Type Here to Get Search Results !

संच मान्यतेसाठी आधार कार्ड सक्ती नाही! | Aadhaar card is not mandatory for sanch manyata

संच मान्यतेसाठी आधार कार्ड सक्ती नाही! | Aadhaar card is not mandatory for sanch manyata 


राज्यातील सर्व शाळांना आपली संच मान्यता करण्यासाठी तसेच बोगस पटसंख्या  यावर अंतिम उपाय म्हणून राज्याच्या शिक्षण विभागाकडून  संचमान्यतेसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आलेली होती. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काही तांत्रिक कारणांमुळे ते विद्यार्थी शाळेत आहेत परंतु त्यांच्याकडे आधार कार्ड नाहीत तर काहींच्या आधार मधील माहिती मिस मॅच होत आहे.अशा विद्यार्थ्यांसाठी आता संचमान्यतेसाठी आधार कार्ड सक्तीची अट शिथिल करण्यात आली आहे.


संच मान्यतेसाठी आधार कार्ड सक्ती नाही!
संच मान्यतेसाठी आधार कार्ड सक्ती नाही! 



संच मान्यता (toc)


संच मान्यतेसाठी आधार कार्ड सक्ती का होती ?

महाराष्ट्र राज्याच्या तसेच एकंदरतीच शिक्षण विभागाच्या असे निदर्शनास आले होते की, बऱ्याच शाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखवून शासनाकडून अनुदान लाटले जाते. यावर उपाय म्हणून गेल्या काही वर्षांपासून शालेय नोंदणी सरल मध्ये घेत असताना विद्यार्थ्यांचे आधार कार्ड त्यामध्ये नमूद करणे गरजेचे आहे.,जेणेकरून तो विद्यार्थी एकाच शाळेत दाखवला जाईल आणि बोगसपटाचा प्रश्न हा कायम निकालात लावला जाईल. यावर्षी शैक्षणिक वर्ष 2022 23 ची संच मान्यता देत असताना प्रत्येक विद्यार्थ्याचे आधार कार्ड असणे आणि ते व्हॅलिडीटी असणे बंधनकारक होते.


💥१ जुलै कितीने वाढणार वेतन असे करा चेक👈


आधार कार्ड आणि संचमान्यता निर्णयात बदल 

सरलवर विद्यार्थ्यांची जी माहिती उपलब्ध आहे, त्या माहितीतील बऱ्याच विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे किंवा ते व्हॅलिडेट होण्यामध्ये अडचणी येत असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना संचमान्यतेसाठी ग्राह्य धरता येणार नाही असे आदेश देण्यात आले होते. परंतु ती आकडेवारी मोठी असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच शिक्षक देखील अतिरिक्त ठरवले जाणार होते. म्हणूनच राज्याच्या  शिक्षण संचालकांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे, तो निर्णय म्हणजे जे विद्यार्थी नियमित शाळेत उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडे आधार कार्ड नाही अशा विद्यार्थ्यांचा विचार संचमान्यतेसाठी केला जावा. अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.


प्रत्यक्ष भेटी आणि विद्यार्थी तपासणी 

 ज्या विद्यार्थ्यांचे आधार सरल मध्ये अपडेट होत नाही, असे विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेमध्ये शिकत आहेत की नाहीत याची खातरजमा करण्यासाठी अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी देऊन ही सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करावयाचे आहे.


थोडक्यात आतापर्यंत सरल पोर्टल मध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आधार अपडेट आहे. अशाच विद्यार्थ्यांचा संच मान्यतेसाठी अर्थात संबंधित शाळेसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची किती पदे मंजूर केली जातील यासंदर्भात याकडेवारी विचारात घेतली जात होती. आता ज्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड अपडेट करण्यामध्ये किंवा त्यांचे आधार कार्ड व्हॅलिडेट करण्यामध्ये अडचणी येत आहेत अशा विद्यार्थ्यांचा समावेश देखील संच मान्यता फायनल करण्यासाठी केला जाणार आहे.

विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येतो त्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा संचमान्यतेसाठी विचार केला जाणार आहे असेच आजच्या या लेखाचे सार म्हणता येईल.

ही महत्त्वपूर्ण माहिती आपण इतरांना देखील पाठवा.ही विनंती.


आमचे महत्वाचे लेख 

दहावीनंतर  करावयाचे डिप्लोमा ऑनलाइन अर्ज सुरू 

ITI प्रवेश 2023 24 ऑनलाइन अर्ज सुरू 

महाराष्ट्र मेगा तलाठी भरती 4644 जागा ऑनलाइन अर्ज सुरू 

राष्ट्रीय शिक्षक पुस्कार नोंदणी अर्ज सुरू 

BMC कर्मचारी 2022 23 फॉर्म NO 16 उपलब्ध 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area