अक्षय तृतीयेचा इतिहास काय आहे What is the history of Akshay Tritiya in marathi

हिंदू धर्मात साडे तीन मुहूर्तांना विशेष महत्त्व आहे.या साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. या अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात दान धर्म तसेच नवीन वस्तूंची खरेदी केली जाते.आपण प्रत्येक सणांची सांस्कृतिक तसेच ऐतिहासिक पार्श्वभूमी अभ्यासत असताना सर्वप्रथम अक्षय तृतीया म्हणजे काय?हे पाहिल्यानंतर आजच्या लेखात हा अक्षय तृतीया सण साजरा केला जातो त्यामागे काय इतिहास आहे? याची माहिती पाहणार आहोत. या सणाची आपण What is the history of Akshay Tritiya? पाहिल्यानंतर आपल्या ध्यानात येईल की कोणतेही सण साजरे होतात त्यामागे कायतरी घटना घडलेली असते किंवा तो सण साजरा करण्यामागे कायतरी हिस्ट्री असते आणि तीच history आज आपण akshaya तृतीया सण साजरा करण्यामागे काय आहे हे पाहणार आहोत.

 

अक्षय तृतीयेचा इतिहास काय आहे

अक्षय तृतीयेचा इतिहास काय आहे 

अक्षय तृतीया सण साजरा होण्यामागील घटना अर्थात इतिहास| akshaya trutiya san sajra yamagil ghatna ithihas अक्षय तृतीयेला काय काय घडले घटनांची माहिती |अक्षय तृतीयेच्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या घडामोडी 

कोणताही सण साजरा होतो तो सण साजरा करण्यामागे कायतरी पार्श्वभूमी नक्कीच असते जसे की गुढीपाडवा सण हिंदू नववर्षाची सुरुवात तसेच त्यामागील इतिहास पाहिला तर राम वनवासात परत आल्याचा दिवस लोकांनी गुढ्या उभारुन साजरा केला हा त्यामागील इतिहास आहे.तसाच आकिती सणाचा इतिहास आपण आज पाहणार आहोत.यामध्ये 

१.परशुरामाचा जन्म दिवस | parshu ramcha janmdin mhnje akshaya tritiya 

अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू यांनी जे अनेक अवतार घेतले त्यातील सहावा अवतार परशुरामाचा आहे.  या परशुरामांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस अक्षय तृतीयेचा दिवस होता. या परशुरामाने पुढे संपूर्ण पृथ्वी निशस्त्र करण्यासाठी आपले अवघे आयुष्य वेचले. थोडक्यात अक्षय तृतीया साजरी करण्यामागे इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना म्हणजे परशुरामाचा जन्मदिन होय.

2. पाच पांडव आणि अक्षय पात्र |pach pandav ani akshaya patr 

पाच पांडवांना अनमोल मार्गदर्शन करण्याचे काम भगवान श्रीकृष्ण यांनी केले. प्रभू रामाप्रमाणे पाच पांडवांना देखील वनवासाला जावे लागले.वनवासामध्ये येणाऱ्या असंख्य अडचणी विचारात घेऊन त्यांना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी कृष्णाने त्यांना एक भांडे दिले त्या भांड्याला अक्षय पात्र म्हणून ओळखले जाते. अक्षय पात्रामुळे पांडवांना आपल्या वनवासामध्ये कधी खाण्यापिण्याची चिंता वाटली नाही. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो.जेणेकरुन की आपण दानधर्म केला, या दिवशी नवीन काही खरेदी केले तर पूर्ण वर्षभर कुटुंबाची भरभराट होईल. थोडक्यात पाच पांडवांना ज्या दिवशी अक्षय पात्र भेटले तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया.

