about us

About us 

ज्ञानयोगी डॉट कॉम विषयी : 

            जे जे आपणासी ठावे I 

                       ते ते इतरांसी सांगावे I

                       शहाणे करून सोडावे I

                       सकळ जन II 

                                    संत समर्थ रामदास स्वामी. 

 समर्थ रामदास स्वामी यांचे वरील विचार खरोखर मनाला भावणारे आहेत. सांगण्यासारखे जे जे आपल्याकडे असेल ते खरोखरच आपण एकमेकाना सांगायला हवे.एक व्यक्ती सर्व क्षेत्रात प्रवीण किंवा तरबेज असू शकत नाही पण ती व्यक्ती ज्या क्षेत्रात काम करत आहे त्या क्षेत्रात  तिला जर सखोल ज्ञान असेल तर त्या व्यक्तीने ते  आपणहून  इतरांना दिले पाहिजे. कल्पना करा असे हे ज्ञान जर आपण प्रत्येकाने  एकमेकाना द्यायचे ठरवले तर विभिन्न  क्षेत्रातील किमान बाबी तरी समजायला नक्की मदत होईल. 

                आपण जगत असताना आपल्याला वेगवेगळेव नावीन्यपूर्ण अनुभव येत असतात. ते चांगले असो की वाईट इतराना शोध बोध देणारे असतात हे नक्की .उदाहरण द्यायचे झाले तर मला एखादा व्यासाय सुरू करायचा आहे त्यासाठी मी समजा त्या क्षेत्रातील महितीगार व्यक्तीकडे गेलो किंवा एखाद्या Business  Counsler कडे गेलो. त्यांच्याकडून एखाद्या व्यवसायविषयी माहिती मिळवली.तसेच  समजा मी  अजून एक केले की  त्या क्षेत्रात जी व्यक्तीचा व्यवसाय करताना तोटा झाला आहे तिलाही भेटायला गेलो तर आपल्याला कोणचे मार्गदर्शन जास्त कामाला येईल ? तर जो व्यक्ती त्या क्षेत्रात अयशस्वी झालाय त्याचे. तुम्ही म्हणाल असे कसे काय ? हो कारण का त्तर तो तर या व्यवसायात बुडाला आहे.  पण या व्यवसायात कोणत्या चुका टाळल्या ? तर व्यवसाय उत्तम होईल याची खडा न खडा माहिती तो देऊ शकतो.तात्पर्य काय तर दहा पुस्तके वाचण्यापेक्षा अनुभवातून  मिळणारे ज्ञान उच्च कोटीचे असते.हेच वेगवेगळे अनुभव जसे माझे तसे समाजातील अनेक व्यक्तीचे या ब्लॉगवर मांडण्याचा मानस आहे, थोडक्यात काय तर आजवरच्या प्रवासात  जीवन जगताना,अध्यापन करतांना,काही जबाबदारीची कामे पार पाडताना,शिक्षण घेत असताना नि आता तर स्वत शिक्षक असल्याने  इतरांना देत असताना जे अनुभवांचे गाठोडे  इतर जनासमोर मोकळे करण्याची योग्य जागा  म्हणजे DNYANYOGI.COM . 

                  या ब्लॉग च्या माध्यमातून सामान्य जनाना आर्थिक साक्षर करणे.कारण आज एक छुपा चंगळवाद बोकाळत आहे.केवळ पैशाचा अपव्यय म्हणजे जिंदगी जिना अस नवीन फॅड अगदी गरीब वर्गापासून अमीर वर्गात येऊन  पोहोचले आहे. या सर्वाना थेंबे थेंबे तळे साचे. अगदी तसेच पै पै करून,थोडी थोडी काटकसर करून आपणं करोडपती बनू शकतो याची जाणीव निर्माण करणे.आणि तो काटकसर केलेला पैसा करोडपती बनण्याच्या शिडीवर म्हणजे शेअर बाजारात कसा ठेवायचा,किंवा आपल्या कमाईतील 1 ते 2 टक्के रक्कम दरमहा गुंतवणूक केल्यास काही एक वर्षांनी ती कितीतरी पटीने वाढत असते .पण हे कळण्यासाठी एक आर्थिक भान असावे लागते.शेअर बाजाराकडे व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी सामान्य लोकाना देणे . आपल्या आधीची पिढी ऋण काढून सण  करत नव्हती. अगदी तीच मानसिकता तयार करण्याचे काम हा ब्लॉग करणार आहे.

