योगा व योगासनाचे प्रकार Yoga v Yogasnaache Prakar

21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो.जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून एक विशेष लेखमालातून योग दिनाच्या निमित्ताने वाचकांना आरोग्याविषयी जागृत करणे हा दृष्टिकोन समोर ठेवून लिहिले गेले आहेत.पहिल्या लेखांमध्ये आपण योग म्हणजे काय ? योग करण्याचे कोणते फायदे आहेत.यावरही प्रकाश टाकला तर त्या नंतरच्या लेखांमध्ये आपण जागतिक योग दिन निबंध लेखन, बातमी लेखन, व योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये द्यावयाच्या घोषणा या विषयी माहिती पहिली. तर तिसऱ्या लेखांमध्ये योग दिनावर आधारित कविता रूपाने योग महिमा जाणून घेतला. आता दोन दिवसा वरती जागतिक योग दिन येऊन ठेपला आहे,म्हणूनच योगा म्हणजे काय?आणि काही मोजके योग प्रकार किंवा योगासनांचे प्रकार की जे विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये करून दाखवू शकतो. केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनी देखील दररोज किमान अर्धा तास योगासने केली तर आपले आरोग्य देखील चांगले राहू शकते.चला तर मग योगासने आणि योगासनांचे प्रकार या लेखाला सुरुवात करुया. सर्वप्रथम आपण योगासने म्हणजे काय ?याविषयी अगदी थोडक्यात माहिती पाहूया.ही yoga v yogasnaache prakar आपल्याला जीवनोपयोगी आहेत.

 

योगा व योगासनांचे प्रकार
योग व योगासनांचे प्रकार

योगासने म्हणजे काय ?

 

योगासने म्हणजे व्यायाम किंवा आपल्या शरीरातील अवयवांना मजबूत करणाऱ्या कृती एवढाच अर्थ जर आपण योगासनांचा घेणार असू तर तो संकुचित अर्थ आहे.

 

 

“योगासने म्हणजे काय तर अशा काही क्रिया ज्या क्रियांमुळे शरीर आणि मन अंतर्धान  पाहून एकाग्र होतं आणि एक वेगळीच अवस्था मनाला प्राप्त होते पण हे सर्व घडण्यासाठी किंवा मनाला  स्थिर करण्यासाठी करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने केले जाणाऱ्या साधनेला योग्य किंवा योगा अभ्यास  म्हणता येईल”

 

 

थोडक्यात काय तर आपल्याला वाटेल त्या पद्धतीने शरीराला वेगवेगळी आसने करायला लावणे म्हणजे योग करणे असे अजिबात नाही, तर जी व्यक्ती योग क्षेत्रातील जाणकार आहे तिच्या मार्गदर्शनाखाली योगासने करावी लागतात.आपल्याला माहीत आहे योगाचे असंख्य फायदे आहेत. परंतु जर का योग किंवा योगासने चुकीच्या पद्धतीने आपण केली तर मात्र आपल्या शरीराची प्रचंड नुकसान देखील योगासने करू शकतात शरीरातील सर्व यंत्रणा त्यामुळे बिघडू शकते.

आजच्या लेखात जागतिक योग दिनाच्या निमित्ताने काही मोजक्या आसन प्रकारांचा म्हणजेच योगासनांचा परीचय मी आपल्याला करून देणार आहे.ही आसनेअतिशय सोपी आणि सहज करता येतील अशी आसने आहेत. चला तर मग या चला तर मग योगासनांचे प्रकार पाहूया आम्ही दिलेला योगासने तक्त पहा जेणेकरून अनेक आसने माहीत होतील.

 

 

 

योगासने तक्ता
योगासने तक्ता

योगासनांचे प्रकार माहिती मराठी | Information on types of Yogasanas in Marathi /Yoga v Yogasnaache Prakar

 

योगशास्त्रमध्ये किंवा पतंजली यांच्या योग सूत्रानुसार योगाचे अनेक प्रकार सांगितले गेले आहेत. यातील विद्यार्थ्यांना किंवा सामान्य माणसांना उपयोगी पडतील असे योगासनांचे प्रकार मी आपण पाहणार आहोत.

 

  1. पाठीवरीलआसने
  2.  पोटावरील आसने
  3. उभे राहून करावयाची आसने
  4. बसून करावयाची  आसने

 हे प्रकार आपण ढोबळमानाने केलेले आहेत.

 

1.  पाठीवरील आसने माहिती मराठी Back seat information in Marathi

 

 

“पाठ जमिनीकडे आणि तोंड आकाशाकडे या स्थितीमध्ये केले जातात त्यांना पाठीवरील  आसने म्हणतात.”

 

त्या पाठीवरील असणार मधील काही प्रमुख आसने आपण पाहूया..

