A आरोग्यासाठी आमसुलाचे, कोकमचे उपयोग |aarogyasathi aamsul ani kokam che uoyog

आजच्या लेखात आपण आपले आरोग्य आपल्याच घरात या सदरात आपल्या दैनंदिन वापरातील स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असणारे घटक यांच्या साह्याने कोणते उपचार करून घेऊ शकतो यात आज आपण आमसूल म्हणजे कोकमचे औषधी उपयोग पाहणार आहोत.चला तर मग आरोग्यासाठी आमसूल ही माहिती पाहूया.

आमसूल म्हणजे काय?aamsul mhanje kay|what is aamsul/kokam

आमसुलाचे दुसरे नाव म्हणजे कोकम. कोकणात किंवा महाराष्ट्राच्या काही भागात  आमसुलाचा वापर सर्रास केला जातो. आमसुले चवीला आंबट असते. या आंबटपणामुळेच आमसुल  घरामध्ये सर्रास वापर केला जातो जास्त करून स्वयंपाक घरात. आमसुल चिंचपेक्षा  जास्त गुणकारी आहे.तसेच आमसूल एक औषध सुद्धा आहे. गोव्यामध्ये आमसूल कढी जास्त प्रसिद्ध आहे. जसे महाराष्ट्र मध्ये उसाचा रस ग्लास ग्लास भरून पिला जातो तसाच गोव्यामध्ये आमसूल कढी ग्लास ग्लास भरून आमसूल कडी पितात. गोव्यातच कशाला तर पूर्ण महाराष्ट्रात म्हटलं तरी या आमसुल कडीचे चे अनेक चाहते आहेत  . कोकणामध्ये तर या आमसूलचा वापर कोकम सार करण्यासाठी वापरला जातो. आणि भाजी नसेल तर कोकम सार आणि भात म्हणजे जेवण झाले.

अशा या आमसूलाचे आरोग्यासाठी काय उपयोग आहेत ते आपण पाहूया.

आमसुलचे उपयोग : aamsulache upyog

1) आमसूल झाडांचा आढळ |aamsul zad

आमसुलाची झाडे आपल्याला भारतात अनेक ठिकाणी आढळतात.जसे ही आमसुलाची झाडे गोवा,कोकणपट्टी,केरळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळतात.

कोकण,केरळ,गोवा या ठिकाणी  आमसूलावर आधारित अनेक लघुउद्योग आढळतात. कोकम काढणे, कोकम सरबत तयार करणे, कोकम सरबत तयार करणे,त्याच्या बाटल्या भरणे, कोकम चटणी तयार करणे असे अनेक छोटे छोटे लघुउद्योग या ठिकाणी चालतात.

2)रातांबे | ratambe| amsul fale

आमसुलाच्या झाडांना जी फळे येतात त्या फळांना रातांबे असे म्हणतात. या  रातंब्यांच्या फळातला गर काढला जातो. या रातांब्याच्या फळाची साल सुकवली की या सालींनाच आमसूल किंवा कोकम म्हटले जाते. या रातांब्याचा फळातला गर खूप छान लागतो. कोकणातील लोक या रातांब्यातला गर फिश करी किंवा मासे फ्राय करताना वापरतात.

3)आमसूल तूप | aamsul tup

आमसुलाच्या बियांपासून जे तेल काढले जाते ते जाडसर असते ,घट्ट असते याला आमसुलाचे तूप म्हटले जाते. हे तूप अतिशय पोषक असते अनेक जण या तुपाचा वापर जेवणात करतात.

4) अजीर्नावर आमसूल |apachanavr gunkari

आमसूल हे पाचक आहे. आमसूल अजीर्ण आणि उलटी रोखणारे आहे. तसेच आमसूल पित्तशामक आहे.

आमसुलाचा वापर सर्रास करावा. तसेच कोकम कढी घ्यावी. किंवा कोकमाचे सरबत घ्यावे. असे हे कोकम आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे .

