ठिकाणी विविध याचिका या भरतीच्या अटी संदर्भात दाखल झाल्यामुळे काही प्रशासकीय कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे ,असे या परिपत्रकात जाहीर करण्यात आलेले आहे.
केंद्रप्रमुख परीक्षा आयोजन कधी केले जाणार यासंदर्भात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर घोषणा केली जाईल असे देखील सांगण्यात आलेले आहे.
जेव्हा उमेदवार केंद्रप्रमुख विभागीय स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते ,त्यांना खरोखरच इतक्या घाईघाईमध्ये परीक्षेची तयारी करणे अवघड जात होते आणि आता त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे.
राज्य परीक्षा परिषदेचे प्रसिद्ध पत्रक पीडीएफ
आमची महत्त्वाची माहिती इतरांना देखील पाठवा.
आमचे इतर लेख
केंद्रप्रमुख परीक्षा तयारी संपूर्ण मार्गदर्शन
भारताचे नवे शैक्षणिक धोरण संपूर्ण माहिती
तुमच्या शाळेत योग दिन साजरा झाला त्याची बातमी तयार करा
जागतिक योग दिनाचे महत्त्व सांगणारी अप्रतिम कविता
अकरावी ऑनलाइन प्रवेश 21 जूनला कळणार कॉलेज कोणते मिळाले ते असे चेक करा