                 वरील सर्व विवेचन पाहून अस वाटले असेल केवळ पैसा महत्वाचा आहे . काटकसर महत्वाची आहे. जीवनात  केवळ पैसा म्हणजे सगळ का ? तर नाही मग जीवनात काय हवे सुख समाधान आणि शांती.मग या सुखाविषयी थोर संत ,विचारवंत यांनी जे विचार मांडले त्याच्या जोडीला आपले स्वानुभव यांची सांगड घालून आनंद व सुखी राहण्याचा मार्ग शोधणे व त्या मार्गावर अखिल मानव जातीला घेऊन जाणे ही देखील एक व्यापक भूमिका ज्ञानयोगी डॉट कॉम ची आहे. समजात असा एक वर्ग आहे की त्याला आर्थिक भान आहे,तो सुखी समाधानी आहे.  पण त्याच्याजवळ असलेले  जे ज्ञान आहे ते ज्ञान तो इतरांना देत नाही त्यामागे एक तर त्यांची  कोती म्हणजे संकुचित मानसिकता असेल किंवा काही एक चुकीची धरणा.पण याबबात मला जी शिकवण मिळाली, जो मार्ग मिळाला तो तो दिल्याने वाढते. असे  म्हणतात

                            देणाराने  देत जावे. घेणाराणे  घेत जावे. 

                            घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे.   

                            या विंदा करंदीकरांच्या कवितेच्या दोनच ओळी किती मोठा अर्थ सांगून जातात. अगदी तोच आनंद  देण्याचा स्वानंद मला हवाय. अस म्हणतात कोण जर आपल्याकडे भाकर मागायला  आले तर त्याला आयती भाकरी देण्यापेक्षा ती बनवण्याची कला द्यावी,असे केल्यास ती व्यक्ती  आयुष्य भरासाठी तुमची ऋणी राहील व कोणापुढे हात पसरणार नाही उलट असा कोण याचक भेटला तरत्याला देखील ते ज्ञान ती देईल. हाच विचार या ब्लॉग चा आहे  पुस्तकरूपी,अनुभवरूपी ज्ञान या ज्ञानयोगी डॉट कॉम वर सतत दिले जाईल.व वाचक वर्गाला देखील बोलते केले जाईल.कारण ज्ञानयोगी डॉट कॉम विचार व्यक्त करण्याचे व्यासपीठ म्हणून काम करणार आहे. 

             हे झाले अर्थार्जन नि त्याच्या जोडीला आनदी कसे जगावे ? याचे मंथन. याच्या जोडीला अजून काय आहे तर मी पेशाने शिक्षक असल्याने व अगदी लहाना पासून ते पदवी घेणारे किंवा भावी शिक्षक होऊ पाहणारे याना समजून घेण्याचे व्यावसायिक कौशल्य माझ्याकडे आहे.कारण या क्षेत्रात मी एम एम एम एड आहे यात मोठेपणा बिलकुल नाही तर बालकाला काय द्यायचे,कसे द्यायचे याची बऱ्यापैकी जान आहे असो .विद्यार्थी हेच आमचे दैवत. या दैवताला उज्ज्वल भविष्य ,आत्मविश्वास नि जीवनात आकशाला गवसणी घालणारी स्वप्न बघायला  नाहीत तर ती स्वप्न सत्यात कशी उतरवायची. त्यासाठी अभ्यास कसं करावा? विषयातील बारकावे  यासारख्या बाबी या सदरात येतील.मी अध्यापन करताना असा अनुभव आला मी जे शिकवतो त्याला मुले प्रचंड दाद देतात. जो भाग शिकवला  त्यावर उत्तरे ही देतात पण कालांतराने जो भाग शिकले त्याचा त्याना  विसर पडलेला असतो.रात्र थोडी नि सोंगे फार अशे हे दहावीचे वर्ष. मग कल्पना आली आपण तोंडी खूप समजवतो पण लिखित स्वरूपात डेटा मुलांकडे नसल्याने नि मुले बाजारातील ज्या नोट्स वापरतात त्यातून त्यांच्या  संकल्पना स्पष्ट न होता अजूनच क्लिष्ट बनत आहेत हे माझे निरीक्षण आहे  यावर उपाय म्हणून वर्षभर अशी एक लेखमालिका देऊन गुणवतापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न म्हणजे ज्ञानयोगी डॉट कॉम होय. 

