2023 मेगा तलाठी भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू |2023 talathi recruitment online application start

गेल्या काही दिवसांपूर्वी तलाठी भरतीचे जाहिरात प्रारूप प्रसिद्ध झाल्यापासून तलाठी भरती बाबत तयारी करणाऱ्या उमेदवारांना एकच उत्सुकता लागलेली होती. ती  म्हणजे 2023 ची 4664 जागांसाठी असणारी मेगा तलाठी भरती प्रक्रिया कधी सुरू होणार? या तलाठी भरतीची जाहिरात कधी येणार? तर या तलाठी भरतीच्या प्रक्रियेला अर्थात तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज भरण्याबाबतचे परिपत्रक  महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.

2023 मेगा तलाठी भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू
2023 मेगा तलाठी भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू

तलाठी भरती 2023 साठी अर्ज करण्याची पद्धत | How to Apply for Talathi Recruitment 2023

ज्या  उमेदवारांना तलाठी भरती 2023 साठी अर्ज करायचा आहे.त्यांना महाराष्ट्रातील एकूण 36 जिल्ह्यांवर ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने अर्थात computer based test talathi Pariksha घेण्यात येणार आहे त्यामुळे आपले अर्ज देखील ऑनलाइन सादर करायचे आहेत.

तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख | Talathi Recruitment 2023 Online Application Date

जेव्हा उमेदवारांना 2023 च्या तलाठी भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांना अर्ज सादर करण्यासाठी दिनांक 26 जून 2023 ते 17 जुलै 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावयाचे आहेत.

तलाठी भरती 2023 ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळ लिंक  |  Talathi Recruitment 2023 Website Link to Submit Online Application

ज्या  उमेदवारांना तलाठी भरती 2023 साठी अर्ज करायचा आहे त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. त्या विद्यार्थ्यांनी खालील संकेतस्थळावर अर्थात mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर आपले तलाठी भरतीचे पऑनलाइन अर्ज दाखल करायचे आहेत.

मेघा तलाठी भरती 2023 अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ लिंक | Megha Talathi Recruitment 2023 Website Link to Apply

 तलाठी भरती महाभूमी वेबसाइट  

या वरील  लिंक वरती क्लिक करून तलाठी भरतीसाठी उमेदवार तात्काळ आपले अर्ज दाखल करू शकतात.

तलाठी भरती 2023 साठी पात्रता | Eligibility for Talathi Recruitment 2023

1.भारताचा नागरिक 

तलाठी भरतीसाठी अर्ज करणारी व्यक्ती भारतीय असावी. 

2.वयोमर्यादा 

तलाठी भरती 2023 साठी वयोमर्यादा गणन  करण्याचा कालावधी 1 जानेवारी 2023 आहे.

 विविध अराजपत्रित प्रवर्ग / उपप्रवर्गासाठी किमान व कमाल मर्यादा

१.प्रवर्ग खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही- २०१५/प्र.क्र.४०४/कार्या.१२. दि. २५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार किमान १८ वर्षापेक्षा कमी व ३८ वर्षापेक्षा जास्त नसावे.

२.मागासवर्गीय उमदेवारांसाठी

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही- २०१५/प्र.क्र.४०४/कार्या. १२. दि. २५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार किमान १८ वर्षापेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.

तथापी उन्नत व प्रगत गटांमध्ये क्रिमीलेयर (Creamy Layer) मोडणाज्या वि.जा- अ, भ.ज.-ब, भ.ज.-क, भ.ज.-ड, विमा.प्र. इ.मा.व., एस.ई.बी.सी आणि ई.डब्ल्यु. एस (आर्थिकदृष्टया दुर्बल घटक) प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही.

३ पदवीधारक / पदविकाधारक अंशकालीन उमेदवारांसाठी

शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. अशंका- १९१८/प्र.क्र.५०७/१६- अ दि. २ जानेवारी २०१९ मधील तरतूदीनुसार, कमाल वयोमर्यादा ५५ वर्ष राहील.

4.स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य सन १९९९ चे जनगणना कर्मचारी व सन १९९४ नंतर निवडणूक कर्मचारी यांचेसाठी

 

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. निवक २०१०/प्र.क्र.०८/२०१०/१६-अ दि.६/१०/२०१० मध्ये दिलेल्या निर्देशानुसार कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील. या घटकातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी देखील उच्चतम वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील.

5.खेळाडू उमेदवारांसाठी

शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडील शासन निर्णय क्र. राक्रीधो- २००२/प्र.क्र./६८ /क्रीयुसे- २ दि.१/७/२०१६ मधील तरतुदीनुसार, खेळाडूची गुणवत्ता व पात्रता विचारात घेऊन सदर पदासाठी असलेल्या विहीत वयोमर्यादेत ०५ वर्षापर्यंत वयाची अट शिथिल करण्यात येईल. तथापि, उच्चतम वयमर्यादा ४३ इतकी राहील.

