अधिक श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023 | Shravan Mahina Shubhechha in marathi 2023
हिंदू धर्मातील बारा महिन्यांमध्ये सर्वात पवित्र महिना कोणता? तर तो महिना म्हणजे श्रावण. या महिन्यांमध्ये निसर्ग हिरवा गार असतोच ,परंतु त्याच बरोबर सगळीकडे आनंदी आणि भक्तिमय वातावरण असलेला महिना म्हणजे श्रावण महिना होय. जी मंडळी वर्षभरात कधी उपवास करत नाहीत अशी मंडळी देखील श्रावण महिन्यामध्ये एखादा वार पकडून त्या वाराला उपवास करतात.सर्वात जास्त श्रावणी सोमवार हा उपवास अनेकांकडून ठेवला जातो, म्हणूनच आज आम्ही या पवित्रा अशा श्रावण महिन्याच्या मराठमोळ्या शुभेच्छा 2023 आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. या (Shravan Mahina Shubhechha in marathi) या शुभेच्छा आपण आपले मित्र,मैत्रिणी,नातेवाईक यांना व्हाट्सअप फेसबुकच्या माध्यमातून देऊन त्यांचा आनंद अधिकाधिक द्विगुणीत करू शकता.तसेच आपल्या स्टेटसला देखील ठेऊ शकता. चला तर मग आपण अधिक श्रावण त्याच्या शुभेच्छा सर्वांना देऊयात.
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा |
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा(toc)
श्रावण महिन्याचे महात्म्य |Significance of the month of Shravan
श्रावण महिन्याविषयी असे सांगितले जाते की, हिंदू पंचांगामधील चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ आणि यानंतर येणारा पाचवा भारतीय हिंदू दिनदर्शिके नसार वर्षातला पाचवा महिना श्रावण होय.
💥डिप्लोमा प्रवेश 2023 मेरिट लिस्ट जाहीर 👈
श्रावण महिना नाव पडण्या मागील इतिहास |
या महिन्यांमध्ये पौर्णिमेला चंद्र हा श्रवण नक्षत्रामध्ये असतो आणि यावरूनच त्या पाचव्या महिन्याला श्रावण हे नाव पडले आहे.
हा श्रावण महिना आपल्या भक्ती भावाने ज्या पद्धतीने जोडला आहे.अगदी त्याच पद्धतीने नैऋत्य मान्सूनचे आगमन देखील याच महिन्यामध्ये होत असल्यामुळे निसर्गाशी देखील त्याचे काही नाते असल्यामुळे हा महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
अधिक श्रावण महिना किती वर्षाने येतो | How many years does the month of Shravan come?
अधिक श्रावण महिना हा कधी येतो, याविषयी सांगायचे झाले तर साधारणपणे आठ वर्षे किंवा कधीकधी 11 तर क्वचित प्रसंगी 19 वर्षांनी हा अधिक श्रावण महिना येत असतो.
या अगोदर अधिक श्रावण महिना आलेली वर्षे | Earlier years in the month of Shravan
आपण जर गेल्या काही वर्षांचा अंदाज घेतला तर 1901, 1909, 1920, 1928 ,1939, 1947, 1958, 1966 ,1977, 19 85, 2004 आणि आता यावर्षीचे 2023 हे अधिक श्रावण असलेली वर्षे आहेत.
श्रावणाची ओळख सणांचा राजा | Shravan's identity as the king of festivals
या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण येत असल्यामुळे या महिन्याला सणांचा राजा असे म्हटले जाते. श्रावण महिन्यामध्ये अनेक महत्त्वपूर्ण सण येतात.
१.नागपंचमी
२.नरहरी सोनार जयंती
३. श्रावण पोर्णिमा (नारळी पौर्णिमा)
४. राखी पौर्णिमा
५. पूजन
६. कृष्ण जन्माष्टमी
७. पिठोरी पोळा
असे अनेक सण या श्रावण महिन्यामध्ये येत असल्यामुळे या श्रावण महिन्याला विशेष असे महत्त्व आहे. तर मग पवित्र श्रावण महिन्याच्या आपले मित्र नातेवाईक यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या आनंदात देखील भर पाडूया.
2023 मधील अधिक श्रावण महिना कालावधी | More Shravan month period in 2023
2023 मध्ये आलेला श्रावण महिना हा 18 जुलै 2023 ते 15 सप्टेंबर 2023 हा अधिक श्रावण म्हणून असणार आहे आणि त्यानंतर निज श्रावण सुरू होणार आहे असा एकूण 59 दिवसांचा श्रावण महिना असणार आहे. या श्रावण महिन्यामध्ये धार्मिक वृत्तवैकल्ये यांना वेगळेच महत्व असते साहजिकच साधारणपणे येणारे पुढचे सात दिवस अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये जाणार आहेत.
अधिक श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा 2023 |Adhik Shravan mahinya chya Hardik shubhechha
अधिक श्रावण मासा मध्ये
निसर्ग आलाय पहा बहरून
आता थोडी भक्ती पाहणा करून
अशा या पवित्र श्रावण महिन्याच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
आता पुण्याला नाही तोटा
अरण श्रावण मास आला अधिक
म्हणून भक्ती भाव होणार आहे
आपल्याकडून मोठा
अशा पवित्र श्रावण मासाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
सत्कर्म करा असे सांगावया
श्रावण मास आला
चला चला मंडळींनो
भक्ती मार्गाला लागा
मित्र श्रावण महिन्याच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
श्रावण महिना सुरू झाला
आता करू शिवभक्ती .
यानेच वाढेल आपली दैव शक्ती
श्रावणी सोमवार आणि पवित्र
श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
आला श्रावण श्रावण
घेऊन पावसाच्या सरी
आहेर आहे वर्षा ऋतु जरी
भक्तीचे थेंब अंतरी पडे
श्रावण महिन्याच्या
हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
शिव सत्य आहे
शिव सुंदर आहे
शिव भक्ती आहे
शिव शक्ती आहे
अशा शिवाची भक्ती करण्याचा
महिना म्हणजे श्रावण महिना
श्रावण महिन्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येते सरसर शिरवे
क्षणात फिरुनी ऊन पडे
श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा!
हिरवीगार सृष्टी झाली
श्रावण सरींची लहर आली
पानाफुलात हसतो
खेळतो श्रावण
अशा पवित्र श्रावण
महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा!
अशा छान छान शुभेच्छा आपण आपले मित्र मैत्रिणी यांना पाठवा.
आमचे इतर लेख
अक्षय तृतीया सणाची मराठी माहीती
कारगिल विजय दिवस माहिती व निबंध
मुंबईमध्ये पाहण्यासारखे काय काय आहे