महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2023 | Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Act 2023
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा 2009 या कायद्यातील काही कलमांच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनाने सुधारणा केल्या आहेत. यापूर्वी असलेला महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम 2011या अधिनियमात काही बदल करून या नवीन अधिनियमाला महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम 2023 सुधारणा असे यापुढे म्हटले जाणार आहे. या 2023 च्या नव्या सुधारणेनुसार शिक्षण प्रणालीमध्ये काही महत्त्वाचे बदल होणार आहेत. म्हणूनच आज आम्ही आपल्यासाठी महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्काचे नियम 2023 याविषयी सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत. या (Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Act 2023) सुधारित अधिनियमामुळे शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल.
महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2023 |
मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम 2023 (toc)
बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2023 परिपत्रक |Right of Children to Free and Compulsory Education Act 2023 Circular
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९.क्रमांक आरटीई २०२३/प्र.क्र. २७६ / एसडी- १. - बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा, २००९ च्या कलम ३८. मधील उप-कलम (१) आणि (२) द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा (सन २००९ च्या कलम ३५ मधील) वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ मध्ये सुधारणा करीत आहे, ते म्हणजे त्या सुधारणा म्हणजे यापुढे या कायद्याला
१. या नियमांना महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम, २०२३ (सुधारणा) असे म्हणावे.
💥महाराष्ट्र शासनाकडून तरुणाना रोजगार देण्यासाठी ऑनलाइन नोंदणी सुरू 👈
२. महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम, २०११ च्या (यापुढे ज्याचा उल्लेख "मुख्य नियम" असा करण्यात येईल ) नियम ३ मध्ये पोट-नियम (१) नंतर खालील पोट-नियम समाविष्ट करण्यात येत आहे, ते म्हणजेच
(१) (अ) इयत्ता ५ वी च्या वगापर्यंत बालकाला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल. इयत्ता ६वी ते ८ वी च्या वर्गात वयानुरूप प्रवेश देताना बालकास इयत्ता ५वी च्या वर्गासाठीची विहित केलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक राहील.बालक सदरची परीक्षा उत्तीर्ण नसल्यास त्या बालकाला इयत्ता ५वी च्या वर्गात प्रवेश देण्यात येईल.
💥राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2023 ऑनलाइन अर्ज सुरू 👈
थोडक्यात यापुढे बालकाचे वय कितीही असो त्याला इयत्ता पाचवीची वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल असाच याचा अर्थ होतो.
३. मुख्य नियमांमधील नियम १० नंतर खालील नियम समाविष्ट केले जातील, म्हणजे -
💥अकरावी प्रवेश 50 प्रश्न उत्तरे सर्व dout क्लियर होतील 👈
१० बालकाला त्याच वर्गात ठेवण्याबाबत
(अ), कलम १६ च्या प्रयोजनार्थ, काही प्रकरणांमध्ये परीक्षा आणि बालकास मागे ठेवण्याच्या कार्यपद्धतीबाबत नवीन कार्यपद्धती पुढीलप्रमाणे
१.पाचवी &आठवी साठी वार्षिक परीक्षा
प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या शेवटी इयत्ता ५वी आणि ८वी च्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा असेल.
२.SCERT मार्फत राबवली जाणार मूल्यमापन पद्धती
या दोन वर्गासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (शैक्षणिक प्राधिकरण) इयत्ता ५वी आणि ८ वी च्या वर्गासाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन यांची कार्यपद्धती निश्चित करेल.
💥मेगा तलाठी भरती ऑनलाइन अर्ज लिंक 👈
३.नापास मुलांना पुनर्परीक्षेची संधी
जर बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर अशा बालकाला संबंधित विषयासाठी अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान केले जाईल आणि वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत त्याची पुनर्परीक्षा घेतली जाईल.
४. पुनर्परीक्षेत नापास झाल्यास त्याच वर्गात प्रवेश
जर बालक पोट-नियम (३) मध्ये नमूद केलेल्या पुनर्परीक्षेत नापास झाले, तर त्याला इयत्ता ५ वी च्या वर्गात किंवा इयत्ता ८ वी च्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल.
५.प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे शाळेची जबाबदारी
प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकाला शाळेतून काढून टाकले जाणार नाही.
अशाप्रकारे महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम 2011 यामध्ये सुधारणा करून या नियमाला महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम 2023 सुधारणा असा उल्लेख आपल्याला यापुढे करावा लागणार आहे.
महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क नियम 2023 मधील महत्त्वाच्या बाबी Important points of Maharashtra Right to Free and Compulsory Education of Children Rules 2023
१.५ वी पर्यंत वयानुरूप प्रवेश
या नवीन 2023 च्या अधिनियमानुसार एखाद्या बालकाला प्रवेश देत असताना इयत्ता पाचवी पर्यंतच्या वर्गापर्यंत त्याचे वय पाहून म्हणजेच वयानुरूप प्रवेश दिला जाईल.
💥महाराष्ट्र शासन 31 शिष्यवृत्ती योजना माहिती 👈
२. इयत्ता ६ ते ८ वीच्या वर्गात वयानुरूप प्रवेश घेण्यासाठी ५ वीची वर्गाची वार्षिक परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक
कोणत्याही बालकाला इयत्ता 6 ते 8 या वर्गामध्ये प्रवेश द्यायचा असेल तर, त्या विद्यार्थ्याला पाचवी या वर्गासाठी असलेली वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असेल. बालक पाचवीची परीक्षा उत्तीर्ण असल्याशिवाय पुढे त्याला वयानुरूप प्रवेश मिळणार नाही.
2023 चा अधिनियम माहिती सविस्तर पहा
महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम 2023 पिडीएफ | Maharashtra Right of Children to Free and Compulsory Education Act 2023 pdf
असे हे नवीन बदल झाल्याने मुळे शिक्षण घेताना गंभीर बनतील हे नक्की.
आमचे हे लेख वाचा