5) पित्तशामक कोकम| pitt nashak kokam

अनेक व्यक्तींना पित्ताचा त्रास असतो काहींना पित्तामुळे अंगाला खाज सुद्धा सुटते किंवा लाल लाल गांधी येतात यांना खाजवल्यावर आणखी खाज येते कधी कधी खाजवून रक्त सुद्धा येते. यासाठी नैसर्गिक औषध म्हणजे आमसुलाचे पाणी. तयार करून ज्या ठिकाणी पित्त उठले असेल त्या ठिकाणी चांगले चोळावे आणि नंतर आंघोळ करावी. तसेच शरीराच्या आतील पित्त कमी करण्यासाठी  सुद्धा कोकम पाण्याचा वापर करावा. चार-पाच कोकम अर्धा ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवावीत आणि भिजल्यानंतर त्याचा रंग पाण्यात उतरल्यावर हे पाणी दहा दहा मिनिटांनी थोडे थोडे प्यावे.

6) आम्लपित्तावर कोकम |aamlpittvar kokam

काही काही व्यक्तींना अन्न पचन नीट न झाल्यामुळे कडू आंबट ढेकर येतात. कधी कधी थकवा जाणू लागतो मळमळ वाढते किंवा आंबट उलट्या होतात. ही सर्व आम्लपित्ताची लक्षणे आहेत.यावर साधा उपाय म्हणजे कोकम थोडी वेलची आणि चवीनुसार साखर यांची चटणी तयार करून त्याचा गोळा तयार करावा आणि ती जेवताना खावी. त्यामुळे या आम्लपित्ताचा त्रास हळूहळू कमी होत जातो. त्याचबरोबर दररोज सकाळी चार-पाच दिवस वमन पण करावे. आम्लपित्ताचा त्रास कमी झाल्यावर  वमन हे आठवड्यातून एकदाच करावे.( वमन करण्यापूर्वी व मन शास्त्र शुद्ध पद्धती आयुर्वेदिक डॉक्टरांकडून करून घ्यावी)

7) मुळव्याधीवर कोकम | mulvyadhivr elaj

ज्या व्यक्तींना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी आमसुलाची चटणी जेवणामध्ये नियमित घ्यावी .

8) अशक्तपणा घालवण्यासाठी कोकम तूप |ashaktpnaa ghlvnyasathi

ज्या व्यक्तींना खूप दिवस बारीक ताप आणि या तापामध्ये खोकलाही असतो आणि अशक्तता वाटते अशा व्यक्तींनी कोकम तुपाचा वापर करावा.

दोन चमचे कोकम तुपात थोडी खडीसाखर मिक्स करावी आणि दिवसातून सकाळी आणि संध्याकाळी हे तूप घ्यावे. म्हणजे सकाळी दोन चमचे  आणि संध्याकाळी दोन चमचे. जोपर्यंत अंगात मुरलेला ताप आणि खोकला जात नाही तोपर्यंत हा प्रयोग करावा.

9) फुफुसांच्या विकारात कोकम तूप | fupusanchya vikarat

फुफ्फुसांच्या कोणत्याही विकारात कोकम तुपाचा खूप फायदा होतो. जसे क्षयरोग ,  खोकला  येणे, दमा अशा अनेक विकारात कोकम तुपाचा खूपच फायदा दिसून येतो. यामध्ये  दोन दोन चमचे कोकम तुपात थोडी खडीसाखर मिसळून सकाळ संध्याकाळ घ्यावे .

10) हाता पायांच्या भेगा वर इलाज कोकमतूप |hat pay yavr bhegaa

कित्येक व्यक्तींना हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात  सुद्धा हाता पायांना भेगा पडतात. जळवात होतो अशा वेळेस अशा भेगांमध्ये आमसुलाचे तूप चांगले जिरवावे. 14 – 15 दिवसातच भेगा नरम पडतील आणि बुजतील. आणि हात पाय पूर्ववत होतील.

11) उष्णतेच्या  विकारांवर कोकम सरबत  |ushntevr ilaj

उन्हाळ्यात उष्णतेच्या विकारांनी अनेक जण हैराण होतात.

घामोळे येणे गळवे येणे डोकेदुखी बद्धकोष्ठता. अशावेळी उन्हाळ्यात रोज एक ग्लास वायलेट सरबत म्हणजेच कोकम सरबत घ्यावे या सरबतात थोडेसे मीठ आणि जिऱ्याची पूड अवश्य मिसळावी.

असा साधा सरळ सोपा कोकम म्हणजे  आमसूल की प्रत्येकाच्या घरात  उपलब्ध  आहे.

आमचा हा आमसूल किंवा कोकम हा लेख पाहिल्यांनातर आरोग्यासाठी लवकर दक्ष व्हा!

Leave a Comment