अकरावी कॉमर्स एक सुवर्ण संधी | 11th Commerce a Golden Opportunity | कॉमर्स क्षेत्रातील नोकरीच्या संधी | Job opportunities in the commerce sector
विद्यार्थी मित्रांनो! इयत्ता दहावी पास झाल्यानंतर नेमके काय करायचे? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. मी दहावी पास झाल्या नंतर कोणत्या शाखेत प्रवेश घेऊ? आर्ट,कॉमर्स की सायन्स की यापेक्षा वेगळा मार्ग निवडू जर मला इंजिनीयर बनायचं असेल तर मी एखादा डिप्लोमा करू का ? मग कोणता करू ? किंवा काही विद्यार्थी मला माझी आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे आयटीआय कोर्स करायचा आहे? तर मी कोणता कोर्स करू? अशा सर्व चिंतेमध्ये असतात म्हणूनच आम्ही आज आमच्या या लेख मालिकेची सुरुवात आपण जर अकरावी कॉमर्स शाखेसाठी प्रवेश घेतला असेल तर अकरावी कॉमर्स एक सुवर्णसंधी या लेखांतर्गत आपण कॉमर्स शाखा निवडल्यानंतर भविष्यामध्ये आपल्यासाठी कोणकोणत्या संधी आहेत या संदर्भात माहिती पाहणार आहोत.
अकरावी कॉमर्स एक सुवर्ण संधी |
अकरावी कॉमर्स माहिती (toc)
हे मार्गदर्शन करत असताना आम्ही आपल्याला अकरावी कॉमर्स शाखेचा अभ्यासक्रम आणि भविष्यातील करिअरच्या संधी याविषयी देखील माहिती सांगणार आहोत. आज आम्ही दिलेली माहिती आपण नीट मन लावून वाचावी आणि त्या दृष्टीने सुरुवातीपासूनच प्रयत्न करावेत ही विनंती. चला तर मग आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया अकरावी कॉमर्स एक सुवर्णसंधी.कशी ते पाहूया.
💥💥अधिक श्रावण महिना किती वर्षांनी येतो ? वाचा शास्त्रीय माहिती 👈
अकरावी कॉमर्स शाखेची निवड का केलीय ?Why have you chosen the 11th commerce stream?
ज्या विद्यार्थ्यांना पाढे, बेरीज,वजाबाकी आकडेमोड यांची विशेष करून आवड असते असे विद्यार्थी कुठेतरी अकाउंट या विषयामुळे दहावीनंतर कॉमर्स शाखेकडे वळतात. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये आपली करिअर करायची आहे. हे विद्यार्थी देखील तर पूर्वक दहावीनंतर कॉमर्स ही शाखा निवडतात.
💥💥डिप्लोमा प्रवेश 2023 24 मेरित लिस्टमध्ये आपला क्रमांक कितवा लगेच पहा 👈
अकरावी कॉलेज सुरू होण्या आधी याकडे लक्ष द्या
दहावीचा निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांकडे बराच वेळ असतो. या वेळामध्ये विद्यार्थ्यांनी जर आपल्याला अकरावी कॉमर्सला प्रवेश घ्यायचा असेल तर आपला गणिताचा पाया पक्का करून घ्यावा.तो पाया पक्का करत असताना गणितामध्ये असणारे पाढे/ टेबल, इक्वेशन, लॉ ऑफ इंडेक्स, बेसिक ट्रिग्नोमेट्री यासारख्या बाबी अभ्यासाव्यात जेणेकरून आपण अकरावी कॉमर्समध्ये प्रवेश घेतल्यानंतर अडचणी येत नाहीत.
💥💥कॉलेज बंद अभ्यास सुरू अकरावी सर्व विषयांची पीडीएफ डाउनलोड करा 👈
१. इंग्रजी भाषा ज्ञान
अकरावीचे शिक्षण आपल्याला इंग्रजी माध्यमातून घ्यायचे असल्यामुळे आपला काही एक बेस हा पक्का असला पाहिजे यासाठी या बाबी विद्यार्थ्यांनी करून ठेवाव्यात.
2.आकडेमोडीची सवय
कॉमर्स क्षेत्रच मुळे आकडेमोडी शी संबंधित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॅल्क्युलेटरचा जास्तीत जास्त वापर करणे कमी करून आकडेमोडी ची मनाला सवय लावावी कारण या कॉमर्स शाखेमध्ये आपल्याला सतत आकडेमोडी करावी लागते थोडक्यात आकड्यांशी आपल्याला खेळायचे असल्यामुळे आपण आकडेमोडी ची सवय लावावी.
