असे आहे इर्शाळवाडी, ज्याठिकाणी दरड कोसळली This is Irshalwadi, where the landslide occurred
कुठे आहे इर्शाळवाडी Where is Irshalwadi
इर्शाळवाडी ह्या गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली ह्यात मृतांचा आकडा स्पष्ट नसला तरी आकडा वाढण्याची शक्यताआहे .इर्शालवाडी हे गाव कर्जत - पनवेल रेल्वे line पासून जवळच आहे ,तसेच जुना पुणे - मुंबई मार्ग त्या लगतच हे गाव आहे .या हायवेपासून साधारण 2 - 3 किमी अंतर असलेले गाव आहे .तसेच चौक या गावापासून थोड्याच अंतरावर वसलेले असे गाव म्हणजे इर्शाळवाडी .
असे आहे इर्शाळवाडी ज्याठिकाणी दरड कोसळली |
इर्शाळवाडी ऐतिहासिक महिती
चौक हे गाव सरनोबत नेताजी पालकर यांचे जन्मगाव आहे ,चौक या ठिकाणी पूर्वीपासून बाजारपेठ आहे .
इर्शाळवाडी या गडाची इतिहासात जास्त माहिती नसली तरीही तो ट्रेकिंग करण्यासाठी जाणाऱ्या दुर्गप्रेमीसाठी महत्त्वाचे ठिकाण होते ,हा अत्यंत अवघड भाग आहे .
💥अकरावी प्रवेश चौथी यादी जाहीर आपल्याला कोणते कॉलेज मिळाले चेक करा.👈
ह्या ठिकाणी दरड कोसळल्या नसल्या तरी अनेक वेळा ट्रेकिंग करण्यासाठी आलेल्या लोकांचा दुर्दैवाने अपघात झाले आहेत ,अनुभवी दुर्गप्रेमी ट्रेकिंग करणारे असले तरी त्यांसाठी हा भाग कठीण वाटत असे .अनेक अनुभवी ट्रेकर्सला जीव गमवावा लागला आहे.
इर्शाळवाडी हे ठिकाण ट्रेकर्सला महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जाते .शिवाय विश्रांतीचा टप्पा म्हणून याकडे पाहिले जाते .या ठिकाणी थांबल्यावर जेवणाची सोय होऊ शकणारा भाग आहे .
इर्शाळवाडीत मदत पोहोचवणे कठीण का ?
पुणे -मुंबई Nh 4 जुना हायवेजवळ नानिवली हे गाव आहे तेथून गडाच्या पायथ्याशी जाता येते .
नानिवलीपासून 2-4 किमी पर्यंत चालत गेल्यावर इर्शाळवाडी हे गाव आहे ,पण हे सगळे अंतर डोंगर चढुनच जावे लागत असल्याने अवघड आहे .
दीड - दोन तास चालून जाण्याचा हा प्रवास आहे ,पुढे एक पठार आहे ते पठार म्हणजेच हे इर्शाळवाडी होय .
या इर्शाळवाडी पासून साधारण 100 - 200 मीटर डोंगराचा सुळका आहे ,तोच या गावावर कोसळला .
इर्शाळवाडीची लोकसंख्या
इरशाळवाडी हे गाव 40 -60 कुटुंबाचे छोटे गाव आहे .या गावात साधारणपणे 200 - 250 पर्यंत लोक राहतात .
हा अतिशय डोंगराळ भाग असून अनेक गिर्यारोहक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात पण हे चढण अवघड आहे .प्रस्तरारोहणचे साहित्य घेऊनच हा माथा चढावा लागतो .
इर्शाळवाडी या गडाचा इतिसात सापडत नसला तरी खंडाळा घाटाकडे जाणारा रस्ता जवळच आहे त्यामुळे टेहळणी आणि संदेशवहन करण्यासाठी या गडाचा उपयोग होत असावा असे जवळच राहणारे इतिहास संशोधक सांगतात .तसेच शिवाजी महाराज यांच्याही ताब्यात हा भाग असावा असे म्हटले जाते .
आमचे इतर लेख
दहावी सेमी इंग्रजी /इंग्रजी माध्यम गणित भाग 1 प्रकरण 3 रे सर्व सोडवलेली उदाहरणे
दहावी पास मुलांसाठी 2 लाख रुपयांची स्कॉलरशिप आपण आहात काय पात्र हे माहीत करून घेण्यासाठी क्लिक करा.