         हा ब्लॉग म्हणजे पै पै वाचवायला जो शिकला त्याला एक दिवस नक्की करोडपती बनण्याचा राजमार्ग दाखवेल.जो ज्ञान ग्रहण करेल त्याला ज्ञानी बनवेल. व जे  सर्व सुखाचा उपभोग घेतील त्यानं खरे सुख जगात असते की नाही माहीत नाही. पण भगवंताने जे जे दिले ते म्हणजे खरे सुख. किंवा जे प्राप्त आहे  ते ही नसे थोडके याची जीवनात प्रचिती यायला लागली की तो योगी बनेल.आणि तो योगी अवघ्या जगाला सुखाचा हा साधा सोपा  मार्ग दाखवेल.वणीला विराम देता देता एवडेच म्हणेन,  मी जे एक स्वप्न पहिले आहे आर्थिक काटकसरितून सामान्या माणसाला असामान्य बनवण्याचे,विद्यार्थ्याला ज्ञानी बनवण्याचे. तसेच जीवनाच्या  प्रवासात अगदी सरळ म्हणजे योग्य मार्गाने जाण्याचे आणि तोच मार्ग आपल्याला योगी बनवेल.असा हा सर्व खटाटोप म्हणजे आपला ज्ञानयोगी डॉट कॉम ब्लॉग होय.

              ज्ञानयोगी डॉट कॉम च्या माध्यमातून एक वैचारिक,आर्थिक नि वैश्विक सुखाची क्रांती घडवूया व आपली एक वेगळी ओळख बनवूयात.तर ही साथ नि आशीर्वाद माझ्या पाठीशी  राहू द्या.या मांडणीत  काही अहंभाव  जाणवत असेल तर तो माझा दोष आहे हे नक्की कारण परिपूर्ण कोणीच नाही .चला तर मग एका नव्या पर्वाला सुरुवात करूया. सबका भला हो. मंगल हो. या एका उदात विचाराने.

माझ्याविषयी :

                           मी श्री प्रशांत श्रीरंग शिपकुले. मी बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागात सहा. शिक्षक या पदावर गेल्या बारा वर्षापासून अध्यापनाचे कामकाज पाहत आहे.मी एम. ए. एम एड सेट ,नेट असून शिक्षण क्षेत्रात कृतियुक्त संशोधनाच्या माध्यमातून शिक्षण प्रणालीत नवे असे काहीतरी देण्याच्या उद्देशाने अभ्यास सुरू आहे.त्याच बरोबर राज्यस्तरावरील विविध प्रशिक्षणे घेऊन जिल्हा स्तरावर त्याची अमलबजावणी करण्याचे काम देखील केलेले आहे.

प्रशांत शिपकुले एम.ए. एम.एड.

                 मराठी, हिन्दी ,इतिहास व भूगोल या चार विषयांचे अध्यापन अनुभव माझ्या गाठीशी आहेत.त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला असल्याने विज्ञान व इंग्रजी यांचे देखील काही अंशी पायाभूत ज्ञान आहे. अंकगणित आवडत असल्याने गणित विषयाची देखील आवड आहे, सांगण्याचा मुदा हा की दहावीच्या विद्यार्थ्याला परिपूर्ण मार्गदर्शन हा ब्लॉग करू शकतो याची मला खात्री आहे. या सर्वांच्या जोडीला एक आवड म्हणून माझे एक यूट्यूब चेनेल आहे. हे सर्व एक शिक्षक म्हणून तर या सर्वांच्या जोडीला  शेअर बाजारात इन्वेस्टर म्हणजे गुंतवणूकदार  म्हणून भूमिका बजावत आहे.त्यातील बऱ्याच बाबी स्वानुभव,वाचन व आजूबाजूचे निरीक्षण यांच्या माध्यमातून बऱ्यापैकी बाबी माहिती आहेत. थोडक्यात हा ब्लॉग विद्यार्थी,शिक्षक व सामान्य माणूस याना डोळ्यापुढे ठेऊनच ज्ञानयोगी डॉट कॉम सुरू केला आहे. 

              एक भले काम म्हणून सुरू केलेल्या केवळ माझ्या नहवे  तर या आपल्या ब्लॉगला एक वेगळी ऊंची मिळावी ही मनोमन भावना या ब्लॉगवरील माहिती म्हणजे केवळ अक्षरे नाहीत तर त्यात ज्ञानियांचा राजा ज्ञानेश्वर याना हे विश्व सुखी व्हावे अशी  जी भावना होती तीच भावना माझी देखीलआहे.करता करविता तो भगवंत मी एक निमित्त.असे म्हणून सुरुवात करूया व वेगवेगळ्या क्षेत्रातील ज्ञान घेऊन ज्ञानयोगी बनूया.