💥💥एकच पुस्तक की जे तुमची इंग्रजी भाषेची अकारण भीती कमी करेल 👈
3.स्टॅटिस्टिकचा अभ्यास
कॉमर्स मध्ये आपल्याला सर्वात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर तो आहे स्टॅटिस्टिकचा सुरुवातीपासूनच आपण केल्यास आपल्याला इयत्ता अकरावी मध्ये कोणत्या प्रकारच्या अडचण येणार नाही.आपण यासाठी १ ते १०० पर्यंत वर्ग आणि वर्गमुळे एका मिनिटात पाठ करा.pdf उपलब्ध आहे.
या सर्व बाबी आपण कॉलेज सुरू होण्या आधी पाहून घ्याव्यात.चला तर मग आपला जो मुख्य विषय आहे. तो म्हणजे कॉमर्स क्षेत्रामध्ये असलेल्या नोकरीच्या संधी त्याकडे आपण वळूया.
💥💥सरकारी कर्मचारी आहात मग 1 जुलै ला एवढी होणार पगारात वाढ 👈
अकरावी कॉमर्स एक सुवर्ण संधी कशी आहे? How is 11th Commerce a golden opportunity?
ज्या विद्यार्थ्यांना अकरावी, बारावी कॉमर्स केल्यानंतर तसेच पदवी नंतर भविष्यामध्ये फायनान्स या क्षेत्रामध्ये आपली करिअर करायची आहे.
१. फायनान्स मधील करिअरच्या संधी
त्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण बीकॉम पर्यंत/पदवी पर्यंत पूर्ण करावे ते पूर्ण केल्यानंतर आपण caf अर्थात सर्टिफाइड फायनान्शिअल अनालिसिस, MBA इन फायनान्स, CFP सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर, सी ए.,सी एस., आय सी डब्ल्यू ए., आयसीडब्ल्यूए अशा अनेक संधी आपल्याला उपलब्ध होतात. त्या कशा होतात याबाबत आपण स्वतंत्र लेखांमध्ये माहिती पाहणार आहोत किंवा आपण गुगलच्या माध्यमातून या क्षेत्रातील संधी विषयी अधिक माहिती मिळवावी. आमचाही हेतू हाच आहे की कॉमर्स शाखेमध्ये आपण जाऊ शकता त्यातील आपण फायनान्स क्षेत्र बघितले.
💥💥अधिक श्रावण का आहे पवित्र अप्रतिम माहिती👈
2. कॉमर्स मधील अकाउंटिंग क्षेत्रातील संधी
आपण कॉमर्स शाखेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर बीकॉम झाल्यानंतर किंवा एम कॉम झाल्यानंतर नव्याने येत असलेली कॉम्प्युट राईसझड अकाउंटिंग sap प्रणाली यामध्ये देखील मास्टरी करू शकता. बँक मॅनेजर ,कॅशियर यासारख्या पदांसाठी देखील आपण अर्ज करू शकता.
3. करप्रणालीशी संदर्भात क्षेत्र
कॉमर्स शाखेसाठी अतिशय महत्वपूर्ण असलेली नोकरीची किंवा करिअरची संधी ती म्हणजे कर क्षेत्राशी संबंधित असलेले शिक्षण होय. आपण आपले पदवीपर्यंतचे अर्थात बीकॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपण DTL क्षेत्रामध्ये करिअर करू शकता. अनुभवी कर सल्लागार असतात अशा अनुभवी कर सल्लागाराकडे आपण काही वर्षे काम केल्यानंतर आपण देखील गुंतवणुकीचे विविध मार्ग या संदर्भात मार्गदर्शन करून स्वतःच्या पायावर तात्काळ उभे राहू शकतात.याचबरोबर डिप्लोमा इन टॅक्सेशन ला अर्थात ,(DTAL) या क्षेत्रामध्ये देखील आपण नोकरी करू शकता.
अकरावी स्पेशल फेरी ऑप्शन फॉर्म भरण्याचा आज शेवटचा दिवस असा भरा ऑप्शन फॉर्म 👈
4. ऑडिटर बनण्याची संधी
अकरावी कॉमर्स शाखेसाठी प्रवेश घेतल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचा कल हा ऑडिटर बनण्यामध्ये आहे.त्या विद्यार्थ्यांनी गव्हर्मेंट डिप्लोमा इन कॉर्पोरेशन अँड अकाउंटिंग ही सहकार खात्यामार्फत जी घेतली जाणारी परीक्षा असते ती परीक्षा आपण पास झाल्यानंतर आपल्याला ऑडिटर म्हणून देखील करिअर करता येईल.
