लाडकी बहिण योजना 2025 नवीन अटी | ladaki bahain yojna Navin ati 2025
महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा 2024 च्या अगोदर महाराष्ट्र शासनामार्फत लाडकी बहिण योजनेला सुरुवात झाली.. या योजनेला प्रचंड असा प्रतिसाद भेटला आणि त्यामुळेच सत्ताधारी पक्षाला पुन्हा एकदा सत्तेत राहण्याची संधी मिळाली.. परंतु आता एप्रिल 2025 पासून विधिमंडळ अधिवेशनामध्ये लाडकी बहीण योजना 2025 साठी काही नवीन अटी असणार आहेत आणि त्यांचीच माहिती आपण आज पाहणार आहोत..
लाडकी बहिण योजना 2025 नवीन अटी |
लाडकी बहीण योजना 2025 साठी नवीन अटी
लाडकी बहीण योजना महाराष्ट्र शासनामार्फत निवडणुका तोंडावर आलेल्या असताना सरसकट देण्यात आली परंतु आता त्यामध्ये व्यवस्थित छाननी केली जाणार आहे आणि खालील अटींची पूर्तता तपासली जाणार आहे...
1. उत्पन्न मर्यादा
लाडकी बहीण योजना 2025 चा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्या कुटुंबाचे एकूण उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल अशाच कुटुंबांना याचा फायदा घेतला जाणार आहे.. ही तपासणी अतिशय काटेकोर केली जाणार आहे.. त्यामुळे अनेक महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून मुकणार आहेत हे नक्की..
2. आयकर भरणाऱ्या व्यक्ती
साधारणपणे ज्या व्यक्ती इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दरवर्षी आपली रिटर्न फाईल तयार करतात अर्थात आयकर भरतात अशा व्यक्तींना देखील त्यांची आर्थिक परिस्थिती सदन आहे या कारणास्तव या कुटुंबातील महिलांना देखील आता लाडकी वेळी योजनेचा फायदा घेता येणार नाही..
3. सरकारी योजनांचा लाभ
एखाद्या स्त्रीला शासनाच्या इतर योजनांचा लाभ होत असेल जसे की विधवा सन्मान योजना वयोश्री योजना किंवा अन्य कोणत्या योजनांचा लाभ ती महिला घेत असेल तर अशा महिलांना देखील आता लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही..
4. चार चाकी वाहन
आता लाडकी बहीण योजना ही खऱ्या गरजवंत महिलांनाच मिळाली पाहिजे म्हणून महाराष्ट्र शासनामार्फत सर्वे देखील केला जाणार आहे अंगणवाडी सेविका हा सर्वे करतील आणि ज्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन असेल अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजना 2025 चा फायदा मिळणार नाही.. थोडक्यात काय तर खरोखरच ज्या महिलांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशाच महिलांना आता लाडके बहिण योजनेचा फायदा मिळणार आहे..
5. मोठे बागायतदार
साधारणपणे ज्या कुटुंबाकडे एकूण जमीन पाच एकर पेक्षा जास्त आहे म्हणजेच ते मोठे बागायतदार आहेत अशा व्यक्तींना लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळणार नाही.. ज्यांची जमीन पाच एकर पेक्षा कमी आहे अर्थात ते अल्पभूधारक आहेत. अशांना मात्र या योजनेचा लाभ घेता येणार आहे..
6.सरकारी नोकरदार
ज्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती सरकारी नोकरीला असेल ते कुटुंब देखील सदन कुटुंब समजले जाईल आणि त्या कुटुंबाला देखील अर्थात त्या कुटुंबातील लाभार्थी महिलेला यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही..
7. पेन्शनधारक महिला
ज्या महिलेला महाराष्ट्र सरकारकडून किंवा केंद्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळत असेल अशा महिलांना देखील यापुढे लाडकी बहीण योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले जाणार नाही..
थोडक्यात आजच्या लेखाच्या माध्यमातून आपल्या लक्षात आले असेल की विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर किंवा ही योजना लागू करायला जास्त वेळ नसल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून सरसकट योजना राबवली गेली परंतु आता एप्रिल 2025 पासून लाडके बहीण योजनेच्या नवीन अटीच्या महिला पूर्ण करतील अशा महिलांनाच याचा लाभ घेता येईल...