Type Here to Get Search Results !

दहावी बोर्ड परीक्षा 2023 गुण पडताळणी व उत्तरपत्रिका झेरॉक्स कॉपी मिळवून पुनर्मूल्यांकन कसे करावे | how to get 10th board answersheet Xerox and reevaluation process

दहावी बोर्ड परीक्षा 2023 गुण पडताळणी व उत्तरपत्रिका झेरॉक्स कॉपी मिळवून तिचे पुनर्मूल्यांकन कसे करावे |  how to get 10th board answersheet Xerox and reevaluation process | आपली उत्तरपत्रिका झेरॉक्स बोर्डाकडून कशी मिळवावी 

दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल २जून २०२३  रोजी दुपारी १ वाजता  दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर  एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयामध्ये पेपेर छान लिहून गुण कमी गुण पडलेले आहेत.आता काय करावे? तर अशावेळी त्यांनी आपल्या गुणांची पडताळणी अर्थात पेपर रिचेकिंग करण्याची प्रक्रिया काय आहे. त्याचबरोबर आपल्या  ऊत्तरपत्रिकेची झेरॉक्स कॉपी मिळवून समजा त्या उत्तर पत्रिकेमध्ये काही प्रश्नाला खूपच कमी गुण  दिले गेले आहेत त्या  ठिकाणी तुमचे गुण वाढतात असे वाटत असेल त्यावेळी आपल्या शाळेतील शिक्षकांकडून तिचे पुनर्मूल्यांकन (पुन्हा तपासून घेणे) करून ती बोर्डाकडे सादर करण्याविषयीची संपूर्ण प्रक्रिया आज आम्ही आपल्याला समजावून सांगणार आहोत.तसेच आपल्याला एकाद्या विषयात  खूप छान गुण असलेली उत्तरपत्रिका आहे व  एक आठवण म्हणून कायमची आपल्या जवळ हवी आहे तरी देखील  देखील आपण तिची झेरॉक्स कॉपी मिळवू शकता.

दहावी बोर्ड परीक्षा 2023 गुणपडताळणीा व उत्तरपत्रिका झेरॉक्स कॉपी मिळवून पुनर्मूल्यांकन कसे करावे
दहावी बोर्ड परीक्षा 2023 गुणपडताळणी व उत्तरपत्रिका झेरॉक्स कॉपी मिळवून पुनर्मूल्यांकन कसे करावे


दहावी बोर्ड परीक्षा गुण पडताळणी व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया(toc)


दहावी निकाल 2023 गुण पडताळणी उत्तरपत्रिका झेरॉक्स व पुनर्मूल्यांकन करण्याची प्रक्रिया 10th Result 2023 Marks Verification Answer Sheet Xerox and Revaluation Process

आपल्याला एखाद्या विषयाच्या उत्तर पत्रिकेच्या गुणांची पुन्हा एकदा पडताळणी/तपासणी  करून घ्यायची असेल किंवा एखाद्या विषयाची किंवा सर्वच विषयांच्या उत्तर पत्रिकांच्या झेरॉक्स कॉपी आपल्याला मिळवायच्या  असतील तर आपल्याला ऑनलाइन पद्धतीने बोर्डाकडे अर्ज करावा लागतो. तो अर्ज करण्यासाठी ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखा पण पाहूया.


💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈 


अकरावी प्रवेश प्रक्रिया तसेच इतर माहिती मिळवण्यासाठी 2023 24 व्हॉट्स ॲप ग्रुप 11th Admission Process 2023 24 Whatsapp Group

आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ अकरावी प्रवेश मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.


अकरावी तसेच  प्रवेश व दहावी नंतर काय करावे मार्गदर्शन ग्रुप लिंक  👈क्लिक करा व जॉइन व्हा 


💥अकरावी प्रवेश भाग 2 कसा भरावा कॉलेज कट ऑफ कसे पहावे ? 👈


दहावी गुणपडताळणी 2023 साठी  बोर्डकडून दिलेला कालावधी ssc  answer sheet re checking dates  

गुण पडताळणी याचाच अर्थ आपण लिहिलेली उत्तर पत्रिका पुन्हा एकदा बोर्डाकडून तपासून घेणे होय. या गुणपत्रिकेच्या पडताळणीसाठी शनिवार दिनांक 3 जून 2023 ते सोमवार दिनांक 12 जून 2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने दहावीच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.


💥दहावी नंतर पुढे काय ? 👈 अधिक माहितीसाठी क्लिक करा. 