६.दिव्यांग उमेदवारांसाठी

महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.एसआरव्ही- १०९८/प्र.क्र.३९/९८/१६-अ, दि. २६ / ६ / २००१ मधील तरतुदीनुसार, उच्चतम वयोमर्यादा सरसकट ४५ वर्ष इतकी राहील. तथापि, दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांचे किमान दिव्यंगत्वाचे प्रमाण ४० टक्के असल्याबाबतचे स्थायी वैद्यकिय मंडळाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तसेच त्यांची निवड झाल्यानंतर नियुक्ती आदेश निर्गमीत करण्यापुर्वी शासनाने नियुक्त केलेल्या तज्ञ वैद्यकीय मंडळाने तो उमेदवार संबंधित पदावर काम करु शकेल असे प्रमाणपत्र दिल्यानंतर त्याची अंतिम नियुक्ती केली जाईल. सदर प्रमाणपत्रावर उमेदवाराचा फोटो असणे आवश्यक आहे.

७ प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी आणि भुकंपग्रस्त

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. प्रकल्प- १००६/मु.स. ३९६/प्र.क्र५६/०६/१६-अ, दि.३/२/२००७ मधील तरतुदीनुसार, कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष इतकी राहील. सदर वयोमर्यादा सरसकट शिथील केली असल्याने, मागासवर्गीय प्रकल्पग्रस्त व भुकंपग्रस्त उमेदवारांनाही कमाल वयोमर्यादेबाबत ४५ वर्षांपर्यंतची सवलत राहील.

८माजी सैनिक उमेदवारांसाठी

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.मासैक- २०१०/प्र.क्र.२७९/१०/१६-अ दि. २०/८/२०१० मधील तरतुदीनुसार माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. तसेच, अपंग माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षेपर्यंत राहील.

तथापि, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सनिव २०२३/प्र.क्र./१४/कार्या २२ दि. ३ मार्च २०२३ अन्वये दि.३१ डिसेंबर २०२३ पुर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.

तलाठी भरती 2023 साठी  शैक्षणिक अर्हता/पात्रता| Educational Qualification/Eligibility for Talathi Recruitment 2023

मेगा तलाठी भरती 2023 साठी खालील शैक्षणिक अर्हता आपल्याजवळ असणे अतिशय गरजेचे आहे.

 जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/ २०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.

  • महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.
  • शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२/प्र.क्र२७७/३९, दि. ४ / २ /२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशा प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ ( वर्षाच्या आत शन करणे आवश्यक राहील.
  • मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
  • माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-

पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस.एस.सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

तलाठी भरती 2023  ऑनलाइन परीक्षेचे स्वरूप |  Talathi Recruitment 2023 Online Exam Format

2023 ची तलाठी भरती पहिल्यांदाच ऑनलाईन स्वरूपात होत असल्यामुळे साधारणपणे या परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे असेल

1. मराठी

लाटी परीक्षा देणाऱ्या उमेदवाराचे मराठी भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी त्याला मराठी भाषेवर आधारित 25 प्रश्न विचारले जातील आणि ते पन्नास गुणांसाठी असतील.

2. इंग्रजी भाषेचे ज्ञान

तलाठी परीक्षा 2023 देणाऱ्या उमेदवाराचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व अभ्यासण्यासाठी मराठीप्रमाणे त्याला 25 प्रश्न विचारून त्यासाठी 50 गुण असतील.

3. सामान्य ज्ञान

सामान्य ज्ञान या घटकावर देखील 25 नानी 50 गुण असे स्वरूप आहे.

4. बौद्धिक चाचणी अर्थात अंकगणित

विद्यार्थ्यांची बौद्धिकता आणि अंकगणित एक क्षमता तपासण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना तलाठी भरती परीक्षेत 25 प्रश्न 50 गुणांसाठी विचारले जातील.

थोडक्यात तलाठी परीक्षेसाठी उमेदवारांना एकूण 100 प्रश्न हे 200 गुणांसाठी विचारले जातील आणि1प्रश्न हा 2 गुणांसाठी असेल.

तलाठी ऑनलाईन भरती 2023 परीक्षेसाठी  कालावधी | Duration for Talathi Online Recruitment 2023 Exam

तलाठी भरती पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने होणार असल्यामुळे या 2023 च्या ऑनलाईन तलाठी भरतीसाठी विद्यार्थ्यांना 2 तास म्हणजेच 120 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे.

तलाठी भरती 2023 प्रश्नपत्रिका चे स्वरूप |Talathi Recruitment 2023 Question Paper Format

 

2023 च्या तलाठी भरती परीक्षेचे प्रश्नपत्रिका स्वरूप वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असणार आहे आणि एका प्रश्नासाठी दोन गुण असणार आहेत.

आपल्याला जर तलाठी भरती विषयी संपूर्ण माहिती हवी असल्यास आम्ही सोबत जे माहितीपत्रक जोडत आहोत ते आपण अभ्यासू शकता

 आमची ही तलाठी भरती 2023 बाबतची माहिती इतरांना जरूर पाठवा. 
 
 
FAQ 
 
1. 2023 ची तलाठी भरती ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे?
       ऑनलाइन 
 
 
2. 2023 च्या मेगा तलाठी भरती मध्ये एकूण किती जागा आहेत?
      4644
 
 
3. तलाठी भरती 2023 साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होणार आहे
    25 जून 2023
 
 
4. तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक कोणती आहे?
          17 जुलै 2023
 
 
5. तलाठी भरती 2023 ची परीक्षा किती गुणांसाठी असेल
      200
 
 
6. तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी किती वेळ दिला जाईल
2तास0120 मिनिट
 
आमचे इतर लेख 
 
 

1 thought on “2023 मेगा तलाठी भरती ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू |2023 talathi recruitment online application start”

Leave a Comment