Type Here to Get Search Results !

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या 31 शिष्यवृत्यांची माहिती |Information about 31 scholarships offered by Maharashtra State School Education and Sports Department

महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या 31 शिष्यवृत्यांची माहिती|Information about 31 scholarships offered by Maharashtra State School Education and Sports Department 

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व  क्रीडा विभाग अर्थात शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या तब्बल 31 शिष्यवृत्ती तसेच विद्यार्थी कल्याणकारी योजना राबवल्या जातात.या सर्व योजना विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आहेत. तळागाळातील,गोरगरीब तसेच सर्वसामान्य लोकांच्या मुलांना या शिष्यवृत्ती योजनांची कल्पना तसेच माहिती नसते.कधी कधी शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना देखील शासनाच्या या विविध योजनांची माहिती नसते म्हणूनच आज आम्ही या विविध योजनांच्या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला  देणार आहोत.


महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या 31 शिष्यवृत्यांची माहिती
महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या 31 शिष्यवृत्यांची माहिती

महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती  योजना (toc)


१. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेली शिष्यवृत्ती योजना 

महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासन पुरस्कृत अशी ही योजना असून इयता 8 वी  मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याना या योजनेचा  लाभ घेता येतो. ज्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न ३ लाख 50 हजार पेक्षा कमी आहे. अशा मुलांना या सुविधेचा लाभ घेता येतो. ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता 7 मध्ये 55 टक्के गुण आहेत. अशा विद्यार्थ्यांना शासनामार्फत घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा देता येते. ही परीक्षा मराठी, इंग्रजी,हिंदी ,गुजराती ,तेलगू,कन्नड अशा विविध माध्यमातून घेतली जाते. राज्यातील ११६८२ मुलांनाही शिष्यवृत्ती गुणवत्तेनुसार दिले जाते. ही शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना आठवी ते बारावीपर्यंत दर महिन्याला एक हजार रुपये मिळतात.(सविस्तर माहितीसाठी शेवटी दिलेले माहितीपत्रक वाचा)


💥केंद्रप्रमुख परीक्षा टिप्स आणि ऑनलाइन टेस्ट 👈



२. राष्ट्रीय भारतीय सैनिक महाविद्यालय डेहराडून येथील सरकारी शिष्यवृत्ती 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते. संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ 4  विद्यार्थ्यांची यासाठी निवड केली जाते. इयत्ता 7 वी  पास झालेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेचे माध्यम मात्र हिंदी आणि इंग्रजी आहे. निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला दर वर्षाला 40 हजारांची शिष्यवृत्ती दिली जाते.(सविस्तर माहितीसाठी शेवटी दिलेले माहितीपत्रक वाचा)


💥दहावी नंतर डिप्लोमा प्रवेश ऑनलाइन अर्ज सुरू👈


३. पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शाळातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना (इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती योजना)

महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी आणि शिक्षक यांना या योजने संदर्भात माहिती आहे. इयत्ता पाचवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी आणि इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते.

ही परीक्षा मराठी इंग्रजी हिंदी उर्दू गुजराती तेलगू कन्नड आणि सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी माध्यमातून घेतली जाते. या परीक्षेसाठी आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतात.(सविस्तर माहितीसाठी शेवटी दिलेले माहितीपत्रक वाचा)


💥पहिली ते दहावी वार्षिक नियोजन pdf 👈


४. धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना

मुस्लिम ख्रिश्चन शिक बौद्ध पारशी जैन या अल्पसंख्याकांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते. ज्या पालकांची उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांच्या पाल्यांना इयत्ता नववी दहावीला 50 टक्के पेक्षा अधिक गुण आहेत अशा विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता येतो. दर महिन्याला साधारणपणे हजार रुपये शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मिळतात. एकूण जे विद्यार्थी पात्र होतील त्यापैकी 30 टक्के विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप दिली जाते.


५. धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजना

अल्पसंख्यांक समाजातील अर्थात मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी, जैन या वर्गातील मुलींसाठी ही शिष्यवृत्ती योजना आहे यासाठी लागणाऱ्या सर्व अटी शर्ती आणि पीडीएफ मध्ये दिलेले आहेत.