5. बारावी कॉमर्स नंतर वकिली व्यवसाय
ज्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स केला प्रवेश घेतला आहे मात्र त्यानंतर या क्षेत्राशी संबंधित असलेली वकिली ज्यांना करायची आहे असे विद्यार्थी कमर्शियल अँड कॉर्पोरेट लॉ बँकिंग लॉ, लेबर लॉ यासारख्या विषयांमध्ये एलएलबी करू शकतात. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण यासाठी प्रवेश घेऊन आपले फ्युचर ब्राईट करू शकता.
5. कॉमर्स विद्यार्थ्यांसाठी सायबर संदर्भात कोर्सेस
अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. या ऑनलाईन फसवणुकीमुळे अनेक लोकांना न्यायालयामध्ये धाव घ्यावी लागते. भविष्यामध्ये करिअरच्या नामी संधी अंतर्गत आपण याकडे पाहू शकतो अर्थात ते क्षेत्र म्हणजे सायबर लॉ. या नव्या क्षेत्राकडे जायला विद्यार्थ्यांनी हरकत नाही.
6.विमा क्षेत्र
या ठिकाणी केवळ आपण कोणाचातरी विमा काढणे एवढाच अर्थ नाही तर मोठमोठ्या कंपन्यांमध्ये विमा व्यवस्थापक असतात की जे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी दक्ष असतात मोठ मोठ्या कंपन्यांमध्ये यासाठी व्यवस्थापक नेमले जातात. आजी काच आपण कॉमर्स केला गेल्यानंतर या इन्शुरन्स क्षेत्रामध्ये देखील आवड असेल तर नक्कीच सहभाग घेऊ शकता.
7. इतर क्षेत्र
कॉमर्स शाखेला खुणावत असलेली आपण महत्त्वाची क्षेत्रे पाहिली याचबरोबर इतर जी काही क्षेत्र आहेत त्यांचादेखील विद्यार्थी विचार करू शकतात. इ कॉमर्स नोकरीच्या हजारो संधी आहेत. एखाद्या कंपनीत एच आर म्हणून आपण काम करू शकता, त्याचबरोबर मार्केटिंग ॲडव्हायझर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन तसेच शेअर मार्केट यामध्ये देखील आपण आपले करिअर करू शकता.
आजचा हा लेख पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आले असेल की खरोखरच अकरावी कॉमर्स आपल्यासाठी असलेली एक सुवर्णसंधी आहे आणि या संधीचे आपण सोने केले पाहिजे.परंतु तो ते सोने करण्यासाठी सुरुवाती पासूनच मेहनत घेणे अतिशय आहे. म्हणूनच आपली कॉलेज सुरू होण्याच्या अगोदरच आपल्याला किमान अकरावीला कोणते कोणते घटक अभ्यासायचे आहेत. या संदर्भात आम्ही स्वतंत्र असा एक लेख लिहिलाय त्या लेखांमध्ये आम्ही इयत्ता अकरावी कॉमर्स ची पुस्तके उपलब्ध करून दिलेले आहेत. या पुस्तकांचा सुरुवातीपासूनच अभ्यास केल्यानंतर आपल्याला समजेल की कॉमर्स खरोखर एक सुवर्णसंधी आहे.
अकरावी कॉमर्स सर्व पुस्तके pdf पाहण्यासाठी क्लिक करा.
त्या पद्धतीने आजच्या लेखात आपण अकरावी कॉमर्स एक सुवर्णसंधी याबाबत सविस्तर माहिती पाहिली यापुढे लेखांमध्ये देखील अकरावी कला शाखा विज्ञान शाखा या संदर्भात देखील आपण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर अकरावीचा अभ्यास कशा पद्धतीने करता येईल याबाबत देखील मार्गदर्शन केले जाणार आहे.
शैक्षणिक मार्गदर्शन ग्रुप
आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करतात तात्काळ शैक्षणिक मार्गदर्शनाच्या ग्रुप मध्ये जॉईन व्हाल आणि आपल्याला आवश्यक ती सर्व माहिती वेळच्यावेळी पुरवली जाईल.
शैक्षणिक मार्गदर्शन ग्रुप लिंक 👈क्लिक