दहावी बोर्ड परीक्षा 2023 छायाप्रत मिळवण्यासाठी अर्ज करण्याची तारीख Application Date for 10th Board Exam 2023 Photocopy

समजा एखाद्या विद्यार्थ्याला बोर्डाच्या परीक्षेचा पेपर अतिशय सोपा जाऊन देखील समाधानकारक गुण मिळालेले नाहीत. असे विद्यार्थी संबंधित विषयाच्या उत्तर पत्रिकेचे झेरॉक्स कॉपी बोर्डाकडून मागू शकतात. दहावीच्या बोर्डाच्या उत्तर पत्रिकेची छायाप्रत अर्थात  झेरॉक्स कॉपी मागवण्यासाठी शनिवार दिनांक 3 जून 2023 ते 22 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांनी अर्ज करायचे आहेत.


💥अकरावी ऑनलाइन प्रवेश रजिस्ट्रेशन आणि भाग 1 कसा भरावा डेमो 👈 


दहावी बोर्ड परीक्षा 2023 पुनर्मूल्यांकन प्रक्रिया 10th Board Exam 2023 Revaluation Process

आपल्याला आपल्या उत्तर पत्रिकेचे पुन्हा एकदा नव्याने मूल्यांकन करावयाचे असेल अर्थात ती उत्तर पत्रिका आपल्या शाळेतील शिक्षकांकडून पुन्हा एकदा तपासून घ्यायची  असेल यासाठी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम त्या उत्तर पत्रिकेची झेरॉक्स प्रत बोर्डातून मिळवायची  आहे त्यासाठी लागणारे शुल्क भरावयाचे आहे. आणि समजा आपल्या शाळेतील शिक्षकांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर तुमचे गुण वाढतात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही बोर्डाकडे पुन्हा पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करायचा आहे.


💥 दहावी नंतर तात्काळ नोकरीसाठी हे कोर्स डिप्लोमा करा 👈


दहावी बोर्ड उत्तरपत्रिका गुणपडताळनी व झेरॉक्स कॉपी मिळवणे व पुनर्मूल्यांकन करण्यासाठी फी शुल्क Fee charges for obtaining xerox copy of 10th board answer sheet and revaluation

1.गुणपडताळणीा शुल्क

ज्या विद्यार्थ्यांना आपल्या उत्तर पत्रिकेची गुण पडताळणी करायची आहे त्यांना प्रति विषय 50 रुपये अदा करावे लागतील. 

2. छाया प्रत झेरॉक्स मिळवण्यासाठी 

हवी आहे. त्या विद्यार्थ्यांना प्रत्येक उत्तरपत्रिकेमागे 400 रुपये  एवढी फी जाणार आहे. 


💥दहावीनंतर कोणती शाखा विषय निवडावेत यासाठी👈


3.पुनर्मूल्यांकन शुल्क 

हे शुल्क उत्तरपत्रिका झेरॉक्स मिळाल्या नंतर 5 दिवसाच्या आत भरावे. त्यासाठी 300 रुपये प्रति उत्तरपत्रिका आकारल  जाईल.

जर आपल्याला आपल्या शाळेतील शिक्षकाकडून पुन्हा एकदा पुनर्मूल्यांकन करून घेतले व गुण वाढत असतील तरच पुनर्मूल्यांकन करण्यासाठी अर्ज करावा.


💥अकरावी  ऑनलाइन प्रवेश  2023 24 संपूर्ण  मार्गदर्शन pdf 👈


बोर्डाकडे पुनर्मूल्यांकन  करण्यासाठी उत्तरपत्रिका दिल्यावर पुढील प्रक्रिया Further procedure after submission of answer sheet for revaluation to the board

आपण उत्तरपत्रिकेची झेरॉक्स आपल्या शाळेतील शिक्षकांकडून तपासल्यानंतर त्यासाठी बोर्डाच्या एका कमिटीकडे ती उत्तर पत्रिका जाते आणि त्या कमिटीतील तज्ञ आपल्या शाळेतील शिक्षकांनी केलेला गुणवाढीचा दावा यावर विचार करतात आणि त्यांना तो  योग्य वाटला  तरच तुमच्या गुणांमध्ये वाढ होते. अन्यथा कुठल्याही प्रकारे गुणांमध्ये वाढ होत नाही.सांगण्याचे तात्पर्य असे की जर आपले गुण वाढणार असतील तरच विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकन करण्यासाठी बोर्डाकडे अर्ज करावा. 


💥अकरावी प्रवेश भाग 2 कसा भरावा live डेमो 👈


या पद्धतीने आजच्या लेखात दिलेली दहावी बोर्ड परीक्षा 2023 उत्तरपत्रिका / पेपरचे रिचेकिंग करण्याची माहिती तसेच आपल्या उत्तर पत्रिकेची छाया प्रत कशी मिळवावी त्याचबरोबर तिचे पुनर्मूल्यांकन कसे करून घ्यावे यासंदर्भात दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट करा आणि महत्त्वाची माहिती आपण इतरांना देखील पाठवा धन्यवाद.


आमचे इतर लेख 



तत्काळ नोकरीसाठी अकरावी करत करत हे iti कोर्सेस  करा 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area