Type Here to Get Search Results !

शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या बंद करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले संकेत |Education Minister Deepak Kesarkar gave a signal to stop the administrative transfers of the world

शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या बंद करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले संकेत |Education Minister Deepak Kesarkar gave a signal to stop the administrative transfers of teachers 

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री सन्माननीय श्री दीपक केसरकर यांनी आज शिक्षक भरती आणि शिक्षकांच्या बदल्यांबाबत अतिशय महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या बंद करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले संकेत
शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या बंद करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले संकेत


महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज प्रसार माध्यमांशी बोलताना बदल्यांच्या संदर्भात असे मत व्यक्त केले की ,यापुढे आम्ही प्रशासकीय कारणास्तव शिक्षकांच्या बदल्या शक्यतो करणार नाही. अवघड क्षेत्रात अध्यापन करण्यासाठी तरुण वर्गातील शिक्षकांना अशा भागांमध्ये काम दिले जाईल. त्याचबरोबर शिक्षक आणि शाळा यांचे जे नाते जुळलेले असते ते नाते तसेच राहावे यासाठीच आम्ही हा महत्त्वपूर्ण निर्णय आम्ही घेणार आहोत, त्यावरती काम देखील सुरू आहे असे प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केले. खरोखरच शाळा शिक्षक आणि विद्यार्थी यांचे या बदली प्रक्रियेमुळे संपूर्ण जजमेंट बिघडत असते. आपल्याला एका शाळेत काम करायचे आहे, असे म्हटल्यानंतर शिक्षकांच्या त्या शाळेविषयी असणाऱ्या भावना अतिशय वृद्धिंगत होत असतात. म्हणूनच त्यांनी घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे.

परंतु याची अंमलबजावणी आणि संपूर्ण निर्णय कधी घेतला जाणार? याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोणते मत व्यक्त केले नाही.कदाचित सध्याची बदली प्रक्रिया यावर देखील स्थगिती येण्याची शक्यता नाकारता येत नाही.


💥मुलींना मोफत निवासी नर्सिंग कोर्स 2023 24  प्रवेश अर्ज सुरू 👈


शिक्षक भरती संदर्भात शिक्षण मंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षक भरती संदर्भात देखील एक अतिशय महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आतापर्यंत एवढी मोठी भरती झाली नाही अशी भरती आम्ही करणार आहोत! अर्थात ५० हजार शिक्षकांच्या जागा आम्ही भरणार आहोत. बऱ्याच शाळांचे आधार व्हॅलिडेशनचे काम पूर्ण झाले नसल्यामुळे संच मान्यता देण्यामध्ये अडचण येत आहेत, म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये 30 हजार शिक्षकांच्या जागा भरल्या जातील तर नंतरच्या टप्प्यामध्ये उर्वरित जागा भरल्या जातील अशी घोषणा त्यांनी केली.

थोडक्यात काय तर शिक्षकांच्या बदल्या आणि शिक्षक भरती यांच्या संदर्भात अतिशय सकारात्मक निर्णय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घेतले आहेत असेच म्हणावे लागेल.


आमचे इतर लेख 

महाराष्ट्र शासन 31 शिष्यवृत्ती योजना माहिती 

अकरावी प्रवेश अशी करा कागदपत्रे अपलोड 

पहिली ते दहावी वार्षिक नियोजन 

अकरावी मेरिट लिस्ट मध्ये आपला क्रमांक कितवा चेक करा 

Iti ऑनलाइन प्रवेश अर्ज ओ ऑनलाइन भरायला सुरुवात


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area