महाराष्ट्र शासनाकडून लाखो बेरोजगारांना नोकरीची संधी नोंदणी प्रक्रिया सुरू | Job opportunity registration process for lakhs of unemployed started by Maharashtra government
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य ,रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत राज्यातील बेरोजगारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत असतात.उमेदवारांना या रोजगाराचा लाभ घेण्यासाठी आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे.
महाराष्ट्र शासनाकडून लाखो बेरोजगारांना नोकरीची संधी नोंदणी प्रक्रिया सुरू |
महस्वयं वर नोंदणी स्टेप (toc)
महाराष्ट्र शासनाचा कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता विभाग|Department of Skill, Employment and Entrepreneurship, Government of Maharashtra
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत दरवर्षी विविध उपक्रमांच्या माध्यमातून बेरोजगारांना कंपन्या,कॉर्पोरेट संस्था यांच्या माध्यमातून रोजगाराचे/नोकरीचे प्लॅटफॉर्म मिळवून दिले जाते. ज्या संस्थांना कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे अशा कंपन्या संबंधित विभागाशी संपर्क साधून आपल्या कंपनीसाठी उचित पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी देत असतात.
💥ऑनलाइन फसवणूक अशा पद्धतीने होते👈
महास्वयं वेब पोर्टलवर नोंदणी करा | Register on Mahaswayam web portal
आपण बेरोजगार असाल आणि आपल्याला देखील रोजगार अर्थात नोकरी हवी असेल तर आपण महाराष्ट्र शासनाच्या महास्वयं या वेब पोर्टल वर जाऊन आपली नोंदणी करू शकता. महाराष्ट्र राज्याचे रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी एका पत्रकार परिषदेत माहिती दिली की 31 मे 2023 पर्यंत जवळजवळ 88 हजार लोकांना यावे पोर्टलच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला आहे.
महास्वययं वेब पोर्टलची लिंक | Link to Mahaswayam web portal
आपल्याला देखील या वेब पोर्टलच्या मदतीने रोजगार मिळवायचा असेल तर, त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण संबंधित वेबसाईटला भेट द्या आणि आपली नोंदणी पूर्ण करा.
महास्वयं रोजगार पोर्टल लिंक
https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register
या संकेतस्थळावर जाऊन आपण आपल्या जवळ असलेली कौशल्य आपले शिक्षण त्याचबरोबर अनुभव या बाबी त्या ठिकाणी अर्जाची नोंदणी करताना व्यवस्थित रित्या भरायचे आहेत.
महास्वयंमार्फत कशी होते भरती प्रक्रिया | How is the recruitment process through Mahaswayam?
ज्या कंपन्यांना कुशल कर्मचाऱ्यांच्या आवश्यकता आहे. त्या कंपन्या या ठिकाणी नोंदणी करतात आणि आपल्यासाठी सर आवश्यक कर्मचारी या ठिकाणाहून उपलब्ध करत असतात.
नोंदणी करण्याची प्रक्रिया | Registration process
आम्ही आपल्याला खाली देत असलेल्या माहितीपत्रकातील सर्व माहिती व्यवस्थित वाचून आपण आपली नोंदणी ऑनलाइन करावी त्याचबरोबर आपली माहिती देखील अचूक भरावी.
महास्वयं पोर्टलवर अर्ज करण्यासाठी माहितीपत्रक | Brochure to apply on Mahaswayam portal
महास्वयम पोर्टलवर अर्ज करण्यासाठी माहितीपत्रक हवे असेल तर ते आम्ही आपल्याला खाली देत असलेले माहितीपत्रक आपण नीट वाचा आणि त्यामध्ये दिलेल्या स्टेप नुसार आपण आपली नोंदणी पूर्ण करून घ्या.