A. उथीत पादास

 

हे करत असताना सर्वप्रथम आपला डावा पाय जमिनीपासून काही अंतरावर ती साधारण 40 अंश वरती उचलावा. सुरुवातीला साधारणपणे 30 ते 35 सेकंद कालांतराने तो वेळ एक मिनिटापर्यंत आपण घेऊ शकता.आलटून-पालटून सुरुवातीला उजवा नंतर डावा आणि नंतर दोन्ही पाय अशा पद्धतीने चाळीस अंशात उचलायचे आहेत आपल्या हात जमिनीला लागलेले असले पाहिजेत.

 

 हे आसन केल्यामुळे आपले स्नायू मजबूत होतात त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपले पाय वरती उचलत असल्यामुळे पायांचे स्नायू मजबूत होतात.

 

B. सायकलिंग

 
सायकलिंग योगासन करायला एकदम सोपे आहे. परंतु याचे लाभ प्रचंड आहेत. हे करत असताना सर्वप्रथम पाठीवरती झोपावे. सुरुवातीला डावा पाय चाळीस वर्षापर्यंत वर उचलावा. आणि ज्या पद्धतीने आपण सायकलचा पायडल मारतो त्याच पद्धतीने पाय हा हलवावा सुरुवातीला  उजव्या पायाने सायकलिंग करावे.त्यानंतर डाव्या पायाने सायकलिंग करावे. आणि शेवटी दोन्ही पायाने सायकलिंग करावे हे आसन घरातील लहान मुले तशीच मोठ्या व्यक्ती देखील करू शकतात.
 
सायकलिंग केल्यामुळे आपल्या शरीरातील रक्तप्रवाह नीट व्हायला मदत मिळते. पायाचे स्नायू मजबूत होतात त्याचबरोबर आपली सर्दी कमी व्हायला मदत होते.

 

C.  रोलिंग

पाठीवरील हे देखील एक महत्त्वाचेआसन आहे . यामध्ये सर्वप्रथम डावा पाय गुडघ्यात दुमडून तो आपल्या पोटाकडे घेतला जातो डाव्या पाया नंतर उजवा पाय कपाळाकडे घेतला जातो.शेवटी दोन्ही पाय एकत्र खेचले जातात.
 

रोलिंग या योगासना मुळे गुडघ्याचे आजार बरे व्हायला मदत होते त्याचबरोबर पोटाचा व्यायाम व आतडी ,पचन संस्था मजबूतहोते.  

 

 

पाठीवरील बरीच आसने आहेत परंतु शाळेतील विद्यार्थ्यांचा विचार करूनजी त्यांना सहज शक्य होते अशाच आसनांचा परिचय या लेखातून करून दिला आहे. 

 

2. पोटावरील योगाची आसने Stomach yoga postures

 
 पाठीवरील आसनांच्या विरुद्ध शरीराची स्थिती या आसनात असते. म्हणजेच काय तर आपले पोठ जमिनीकडे असते आणि पाठीशी बाजूही आकाशाकडे असते.थोडक्यात जमिनीकडे तोंड करून झोपण्याची अवस्था ,अशा अवस्थेमध्ये शरीरअसत त्यांना पोटावरील  आसने म्हणतात. काही आसने पाहूया.
 

 

A. शलभासन

पोठावरील आसणांपैकी हे एक महत्त्वाच आसन आहे. यात आपले दोन्ही हात पोटाच्या खाली घेतले जातात व आपले पाय आकाशाच्या दिशेने उचलले जातात. कमरेपासून खालचा भाग वर खेचण्याचा प्रयत्न केला जातो. 45 अंशात पाय खेचून वर काढले जातात. अगोदर उजवा नंतर डावा आणि नंतर दोन्ही पाय या पद्धतीने शलभासन ने केले जाते.

 

     पाठीचे आजार कंबरदुखी, सांधेदुखी यासाठी शलभासन हे अतिशय गुणकारी आहे.

 

B.भुजंगासन

 

 भुजंग म्हणजे नाग.अगदी साध्या पद्धतीने सांगायचे तर नाग फना  काढतो अगदी त्याच पद्धतीने शरीर वर उचलणे . विशेसत मान या आसनाला भुजंगासन असे म्हणतात.भुजंगासन करताना कमरेच्या वरील बाजूस किंवा आपल्या बेंबीच्या समांतर ठेवावे आणि हळूहळू आपली मान नागाप्रमाणे वर काढायचे आहे,म्हणूनच याला भुजंगासन असे नाव दिले आहे.

 

भुजंगासन केल्याने पाठीचा कणा मजबूत व्हायला मदत होते.मणक्यांचा खूप चांगला व्यायाम होतो. शरीराचे मान या अवयवांच्या भुजंगासन देखील आपण दररोज केले पाहिजे.

C. नौकासन

 हे देखील पोटावरील एक छान  आसन आहे. हे असं करत असताना आपण पोटावर झोपलेला असतो, अशाच वेळी आपले हात आणि डोक्याचा भाग वर उचळवेत आणि त्याच वेळी समांतर दिशेने पाय देखील वरती उचलायचे आहेत.नावेसारखी अवस्था म्हणून नौकासण हे नाव दिले आहे.

 

3.  बसून  करावयाची आसने  Sitting yoga

 
काही आसने ही बसून देखील केली जातात. त्यांना बसून केली जाणारआसने म्हणतात.त्यातील काही महत्वाची आसने पाहूया..