3. श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट| krushan ani sudama bhet zali to divas 

श्रीकृष्ण आणि सुदामा हे लहानपणीचे मित्र होते. एके दिवशी आपल्या मित्राची आठवण आली म्हणून सुदामा श्रीकृष्णाला भेटायला त्याच्या राज दरबारी गेला. राज दरबारी गेल्यानंतर माता लक्ष्मी यांना आपण काहीतरी सुदाम्यासाठी केले पाहिजे त्याला मदत केली पाहिजे  असे वाटू लागले. परंतु धन दौलत सुदाम्याच्या भाग्यामध्ये नव्हती. यावेळी काय करावे? असा प्रश्न कृष्णाला पडला आणि कृष्णाने पद पूजनाचे निमित्त करून सुदाम्याची जुनी भाग्यरेषा पुसून काढली आणि नवी  भाग्य रेषा काढली. त्यामुळे सुदाम्याला माता लक्ष्मी ने प्रसन्न होऊन भरभराट दिली.तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस. 

4.श्रीकृष्णाचा युधिष्ठिराला उपदेश | krushancha yudhistras updesh 

श्रीकृष्णांनी युधिष्ठराला उपदेश केला की या दिवशी जे लोक दान करतील त्यांना कोणत्याही प्रकारची कमी पडणार नाही. म्हणूनच या दिवसाची ओळख अक्षय म्हणजे ज्याचा कधी क्षय नाही, जे कधीही कमी होणार नाही. असा दिवस म्हणून अक्षय तृतीयेला ओळखले जाऊ लागले. या दिवशी लोक मोठ्या प्रमाणात वस्तूंचे दान करतात.

5. महाभारतातील युद्ध विराम | mahabhartatil yudhh thamble 

अक्षय तृतीयेचा इतिहास पाहत असताना अजून एक महत्वाची घटना म्हणजे महाभारतातील युद्ध ज्या दिवशी संपले. त्या युद्धाला विराम मिळाला तो दिवस अक्षय तृतीयेचा  दिवस म्हणून ओळखला जातो.

6.कुबेराने लक्ष्मी पूजनाला सुरुवात | kuberane laxmi pujnaala suruvat 

शंकराने याच दिवशी कुबेराला जर तुला धनधान्य यांची बरकत हवी असेल, तर तू आजपासून लक्ष्मीची पूजा करायला सुरुवात कर. असा उपदेश केला तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस.

7. महाभारत लेखनाला प्रारंभ |  mahabharat lekhnachi suruvat 

महाभारतातील युद्ध संपल्यानंतर महर्षी व्यास यांनी घडलेल्या सर्व घटना लिहायला म्हणजेच महाभारत लिहायला ज्या दिवशी सुरुवात केली तो दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस होय.

अक्षय तृतीया आणि दानधर्म | akshaya trutiyela dan dharm ka krtata 

अक्षय तृतीयेच्या दिवशी दानधर्म केल्याने आपल्याला पुण्य मिळते. त्याचबरोबर दिल्याने वाढते ही हिंदू संस्कृतीतील शिकवण रुजवण्यासाठी अक्षय तृतीयेला मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो. दानधर्म करत असताना दैनंदिन वापरातील वस्तू त्याच बरोबर दागिने कपडे यांचे देखील मोठ्या प्रमाणात दान केले जाते. रस्त्याने चालणाऱ्या प्रवाशाची तहान भागावी म्हणून अगदी आवर्जून आपल्या पूर्वजांच्या आठवणी प्रित्यर्थ लोक पाणपोया सुरू करतात.

अशा पद्धतीने आज आपण अक्षय तृतीया सण साजरा होण्यामागील इतिहास अगदी आपल्या समजेल उमजेल अशा  मराठी भाषेमध्ये पाहिला. ही माहिती आपण आपल्या घरातील मुलांना वाचून दाखवा जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीचे महत्व समजेल. तसेच आज अनेक लोक स्वार्थी आणि आत्मकेंद्री बनत चाललेले आहेत. त्यांना देखील या अक्षय तृतीयेच्या सणाचा इतिहास सांगितल्यानंतर आपण देखील समाजाचे देणे लागतो, याची जाणीव होईल. या अक्षय तृतीयेला केवळ एकमेकांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देऊन तेवढ्यावरच थांबू नका. तर हा अक्षय तृतीया सण साजरा होण्यामागील पार्श्वभूमी लोकांना नक्की पाठवा की लोकांना आवडेल. धन्यवाद

अक्षय तृतीया इतिहास दाखवा akshaya trutiya history in marathi 



 

आमचे अप्रतिम लेख

 

Leave a Comment