जागतिक महिला दिन भाषण मराठी 2024|women’s day speech in Marathi 2024

women’s day speech in Marathi 2024 : 8 मार्च हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही आपल्यासाठी जागतिक महिला दिनानिमित्त मराठी भाषण 2024 घेऊन आलेलो आहोत. आमचे हे women’s day speech in Marathi 2024 आपल्याला नक्कीच आवडेल. 8 मार्च 2023 रोजी साजऱ्या होणाऱ्या महिला दिनानिमित्त शालेय विद्यार्थी,पालक , शिक्षक त्याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था यांना या दिवसाचे महत्त्व कळावे? तसेच जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? या संदर्भात देखील माहिती मिळावी हा या लेखामागील उद्देश आहे.चला तर मग आपल्या महिला दिन भाषण 2024 या लेखाला सुरुवात करूया.

women's day speech in Marathi 2024
women’s day speech in Marathi 2024

जागतिक महिला दिन भाषण मराठी 2024 | women’s day speech in Marathi 2024

आपल्याला कोणतेही भाषण असो त्या भाषणाकडे वाचकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्या भाषणाची सुरुवात ही आकर्षक करायला हवी. Women’s day speech in Marathi देत असताना आपण महिला दिनाच्या भाषणामध्ये आपण एखाद्या छानशा चारोळी ने सुरुवात करू शकता.

जागतिक महिला दिन भाषण आकर्षक सुरुवात

अध्यक्ष महाशय आणि गुरुजनवर्ग त्याचबरोबर येथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो,आज मी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने जे भाषण करणार आहे ते भाषण आपण शांतचित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती.

जगातील प्रत्येक नारीला

नारीच्या अगाध कर्तुत्वाला

नारीशक्तीच्या नेतृत्वाला

नारीशक्तीच्या त्यागाला

नारीशक्तीच्या सहनशीलतेला

नारीशक्तीच्या प्रेमाला 

आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी सलाम करतो. 

दरवर्षी 8 मार्च या दिवशी संपूर्ण जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी विविध क्षेत्रांमध्ये आपला ठसा उमटवणाऱ्या त्याचबरोबर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गुणगौरव देखील केला जातो. राष्ट्राच्या विकासामध्ये, समाजाच्या विकासामध्ये त्याचबरोबर कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये महिलांचे योगदान किती महत्वपूर्ण आहे. हे आपल्याला माहितीच आहे.आपण जर इतिहासात डोकावून पाहिले तर आपल्या लक्षात येते की कायमची या स्त्रीशक्तीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते म्हणूनच काही पुढारलेल्या आणि समानतावादी विचारसरणीतून जागतिक महिला दिन साजरा केला जावा.हा विचार पुढे आला आणि 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला.

आजच्या या महिला दिनाच्या निमित्ताने मी एवढेच सांगेन की, कायद्याने महिलांना आरक्षण दिले असेल तसेच समाजामध्ये वावरत असताना त्यांना मुक्तपणे वावरण्यासाठी संरक्षण दिले असेल, त्यांच्यावर कोणी अन्याय केला तर तो अन्याय करणाऱ्यावर कडक कारवाई करणारे कायदे देखील केले असतील. परंतु एवढे सगळे केले म्हणून आपण स्त्रीशक्तीचा सन्मान केले असे होत नाही.

आज आपण पाहतो अनेक स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रांमध्ये सहभाग घेताना दिसत आहेत.वैद्यकीय क्षेत्रात देशाच्या संरक्षण क्षेत्रात असो महिला आज सगळ्या क्षेत्रामध्ये हिरीरीने सहभाग घेत आहेत. परंतु आपल्या व्यवसायाच्या तथा कामाच्या ठिकाणावरून त्या दमून भागून घरी आल्यानंतर घरातील कामांचे रहाटगाडगे त्यांनाच संभाळावे लागत आहे.

आजच्या या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण या स्त्री शक्तीचा सन्मान म्हणून कार्यालय असो की घर असो त्यांना समानतेची वागणूक देण्याचा प्रयत्न करूया.घरातील अमुक काम केवळ महिलांनीच करायचे अशी जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली रीत, परंपरा आहे त्या परंपरेला छेद देऊया. आपण कामावरून थकून आल्यावर आपल्याला आराम हवा असतो मग हाच आराम आपली आई असो ताई असो की पत्नी असो यांना का नसावा? असा प्रश्न आपल्याला पडला आणि आपण जर खऱ्या अर्थाने कोणतेही काम असो त्या कामांमध्ये मी यापुढे स्त्री-पुरुष असा भेदभाव करणार नाही. अशी मनोभूमिका तयार करण्यामध्ये यशस्वी झालो तर खऱ्या अर्थाने आपण जागतिक महिला दिनानिमित्त या महिलांना दिलेले एक सर्वात मोठे गिफ्ट असेल.मला एवढंच सांगायचं आहे महिलांना केवळ नावापुरते स्वातंत्र्य नको तर खरे खुरे स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

ज्यावेळी समाजामध्ये असे समानतेचे चित्र दिसेल त्याचवेळी आपण म्हणू शकतो की आता समाज खरोखर पुढारलेला आहे. भातुकलीचा खेळ खेळताना ज्यावेळी आपल्याला घरात मुले दिसतील आणि हातात बंदूक घेऊन मुली ज्यावेळी पोलीस बनताना दिसतील त्यावेळी हे नवे चित्र निर्माण होत आहे असे आपण म्हणू शकतो. हे वरवर पाहिल्यानंतर हे खूप सोपे वाटत असले तरी वाटते तितके सोपे नाही.थोडक्यात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आपली पुरुषी मानसिकता बदलून महिलांचा खरा मान सन्मान करणे ही आपली जबाबदारी आहे.

आपल्या जीवनातून आई ताई पत्नी मैत्रीण हे शब्द वजा केल्यानंतर आपल्याला कोणताच अर्थ राहत नाही. कारण या सगळ्यांना बांधून ठेवणारी एक स्त्री आहे म्हणून या स्त्रीशक्तीचा सन्मान करूया.

माझ्या भाषणाला विराम देत असताना मी एवढेच म्हणेन,

ज्याला स्त्री आई म्हणून कळली

तो जिजाऊचा शिवबा झाला

ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली

तो मुक्ताई चा ज्ञानदेव झाला

ज्याला स्त्री एक मैत्रीण म्हणून कळली

तो राधेचा श्याम झाला

आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली

तो सीतेचा राम झाला…..

मी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपणाला खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीला शुभेच्छा कोणत्या असतील याविषयी माझे विचार मांडले माझे हे भाषण (women’s day speech in Marathi 2024) आपण शांतचित्ताने ऐकून घेतले त्याबद्दल मी आपला आभारी आहे जय हिंद जय भारत.

आपल्याला हे भाषण pdf स्वरूपात हवे असल्यास ते देखील आम्ही आपल्याला देत आहोत.

जागतिक महिला दिन भाषण मराठी 2024पीडीएफ | women’s day speech in Marathi 2024 pdf

आपल्याला या भाषणाचे pdf डाउनलोड करण्यासाठी खालील डाउनलोड बटनावर क्लिक करा.

अशा पद्धतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मी केलेले मराठी भाषण आपल्याला नक्कीच आवडले असेल हे वाचन आपल्याला आवडल्या असल्यास आपण इतरांना देखील ते पाठवा ही 

आमचे इतर लेख वाचा

सोपी योगासने करा आणि आरोग्य संपन्न बना  

महाराष्ट्र सरकार कडून दिल्या जाणाऱ्या 31 स्कॉलरशिप माहिती