A. पर्वतासन

 

 हे  आसन करत असताना  एक तर सुखासनात किंवा पद्मासनात बसावे. सुरुवातीला आपले दोन्ही हात छातीसमोर नमस्कार अवस्थेत असवेत.आणि श्वास हळू घेत घेत हात वरती कानाच्या दिशेने मग वरच्या दिशेला न्यायचे आहेत. काही अवधी गेल्यानंतर पुन्हा हात नमस्कार अवस्थेमध्ये आणायचे आहेत. हात वरती गेल्यानंतर जसे काय ते एखाद्या पर्वतासारखाच आकार दिसतो म्हणून याला पर्वतासन असे म्हणतात.  

 

 

पर्वत आसनामुळे आपला हाताचा व्यायाम होतो. आपल्या  पोटाचा व्यायाम होतो. साहाजिकच पोटाचा व्यायाम झाल्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते आणि आपले आजार बरे व्हायला मदत होते. परंतु यासाठी योगामध्ये सातत्य असले पाहिजे. 

 

 

2. गोमुखासन

 

हे आसन करत असताना डाव्या पायाची मांडी उजव्या पायावर आणि उजव्या पायाची मांडी डाव्या पायावर अशा पद्धतीने बसायचे आहे. हात मागच्या बाजूला घेऊन पाठीवर त्यांना एकमेकांमध्ये पकडायचे आहेत . येथे बऱ्याच गोष्टी या योगा अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली करायच्या आहेत. तुम्हाला फक्त केवळ परिचय व्हावा, या हेतूने आसने मी सांगत आहे तेव्हा योग्य मार्गदर्शकाचा उपयोग करून आपण नक्कीच आपले जीवन आरोग्यदायी व आनंदी करू शकतो. असो—–

 

 

 

3.इतर आसने

यामध्ये आपण  आपले पायाचे अंगठे पकडून डोके गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करणे आणि काही काळ त्याचा वस्ती मित्रांनी याला पश्चिमोत्तासन असे म्हणतात.

 

 

 

3.उभे राहून करावयाचे  योगासने

 

 काहीआसने ही उभे राहून केली जातात त्यांचा थोडक्यात परिचय पाहुया…. 

 

 

1.  ताडासन

 

या आसनात साधारणपणे व्यक्ती उभ्या अवस्थेत असल्यामुळे ताड  म्हणजे नारळाच्या झाडावरून याला ताडासन असे नाव दिलेले आहे. या आसनात उजवा आणि डावा हात यांची एकमेकांमध्ये बोटे घालून हात समोरच्या दिशेने ठेवला जातो आणि हळूहळू पायाचे पंजे उचलत पण जानवर उभे राहतो हात एकात एक गुंतवलेले आणि वरच्या दिशेने असतात.वर डोक्याच्या दिशेने नेली जातात.

 

या आसनामुळे टाच दुखी थांबते. पायांचे त्वचाविकार असतात ते कमी व्हायला मदत होते.

 

 

 2. उत्कटासन      

उभे राहून करावयाचे आसना मधील एक महत्त्वाचा आसन प्रकार आहे. हे आसन करताना उभे राहिल्यानंतर  हात समोरच्या दिशेला घ्यावेत आणि गुडघ्यामध्ये पाय वकवावेत .समोरच्या दिशेला करावेत आणि शक्य आहे तेवढा वेळ या अवस्थेत राहावे.

 

 

 अशा प्रकारे सहज आणि साध्या  शब्दांमध्ये योगासने म्हणजे काय आणि योगासनांचे काही मोजके प्रकार सर्व प्रकार लिखित स्वरूपात सांगता येणे अशक्य आहे.योगासने म्हटले की योगा अभ्यासकाच्या सल्ल्याने योग्य ही योग विद्या शिकायची आहे.

 

 

 योगा करण्या पूर्वी कोणती खबरदारी घ्यावी


1.  योगासने ही योगा अभ्यास यांच्या सल्ल्याने करावा.

 

 

2. जेवण केल्यानंतर शक्यतो योगासने करू नये जेवणापूर्वी किमान अर्धा तास आपण योगासने करू शकतात.

 

 

3.  योगा साठी एकच जागा निश्चित करावी.

 

 

4.  यूट्यूब, टीव्ही चॅनेल वर पाहून योगा करू नये.

 

 

5.  आजारी असल्या नंतर योगासने करू नयेत.

 

अशा काही खबरदारी योगासने करण्यापूर्वी आपण घ्यायला हव्यात खबरदारी समजण्यासाठी योगाचे अभ्यास  वर्ग सुरू करायला हवेत.हा योग दिन विशेष लेख योगासने म्हणजे काय व योगसनाचे प्रकार आपल्याला नक्कीच आवडला असेल. इतराना देखील लेखाच्या शेवटी Sher बटणवर क्लिक करून इतराना देखील पाठवा. धन्यवाद !

 

 

आमचे इतर लेख

 

 

    

 

Leave a Comment