💥21जून जागतिक योग दिन संपूर्ण माहिती👈


६. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली प्री मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

जे विद्यार्थी दिव्यांग अर्थात अपंग आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण संचालनालयाकडून 2022 23 पासून ही योजना राबवली जात आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना साधारणपणे महिन्याला खर्चासाठी पाचशे रुपये आणि पुस्तकांसाठी एक हजार रुपये दिले जातात. विद्यार्थ्यांचा अपंगत्वाचा प्रकार बघून वार्षिक शिष्यवृत्तीचे दर निश्चित केले जातात यासाठी विद्यार्थ्यांनी सोबत दिलेली स्वतंत्र पीडीएफ अभ्यासावी.


💥मुंबई मनपा नर्सिंग कोर्स 2023 24  ऑनलाइन प्रवेश अर्ज सुरू 👈 click here 


७. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती

माध्यमिक शाळांत परीक्षेत 60 टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते थोडक्यात इयत्ता दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना यश शिष्यवृत्तीचा लाभ घेता येतो.


८. आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती

आर्थिक दृष्ट्या मागास वर्गातील हुशार मुले मुली की जे पहिल्याच परीक्षेमध्ये 50 टक्क्यांनी गुण उत्तीर्ण होऊन दहावी पास झालेल्या अशा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती दिली जाते. सविस्तर माहितीसाठी सोबत दिलेले पीडीएफ आपण पाहू शकता.


💥अकरावी प्रवेश 21 जूनला पहिल्या राऊंड मध्ये  कोणते कॉलेज मिळाले असे चेक करा 👈


९. राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना

विद्यार्थ्यांना अपघातामुळे जर काही हानी पोहोचली  असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी विद्यार्थी सामुग्री अनुदान योजनेचा लाभ मिळतो.

जर विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाला तर १५००००  रुपये अपंगत्व आले तर 1 लाख रुपयांची मदत केली जाते. त्याचबरोबर शस्त्रक्रिया ,सर्प दंश ,आग अशा विविध कारणांमुळे काही अपघात घडल्यास त्यासाठी देखील वेगवेगळ्या रकमा त दिल्या जातात.


१०. मोफत पुस्तक योजना

पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.


११. प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या मुलींना उपस्थिती भत्ता 

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शिकणाऱ्या त्याचबरोबर दारिद्र्यरेषेखालील सर्व मुली तसेच अनुसूचित जाती जमातीच्या दारिद्र्य रेषेखालील मुलींना या योजनेचा लाभ घेता येतो. दिवसाला एक रुपया याप्रमाणे संपूर्ण वर्षभरासाठी दोनशे रुपयांचा उपस्थिती भत्ता दिला जातो. साठी संपूर्ण वर्षात मुलीची उपस्थिती ही 75 टक्के असणे गरजेचे आहे.


💥Iti ऑनलाइन प्रवेश अर्ज ऑनलाइन भरायला सुरुवात👈


१२. माजी सैनिकांच्या मुलांना शैक्षणिक सवलती 

माजी सैनिकांच्या मुलांसाठी पुस्तके गणवेश यांच्यासाठी देखील वेगवेगळ्या सवलत या दिल्या जातात त्याची सविस्तर माहिती पीडीएफ मध्ये दिलेले आहे.


महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती योजनांची संपूर्ण माहिती 

महाराष्ट्र शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या तब्बल 31 शिष्यवृत्ती योजनांची माहिती पुढील प्रमाणे




अशाप्रकारे शासनाकडून जवळजवळ 31 योजना आहेत की ज्या योजना विद्यार्थ्यांच्या लाभासाठी आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता सुधारावी यासाठी देखील दिलेले आहेत आपण त्या सर्व सुविधा सविस्तरपणे पाहण्यासाठी आमची खाली दिलेली माहिती व्यवस्थित पहा व या विविध योजनांसाठी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सर्व माहिती मिळवा आणि या योजनांचा लाभ घ्या.


आमचे इतर लेख 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area